Tuesday, December 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

विधीसंघर्षित बालकाचा वापर करून कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत घरफोड्या

Burglary in Koregaon Park Police Station limits
  • 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त,
  • अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनची कामगिरी

पुणे/दि/ प्रतिनिधी/
मौज मजेसाठी विधीसंघर्षित बालकाचा वापर करून घरफोडी करणाऱ्या इसमाला कोरेगाव पार्क पोलीसांनी अटक केली असून कोरेगाव पार्क सहित मुंढवा पोलीस स्टेशन हद्दीत देखील घरफोडी केल्याची माहिती समोर आली आहे.
गुन्ह्याची हकीकत अशी की, कोरेगाव पार्क पो.स्टे . पुणे शहर गुन्हा रजि . नंबर 71 / 2022 भा.दं.वि.कलम 454,457,380,34 मधील फिर्यादी यांचा लिबर्टी सोसायटी बंगलो नंबर 7 फेज 1 नॉर्थ मेन रोड , कोरेगाव पार्क पुणे या बंगल्यास लॉक करुन मुबई येथे गेले असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने नमुद बंगल्याची स्लाईडिंग विंडो उघडून त्याव्दारे आत प्रवेश करुन बंगल्यामधील 2 एलईडी टीव्ही 55 इंच , 2 पॉवर स्पीकर , 2 सराऊंड स्पीकर , 1 ॲम्पली फायर व 1 बुम बॉक्स तसेच फिर्यादी यांचे बंगल्या शेजारील सुरोज बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ऑफिस मधील एक 65 इंची एलईडी टीव्ही असे घरफोडी चोरी करुन नेलेबाबत गुन्हा दाखल होता .

दाखल गुन्हयामध्ये कोणतेही सीसीटीव्ही फुटेज अगर साक्षीदार उपलब्ध नव्हते. तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली बातमीदारामार्फत बातमी मिळवून वेग - वेगळ्या सर्व शक्यता पडताळल्या नंतर अटक आरोपी 1 ) गणेश तिमन्ना साखरे , वय -21 वर्षे , रा . रेणुका वस्ती , नॉर्थ रोड कोरेगाव पार्क , पुणे याने व ताब्यात घेतलेला 2 ) एक विधीसंघर्षीत बालक यांनी सदर गुन्हा केल्याची खात्रीपुर्वक कबूली दिल्याने आ.क्र .1 यास अटक केली असुन आ . क्र . 1 ताब्यात घेतले आहे. त्यांनी गुन्हयात चोरी केलेला वरिलप्रमाणे ऐवज काढून दिलेने पंचनाम्याने माल जप्त करण्यात आला आहे .

 त्याचप्रमाणे वरील आरोपींनी तपासा मध्ये मुंढवा पोलीस ठाणे गुन्हा रजि . नं . 188/2022 भादंवि कलम 457,380 हा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे . अशा प्रकारे दोन गुन्हे उघडकिस आणले तसेच सदर आरोपीतांकडून इतर आयफोन कंपनीचे मोबाईल ॲपल वॉच , डेल कंपनीचा लॅपटॉप साऊंड बॉक्स , इलेक्ट्रानिक्स वस्तु असे अंदाजे 10,000,00 / - ( दहा लाख रुपये ) किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . सदर आरोपींकडून आणखी उघडकीस येण्याची शक्यता आहे .
 सदरची कामगिरी ही मा . श्री . राजेंद्र डहाळे , अपर पोलीस आयुक्त , पश्चिम विभाग , पुणे शहर , मा . श्री . सागर पाटील , पोलीस उपआयुक्त , परिमंडळ 2 , पुणे शहर मा.श्री . आर . एन . राजे . सहा . पोलीस आयुक्त , लष्कर विभाग , पुणे शहर , मा . श्री . विनायक वेताळ , वरिष्ठ पो . निरीक्षक , कोरेगाव पार्क , सौ . दिपाली भुजबळ , पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शनाखाली दत्तात्रय लिगाडे , सपोनि तपास पथक सपोफौज , नामदेव खिलारे , गणेश गायकवाड , संदीप जढर , विशाल गाडे , अझरुद्दीन पठाण , विवेक जाधव , प्रविण पडवळ , म.पो. अंम . ज्योती राऊत रुपाली जगताप व पो.अंम चालक निकम यांनी केलेली आहे