Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

हद्द येरवडा पोलीस स्टेशनची, जुगार अड्डा मात्र विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या नाकाखाली,

येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा;
. 23 हजारचे मुद्देमालासह एकूण 14 आरोपींविरुद्ध कारवाई.

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहर पोलीस आयुक्तालाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार बंटी मिश्री, विशाल पाटील आणि अक्रम सिद्धीकी यांच्या मालकीच्या असलेल्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला आहे. या छाप्याची विशेषता म्हणजे, बंटी मिश्राचा जुगार अड्डा हा येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असून, थेटच जुगाराचे ठिकाण विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या नाकाखाली थोडक्यात 10 पाऊलांवर सुरू असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान सामाजिक सुरक्षा विभागाच्या कारवाईच्या भितीने बंटी मिश्राने अनेक ठिकाणी पंटर थांबविले होते. तसेच फिरूनही धंदा घेत असल्याने, कारवाईवेळी अनेक रायटर, खेळी पळुन गेले असल्याची माहिती आहे.

घटनेची हकीकत अशी की, बुधवार, दि. 3.8.22 रोजी अवैध मटक्याच्या धंद्याबाबत मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार, येरावडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, लेन नंबर 4, राजीव गांधी वसाहत, मेंटल हॉस्पिटल क्वार्टर्स शेजारी, येरवडा, पुणे येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये  रेकॉर्डवरील गुन्हेगार बंटी मिश्रा याच्या जुगार अड्ड्यावर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास  पंचां समक्ष छापा टाकून, कल्याण मटका घेणारे 2 रायटर, मटका खेळणारे 4 इसम, 3 जुगार मटका मालक व पोलीस छाप्याचे वेळी पळून गेलेले 5 मटका खेळणारे अनोळखी इसम अशा एकूण 14 आरोपींविरुद्ध येरवडा पोलीस स्टेशन येथे  महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4(अ ), 5 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

सदर छापा कारवाईत अटक /कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
1) माणिक मोहन आडे, वय 49 वर्षे, धंदा – जुगार रायटर, रा. ठी. शांतीनगर, येरवडा, पुणे.
2) विशाल झाबुलाल गुप्ता, वय 24 वर्षे, धंदा – जुगार रायटर, रा.ठी राजीव गांधी नगर झोपडपट्टी, येरवडा, पुणे.
3) धम्मपाल बळीराम टोम्पे, (खेळी), वय 38 वर्षे, धंदा – नोकरी, रा.ठी. डायमंड स्वीट्सच्या मागे, रहाटणी फाटा, थेरगाव, पुणे.
4) देवा पिरान शिवन पिल्ले (खेळी), वय 55 वर्षे, धंदा – नोकरी, रा. ठी. वाघमारे वस्ती, वाघोली, पुणे.
5) बाबू आनंदा शिंदे (खेळी), वय 60 वर्षे, धंदा- मजूरी, रा.ठी. सर्व्हे नंबर 57, पंचशील नगर, येरवडा, पुणे.
6) मालकोंड्या रागम, वय 65 वर्षे, धंदा – मजूरी, रा.ठी. हुसेन बाबा दर्गा जवळ, नमन तांडा, येरवडा, पुणे.

पाहिजे आरोपी जुगार अड्डा मालकांची नांवें
7) विशाल पाटील, रा.ठी. विश्रांतवाडी, पुणे. (पुर्ण नांव व पत्ता माहीत नाही)
8) बंटी मिश्रा, रा.ठी. विश्रांतवाडी, पुणे. (रेकॉर्डवरील गुन्हेगार),
9) अक्रम सिद्दिकी, (पूर्ण नाव पत्ता माहित नाही)

10 ते 14) पोलीस छाप्या दरम्यान घटनास्थळावरून पळून गेलेले 5 अनोळखी आरोपीत इसम.
सदर अटक / कारवाई करण्यात आलेल्या आरोपींकडून, तसेच घटनास्थळावरून सुमारे . 23,840/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यामध्ये रोख . 2840/- व .21,000/- किंमतीचे 4 मोबाईल्स व जुगाराचे साहित्याचा समावेश आहे
सदर कारवाई करण्यात आलेल्या एकूण 14 आरोपींविरुद्ध येरवडा पोलिस स्टेशन येथे गु.र.क्र. 361/22, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा, कलम 4 (अ), 5 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे सदरचा जुगार अड्डा सुरू असलेला परीसर हा जरी येरवडा पोलीस ठाणेचे हद्दीतील असला, तरी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पासू केवळ 100 ते 150 मिटर अंतरावर आहे.

येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील व विश्रांतवाडी पोलीसांच्या नाकाखाली सुरू असलेल्या जुगार अड्डयावरील  कारवाई, सामाजिक सुरक्षा विभागाकडील वपोनि श्री. राजेश पुराणिक, पोहवा राजेंद्र कुमावत, पोहवा बाबा कर्पे, पोहवा प्रमोद मोहिते, मपोहवा  मनीषा पुकाळे, पोना अण्णा माने, पोशि पुष्पेन्द्र चव्हाण, पोशि  संदीप कोळगे यांच्या पथकाने केली आहे.