Sunday, December 15 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

भारती विद्यापीठ, सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत , चोऱ्या करणाऱ्या अल्पवयीनांकडून 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहरात विधीसंघर्षित अर्थात अल्पवयीन मुलांकडून मौजमजा, चैनी साठी चोरी करण्याचे व चोरी करवुन घेण्याचे प्रकार वाढले असल्याचे दिसून येत आहे. भारती विद्यापीठ व सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत महागड्या वाहनांच्या बॅटऱ्या चोरणाऱ्यांची दहशत निर्माण झाली होती. एवढ्या महागड्या वाहनातील बॅटऱ्या चोरणारे अतिशय सरावलेले चोरटे असू शकतात असा पोलीसांचा अनुभव असतो. परंतु ह्या चोऱ्या विधीसंघर्षित बालकांकडून केला गेला असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. भारती व सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत चोऱ्या करणाऱ्या अल्पवयीन बालकांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्ह्याची उकल अशी झाली की, भारती विदयापीठ पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे  वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चोरीच्या गुन्हयांना आळा बसावा या करता तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ व पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता यांना पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करण्याबाबत आदेशीत केले होते.
त्यानुसार वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार पोलीस स्टेशन हद्दीत चोरीचे गुन्हयांना आळा बसावा म्हणुन पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार नितेश चोरमोले, अभिनय चौधरी व आशिष गायकवाड यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आंबेगांव गायमुख परिसरामध्ये दोन लहान मुले ही त्यांचेकडे असलेल्या बॅट-या रस्त्याने ये-जा करणा-या मोटार सायकल स्वारांना विक्री करीत आहेत. लागलीच मिळालेल्या बातमीची खातरजमा करण्याकरीता तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार हे आंबेगांव गायमुख परिसरामध्ये गेले असता गायमुख चौकाचे थोडे अलिकडे मॅगो हॉटेलकडे जाणा-या रोडवर दोन लहान मुले ही एस.एफ कंपनीची एक बॅटरी व एनएक्सटीईआर  कंपनीची एक व एक्साईड कंपनीची एक अशा तीन बॅट-यांसह मिळुन आले.
त्यांचेकडे त्या बॅटऱ्यांबाबत तपास करता त्यांनी त्या बॅटऱ्या आंबेगाव व धनकवडी भागातुन चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यांचेकडुन तीन बॅट-या व एक दुचाकी गाडी असा एकुण 50,000/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला असुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, पुणे गुन्हा रजि नंबर 811/2022, भादंवि कलम 379 व सहकारनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर 247/2022. भादंवि कलम 372 अन्वये दोन गुन्हा उघडकीस आले आहे.
ही कारवाई भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीहरी बहीरट, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार, मितेश चौरमोले, अभिनय चौधरी, अशिष गायकवाड, अमर भोसले, शैलेश साठे, रविंद्र चिप्पा, विश्वनाथ गोणे, हर्षल शिंदे, मंगेश पवार, निलेश ढमढेरे, अभिजीत जाधव, अवधुत जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, राहुल तांबे, विक्रम सावंत, यांच्या पथकाने केली आहे.