एकाच दिवशी लोणी काळभोर व कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत मटका जुगार अड्डयावर मॅरेथान कारवाई तर,
दुसऱ्या दिवशी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत स्पा वेश्यालयावर छापा
पुणे/दि/ नॅशनल फोरम/
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेतील नो फिल्डवर्क झोन मधुन भरत जाधव यांनी सामाजिक सुरक्षा विभागा सारख्या ग्राऊंड फिल्डवर्क असलेला पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्या दिवसापासूनच पुणे शहरातील मटका जुगार अड्डयांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. एका एका दिवशी दोन/दोन ठिकाणी छापासत्र सुरू आहे. धडाधड जुप्रकाचे 12 अ नुसार कारवाया सुरू आहेत. समाजविघातक आरोपींची नावे प्रसिद्धीपत्रकाव्दारे जाहीर न करता, त्यांना गोपनिय ठेवून पोलीस स्टेशनच्या हवाली केले जात आहे. दरम्यान कारवाया सुरू असल्या तरी धंदे मात्र बंद होत नाहीत एवढे मात्र दिसून येत आहे. याच सामाजिक सुरक्षा विभागातील तत्कालिन पोलीस अधिकारी राजेश पुराणिक यांनी पुणे शहरातील एखादया धंदयावर कारवाई केली तरी, संपूर्ण पुणे शहरातील धंदयावर कर्फ्यु ऑर्डर लावल्यासारखे वातावरण दिसून येत होते. परंतु हे चित्र सध्या दिसत नसले तरी कारवाईचे 12 अ वाजविले आहेत.
कोंढव्यात 22 अटक तर 54 हजारांचा मुद्देमाल जप्त-
कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील कात्रज कोंढवा रोड येथे पत्राच्या शेडमध्ये कल्याण मटका जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती, सामाजिक सुरक्षा विभागाला प्राप्त झाल्याने, त्यांनी तातडीने या धंदयावर छापा टाकला आहे. या अवैध धंदयावर कल्याण मटका जुगार पैसे लावुन खेळत व खेळवत असल्याचे मिळून आल्याने 22 इसमांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून कल्याण मटका जुगारातील रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असे एकुण 54 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संबंधित आरोपींविरूद्ध कोंढवा पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम 12 अ नुसार गुन्हा नोंद करण्यात येवून संबंधित आरोपींना कोंढवा पोलीसांकडे अधिक कारवाईसाठी सुपूर्द केले आहे. कारवाई नंतर कालही हा धंदा सुरू असल्याचे दिसून आले आहे.
लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत 24 अटक तर 68 हजाराचा मुद्देमाल जप्त –
लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील प्रसिद्ध अशा थेऊर गाव येथे पत्र्याच्या शेड मध्ये बेकायदेशिरपणे कल्याण मटका जुगार खेळत असल्याचे दिसून आल्याने त्यांच्या विरूद्ध लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बेकायदेशिर धंदयावरून सुमारे 23 इसमांना ताब्यात घेवून जुगारातील रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असे एकुण 68 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एक पाहिजे आरोपी फरार झाला असून, इतर 23 इसमांना लोणीकाळभोर पोलीसांच्या सुपूर्द करण्यात आले आहे.
दरम्यान आजपर्यंत सामाजिक सुरक्षा विभागाने ज्या 8/9 धंदयावर कारवाई केली आहे, त्या ठिकाणी पोलीसांना घाबरून धंदे सुरू होते. परंतु कारवाईनंतर मात्र पोलीसांची भिती कुठच्या कुठं पळुन गेली असल्याचे चित्र दिसत आहे. शिवाय पत्राच्या शेड मध्ये आडबाजुला लपुन-छपुन सुरू असलेले धंदे राजरोसपणे सुरू कसे होतात हा प्रश्न निर्माण झाला आहे. काल देखील कोंढवा येथील धंदा सुरू असल्याचे दिसून आले आहे याचे रहस्य काय असू शकते हा देखील पुनः दुसरा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरेगाव पार्कातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश- 3 महिलांची सुटका –
कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत मसाज पार्लर व स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा कारवाई केली आहे. कोरेगाव पार्क येथील लेन नं. 5 मधील आशियाना पार्क को. ऑप सोसायटी मधील फेमिना स्पा नावाने वेश्याव्यवसाय सुरू होता.
सामाजिक सुरक्षा विभागाने एक बनावट ग्राहक पाठवुन खात्री केली असता, स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री झाली. सामाजिकच्या पथकाने छापा टाकुन तीन पिडीत महिलांची सुटका केली असून दोन मॅनेजर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच स्पा सेंटरचे मॅनेजर, चालक, मालक यांच्यावर कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही सर्व कारवाई पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त श्री. रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त श्री. अमोल झेंडे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने केली आहे.