पुणे पोलीसांकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान डॉ. आनंद तेलतुंबडेंची अटक बेकायदा, विशेष न्यायालयाचा पुणे पोलीसांवर आसुड
Dr-Teltumbade
पुणे/दि/ प्रतिनिधी/
भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि कथित नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाप्रकरणी डॉ. आनंद तेलतुंबडे यांना मुंबई विमानतळावर उतरताच पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यानंतर, पुणे पोलिसांनी तेलतुंबडेंना पुण्याला आणले. आज न्यायालयात हजर करून त्यांच्या कोठडीची मागणी करण्यात येत होती. मात्र, येथील विशेष न्यायालयाने ही अटक बेकायदा असून, सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारी असल्याचं म्हटलंय. दरम्यान पुण्यातील सत्र न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली. मात्र, ही अटक बेकायदा असल्याचं विशेष न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पुणे पोलिसांच्या कारवाईला रट्टा बसलाय.
पुणे पोलिसा...









