
वंचित बहुजन आघाडीची ३७ उमेदवारांची यादी जाहीर, सर्वाधिक धनगरांना ६ जागा, बौद्धांसह २१ जातींना उमेदवारी
Prakash-Ambedkar
मुंबई/दि/ प्रतिनिधी/
मागील सहा महिन्यांपासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व शहरात वंचित बहुजन आघाडीच्या रेकॉर्डब्रेक जाहीर सभा झाल्या.लोकसभा निवडणूकीच्या तारीख जाहीर झाल्यानंतर त्यांनी उमेदवार निश्चित केले. दरम्यान मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या वेगवेगळ्या समाजाला सत्तेच्या जवळ नेण्याची महत्वकांक्षा बाळगलेल्या बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज आपली पहिली यादी जाहीर केली. जाहीर केलेले उमेदवार हे महाराष्ट्रातील त्या त्या जिल्ह्यात वर्षानुवर्षे राजकीय सामाजिक क्षेत्रात कामे करीत आलेली आहेत. परंतु त्यांना संधी मात्र कोणत्याही पक्षाने दिली नाही. अशाच उमेदवारांना बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवारी दिली आहे.
तब्बल ३६ उमेदवारांच्या या यादीत सर्वाधिक ६ धनगर उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. एकूण २१ वि...