धनकवडी सहकारनगर व सिंहगडरोड क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत पर्यावरणाचा विनाश
धनकवडी सहकारनगर व सिंहगडरोड क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत पर्यावरणाचा विनाशबांधकाम व्यावसायिकांसाठी झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल,हरपळे, निकाळजे चव्हाणांकडून माहिती लपविण्याचा अटोकाट प्रयत्न
पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/पुणे शहरातील उपनगर असलेल्या धनकवडी आणि सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत बांधकाम व्यावसायिकांसाठी झाडांच्या कत्तली सुरू आहेत. नियोजित बांधकामास खोदाईत येत असल्याचे कारण देवून वृक्ष तोडण्यास व वृक्ष पुर्नरोपनास मान्यता देण्यात येत आहे, झाडांचा विस्तार मोठा झाला आहे, झाडांच्या फांद्या इमारतीला घासत आहे, खिडक्यांना घासत आहे, विजेच्या तारांना घासत आहे अशा प्रकारची वेगवेगळी कारणे देवून, झाडांच्या फांदया तोडण्यास मान्यता दिल्यानंतर, फांदया तोडण्याऐवजी, संपूर्ण झाड मुळासहित कापुन काढले जात आहे. मागील दोन वर्षात किमान १५०० झाडांच्या कत्तली करण्यात आलेल्या असल्यामुळे तसेच पुर...