
डिकोल्ड टोटल, सॅरिडॉन सारख्या ३२७ गोळ्या-औषधांवर बंदी
नवी दिल्ली/दि/
ड्रग
टेक्नॉलॉजी ऍडव्हायजरी बोर्ड अर्थात डीटीएबीने दिलेल्या शिफारसींनुसार केंद्र सरकारने
डिकोल्ड टोटल आणि सॅरिडॉनसारख्या ३२७ औषधांवर बंदी घातली आहे. ही औषधे फिक्स्ड डोस
कॉम्बिनेशन (एफडीसी) औषधे आहेत असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे
एबॉट जशा आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत पिरामल, मॅक्सिऑड्स, सिप्ला आणि ल्यूपिन सारख्या
घरगुती औषध निर्मात्या कंपनीच्या औषधांवर प्रभाव होणार आहे. तर,
सरकारच्या या निर्णयाविरोधात औषध कंपन्या न्यायालयाचे दार ठोठावण्याची शक्यता वर्तवण्यात
येत आहे.
औषधनियंत्रक
विभागाकडे आलेल्या या तक्रारींची दखल घेत दोन वर्षांपूर्वी अशा ३४३ फिक्स्ड डोस कॉम्बिनेश...