राज्यात दोन वर्षांत ८१९ कारखाने बंद पडले उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तोंड वर करून सांगितले, कामगारांची उपासमार
subhash desai
मुंबई/दि/
महाराष्ट्र राज्यात विविध कारणांमुळे २०१५-१६ मध्ये १५४ तर २०१७-१८ मध्ये ८१९ कारखाने बंद पडले आहेत, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी विधान परिषदेत तोंड वर करून सांगितली. त्याचवेळी बंद पडलेले कारखाने सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असून, वर्षभरापासून बेरोजगारीवर मात करण्यासाठी उद्योग विभागातर्फे अथक प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती देसाई यांनी यावेळी दिली. यामुळे हजारो कामगारांवर उपासमारीची कुर्हाड कोसळली आहे.
राज्यात गेल्या काही वर्षांत बेरोजगारीचे प्रमाण सातत्याने वाढत असून,
नोटाबंदीच्या निर्णयामुळे लहान उद्योजक आणि किरकोळ व्यापार्यांना मोठा आर्थिक फटका
बसला आहे. राज्यातील कारखाने बंद पडत असल्यामुळे बेरोजगारीची समस्या तीव्र होत असून,
राज्यात ५० लाख शिक्षित तरुण बेरोजगार झाल्याविषयीच्य...