
पगारी नोकरदार पुणे महापालिकेचा, चाकरी मात्र बिल्डरची…….
Pune Pmc zon 7
कनिष्ठांच्या कसुरीचा डाग लागतोय वरीष्ठांवरी
धन्य ती पुणे महापालिका, धन्य ते रामचंद्र सोपान शिंदे आणि धन्य धन्य बांधकाम खाते ….
पुणे/दि/ प्रतिनिधी/ एैका एैका गोष्ट पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्र ७ ची… बांधकाम विभागातील शुक्रवार पेठ, बुधवार पेठेची… त्यातील काळ्या कर्माची, त्या कर्माच्या पोटी लपून बसलेल्या मर्माची… येशीला अब्रु टांगावी ह्या निच अधमाची … निच अधमाची.. सर्वसामान्य पेठेतला पुणेकर स्वतःच्या पडक्या, मोडकळीस आलेल्या वाड्याची- घराची डागडूजी करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून पुणे महापालिकेत चकरा मारून मारून त्याचे जोडे झिजले परंतु अधिकारी मात्र जागेवरून हलण्याचे नाव घेत नाहीत. परंतु दुसरीकडे ही अभियंता मंडळी बांधकाम व्यावसायिकांसाठी कसे राब राब राबतात अशा प्रकारची उदाहरणे देखील पुणे महापालिकेत कमी नाहीत. थोडक्यात पदाची ताकद पुणे मनपा...