गृहमंत्रालयाकडून पोलीस दलातील बदल्यांचे घाऊक आदेश
झोन क्र. १ वर ठाणे शहराच्या उपायुक्त प्रियंका नारनवरे तर झोन क्र. ४ वर वाहतुक शाखेचे पंकज देशमुख, स्वप्ना गोरे प्रतिक्षेत
पुणे/दि/ प्रतिनिधी/राज्याच्या गृह मंत्रालयाने पोलीस दलातील उपायुक्त, अधीक्षक व सहायक पोलीस आयुक्त संवर्गातील अधिकार्यांचे बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. कोरोना साथ रोगामुळे यावर्षी बदल्या करणार नाही असं सांगितल्याच्या दुसर्याच्या महिन्यापासून राज्यातील एका एका खात्यांच्या बदल्यांचे आदेश काढले जात आहेत. पोलीस दलात नियुक्तीसाठी जे अधिकारी प्रतिक्षेत आहेत, त्यांना कुठेही नियुक्ती न देता, आहे त्या पदावरील अधिकार्यांची एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी बदली आदेश काढले जात आहेत.
एमपीएससी मार्फत परिक्षा उत्तीण झालेल्या कित्येकांना मागील दोन ते तीन वर्षांपासून नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत. उपायुक्त दर्जाच्या अधिकार्यांना देखील वर्षानुवर्षे प्रतिक्षेत ठेवण्यात येत आ...









