
पुण्यातील मार्केटयार्ड पोलीस स्टेशन म्हणजे रिअल इस्टेटचे जंक्शन
Market yard police
खाकीचा धाक दाखवुन गाळा खरेदी विक्री करणं, जुन्या भाडेकरूला दम देवून काढून टाकणं, जागा, गाळे खाली करून देणं हा नव्याने सुरू केलाय धंदा
पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी हे आयुक्तालयाअंतर्गत येणार्या हद्दीतील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम सातत्याने करीत आहेत. कोरोना महामारीच्या प्रादुर्भावात देखील पोलीसांनी अत्यंत जिद्दीने आणि चिकाटीने त्याचा मुकाबला करून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम केलं आहे. राज्यातील व पुण्यातील बहुतांश वृत्तपत्रांनी व प्रसार माध्यमांनी पोलीसांचे कौतूक केले आहे. परंतु दुधात मिठाचा खडा पडावा असे कृत्य मार्केटयार्ड पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचार्यांचे दुर्वतन सुरू असल्याची बाब दिसून आली आहे.मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असून, दररोज शेकडो वाहने आणि हजारोंनी नागरीक येथे ख...