
वानवडी पोलीस स्टेशन हद्दीतील गोल्डन टच स्पा वेश्यालयावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा
साळुंके विहार परीसरात स्पा सेंटरचे नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या मसाज सेंटरवर गुन्हे शाखेचा छापा; 5 आरोपींविरुद्ध कारवाई, 4 पिडीत महीलांची सुटका.
पुणे/दि/ प्रतिनिधी/मध्यवर्ती पुणे शहरात रेड लाईट एरिया असल्याने त्या भागाला कायम कानफाटे हे नाव ठेवण्यात आले आहे. परंतु पुणे शहरातील बहुतांश पोलीस स्टेशन हद्दीत मसाज पार्लर व स्पा सेंटरच्या नावाखाली दिवस-रात्र वेश्याव्यवसाय सुरू असतांना, त्याच्यावर कारवाई करण्यात प्रशासकीय यंत्रणा कमी पडली आहे. दरम्यान सामाजिक सुरक्षा विभागाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश पुराणिक यांनी कायदा-सुव्यवस्था, सामजिक बांधिलकी, कायदयाव्दारे स्थापित कायदयाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात अग्रेसर असल्याने सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवार, दि. 3/8/22 रोजी वानवडी पोलिस स्टेशन हद्दीतील साळुंखे विहार या उच्चभ्रू परीसरातील 'गोल्डन टच स्पा', डी 101/102, गिरमे हाईट्स, ...