Tuesday, March 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Author: nationalforum

पोलीस पत्नीचा दुर्देवी मृत्यू आणि पुणे शहरातील पोलीसांच्या प्रशासकीय सोईच्या वजनदार बदल्या

पोलीस पत्नीचा दुर्देवी मृत्यू आणि पुणे शहरातील पोलीसांच्या प्रशासकीय सोईच्या वजनदार बदल्या

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/ पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/मुंबई पोलीस दलात कर्तव्यावार असतांना अपघाती मृत्यू झालेल्या झालेल्या पोलीसाच्या मृत्यूची चौकशी करावी यासाठी पोलीस पत्नीने सरकारकडे दाद मागितली परंतु, सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. शेवटी पोलीस पतीला न्याय मिळावा म्हणून त्या माऊलीने मंत्रालया समोर विष प्राशन करून मायबाप शासनाचे लक्ष वेधले. परंतु उपचारादरम्यान पोलीस पत्नीचा मृत्यू झाला. महिलांचा कैवार घेणाऱ्या एकाही राजकीय पक्षाने किंवा त्यांच्या महिला आघाड्या किंवा महिला आयोगाने देखील याची दखल घेतली नाही. सामाजिक राजकीय संघटनांनी साधे निवेदनही दिले नाही. इतकी अस्पृश्यता इथे पाळली गेली आहे. न्यायासाठी पोलीस आणि पोलीस पत्नीला जीव गमवावा लागला. यात सरकार पर्यंत आवाज पोहोचला नाहीच. आणि राजकीय पक्ष, संघटना यांच्या सह माध्यमांनी देखील याकडे साफ दुर्लक्ष करावे ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. याच ठिकाणी पो...
पुणे शहराला व्हॉटसॲप चॅटींग आणि हनीट्रॅपचा विळखा

पुणे शहराला व्हॉटसॲप चॅटींग आणि हनीट्रॅपचा विळखा

पोलीस क्राइम
लैंगिक उत्तेजना होणारा दाखविला व्हिडीओ, नग्न होण्यास पडले भाग… मग काय… झाले स्क्रीन रेकॉर्डिंग आणि गमाविले साडेचार लाख… वकीलाकडून बलात्काराची केस करण्याची धमकी, व्यावसायिकाला 17.50 लाखाला गंडा,ॲड. विक्रम भाटे व निधी दिक्षित यांच्याविरूद्ध हडपासर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/व्हॉटसॲप वरून फोन चॅटींग करून ओळख वाढवायची, चॅटींग करायचे, मग अश्लिल व्हिडीओ पाठवायचा, लैंगितक उत्तेजना वाढवायची पुढे नग्न होण्यास भाग पाडायचे, त्याच्याही पुढे स्वतःच्या फ्लॅटवर बोलावून घ्यायचे, फोटोंसह अश्लिलतेचा बाजार मांडायचा पुढे मग ब्लॅकमेलिंगला सुरूवात… घाबरून लाखो रुपयांना चुना… पुढचा रस्ता पोलीस स्टेशनचा… बस्सा बोंबलत…पुणे शहरात सध्या हनी ट्रॅपचे प्रकार सर्रास वाढले आहेत. दरम्यान सायबर क्राईम करणाऱ्यांचा धंदा अगदी तेजित आला आहे. पोलीसांकडून वारंवार सुचना देऊन देखील नागरीक...
पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात जाणिवपूर्वक खोडसाळपणा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाला कात्रजचा घाट
अधीक्षक व प्रशासन अधिकारी पदाच्या पदोन्नतीचा तिढा अधिक वाढला

पुणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात जाणिवपूर्वक खोडसाळपणा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाला कात्रजचा घाट
अधीक्षक व प्रशासन अधिकारी पदाच्या पदोन्नतीचा तिढा अधिक वाढला

सर्व साधारण
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/पुणे महापालिकेतील वर्ग 3 मधील वरिष्ठ लिपिक टंकलेखक ते उपअधीक्षक, उपअधीक्षक पदावरून अधीक्षक व अधीक्षक पदावरून प्रशासन अधिकारी पदाचा तिढा वाढला असून, कर्मचाऱ्यांमध्ये कमालिचा असंतोष निर्माण झाला आहे. एकाला एक न्याय तर दुसऱ्याला दुसरा न्याय अशी आज पुणे महापालिकेतील निर्णय घेण्याची पद्धत रूढ झाली असल्याचा संताप कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मानिव दिनांक देऊन देखील जाणिपूर्वक खोडसाळपणे पदोन्नती देण्यात वेळकाढुपणा केला जात असल्याचा आरोप करून ही बाब पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचली होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाला देखील कात्रजचा घाट दाखविण्याचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्या 7 मे 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार पुणे महापालिकेतील वरिष्ठ लिपिक या पदावरील कर्मचाऱ्यांना उपअधीक्षक या पदावर व उपअध...
गुन्हेगार आणि भांडवलदारांचा बंडगार्डन पोलीस स्टेशनवर कब्जा,
कोणत्याही क्राईम ब्रॅंचची बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत कुठल्याही प्रकारची कारवाई नाहीच…

गुन्हेगार आणि भांडवलदारांचा बंडगार्डन पोलीस स्टेशनवर कब्जा,
कोणत्याही क्राईम ब्रॅंचची बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत कुठल्याही प्रकारची कारवाई नाहीच…

पोलीस क्राइम
bandgardenpolicepune ज्यांच्या हद्दीत जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा न्यायाधिश असतांना देखील पोलीस स्टेशनवर नेमका कब्जा कोणी केला आहे…. पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/पोलीस स्टेशनवर ग्रेनेडचा हल्ला… शासकीय कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले आहे…शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आतंकवादयांनी निर्दयीपणे गोळीबार केला… इत्यादी.. इत्यादी बातम्या जम्मु व काश्मिरबाबत कुण्या ऐकेकाळात येत होत्या. आता मात्र सुसंस्कृत पुणे शहरातील बंडगार्डन पोलीस स्टेशनवर गुन्हेगारांसह भांडवलदारांनी कब्जा केला आहे असे म्हटले तर आश्यर्च वाटायला नको… ही वस्तुस्थिती आहे. दरम्यान बंडगार्डन पोलीस स्टेशनची अशी स्थिती असली तरी पुणे शहर पोलीस आयुक्तालयात वेगवेगळ्या प्रकारच्या 25/30 गुन्हे शाखा कार्यरत असतांना, त्या क्राईम ब्रॅंचने देखील बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत घुसून का...
गुन्हे युनिट 1 च्या शब्बीर सय्यदांची जब्बर कारवाई,
समर्थ हद्दीत 47 लाखांचा दरोडा घालणाऱ्यांना केले जेरबंद

गुन्हे युनिट 1 च्या शब्बीर सय्यदांची जब्बर कारवाई,
समर्थ हद्दीत 47 लाखांचा दरोडा घालणाऱ्यांना केले जेरबंद

पोलीस क्राइम
crime unite1 गाडीच्या नंबरप्लेटला चिखल फासला, तोंडावर मास्क, डोक्यावर टोपी आणि डोळ्यांना गॉगल सांगा आता तपास तरी कसा करायचा… नॅशनल फोरम/पुणे/दि/समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील सुमा पन्ना या नाना पेठेतील सिगारेट- बडीशेपच्या डिलरशिप असलेल्या दुकानातून मालाच्या विक्रीचे पैसे बँकेत भरण्यासाठी जात असतांना, सरावलेल्या दोन गुन्हेगारांनी त्यांच्या गाडीस मागून धक्का देवून, तुला गाडी निट चालवीता येत नाही का? असे म्हणुन त्यांचा रस्ता अडवून दोघांपैकी मागे बसलेल्या इसमाने त्यांना कोयत्याचा धाक दाखवून हाताने मारहाण करून त्यांच्याकडील रोख 47 लाख 26 हजार रुपये व एकुण 14 चेक असलेली बॅग जबरीने चोरून नेली होती. दरम्यान आरोपींनी वापरलेल्या काळ्या रंगाचे मोपेडचा नंबर आरोपींनी दोन्ही बाजुचे नंबरप्लेटवर चिखल लावल्याने नंबर प्राप्त झाला नव्हता व तोंडास मास्क, डोक्यावर टोपी, डोळ्यास गॉगल लावल्याने त्यांची ओळख पट...
पुणे महापालिकेतील नोकरभरती व पदोन्नतीच्या सट्टाबाजारावर कर्मचारी संघटना आक्रमक, पदोन्नतीची पदे आधी भरा मगच नोकरभरती करा

पुणे महापालिकेतील नोकरभरती व पदोन्नतीच्या सट्टाबाजारावर कर्मचारी संघटना आक्रमक, पदोन्नतीची पदे आधी भरा मगच नोकरभरती करा

सर्व साधारण
pmcpune महापालिकेतील कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता, गुणवत्ता व उच्च शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती दया, खुला व मागासांचा बॅकलॉग तत्काळ भरण्याची कामगार संघटनांची मागणीं पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महानगरपालिकेत सर्व खाते व पदांच्या बदली, पदोन्नती ,पदस्थापनेत लाखोंची बोली आणि कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत असून, पुणे महापालिकेतील सेवकांना सेवाज्येष्ठता,गुणवत्ता व उच्च शैक्षणिक पात्रतेनुसार प्रथम प्राधान्य देऊन तातडीने सर्व पदांसाठी सर्व सेवकांना पदोन्नती देण्यात यावी. तसेच महापालिकेतील पदोन्नतीसाठी पात्र सेवकांना कायम कामगारांच्या सर्व पदांसाठी पदोन्नतीने 75 टक्के आरक्षण देऊन, सर्व पदांसाठी अनुभवाची अट किमान 3 वर्ष ठेवण्याच्या मागणीसाठी 1.पुणे महापालिका कामगार युनियन, 2.पीएमसी एम्प्लाईज युनियन, 3.पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटना (क्रास्ट्राईब संलग्न) 4. पुणे महापालिका काम...
ओशो रजनिश आश्रम आंदोलकांवर कोरेगाव पार्क पोलीसांच्या लाठीमाराने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी,
कोरेगाव पार्क मध्ये देशविदेशातील महिलांकरवी सुरू असलेला देहव्यापार

ओशो रजनिश आश्रम आंदोलकांवर कोरेगाव पार्क पोलीसांच्या लाठीमाराने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी,
कोरेगाव पार्क मध्ये देशविदेशातील महिलांकरवी सुरू असलेला देहव्यापार

पोलीस क्राइम
पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumदेशातील पुणे शहरात एकमेव असलेल्या ओशो रजनिश आश्रमावर कोरेगाव पार्क पोलीसांनी बेछुट केलेल्या लाठीमारामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची बदनामी झाल्याची प्रतिक्रिया अनेक आंदोलकांनी दिली आहे. ओशो रजनिश आश्रमावर विदेशी नागरीकांचा कब्जा, ओशो जमिन विक्री प्रकरण आणि त्यावरील आंदोलनामुळे हा विषय चर्चेत आलेला आहे. दरम्यान कोरेगाव पार्क हा संपूर्ण परिसर जिल्हाधिकारी पुणे यांच्या अधिनस्थ असतांना, आंदोलनकांवर लाठीमार करण्याची परवानगी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून घेतली होती किंवा कसे याबाबत देखील आता विचारणा होत आहे. दरम्यान कोरेगाव पार्क परिसरात देशी विदेशी महिलांकरवी मोठ्या प्रमाणात देहव्यापाराचे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेक्स टुरिझम व महिलांच्या अपव्यापाराचे केंद्र झाल्याने, ही परिस्थिती हाताळण्यात कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनायक व...
पुणे महापालिकेच्या तिजोरीवर विधी खात्याचा दरोडा
न्यायालयाचा निकाल विरोधात लागल्यानंतर देखील अपील विहीत वेळेत न केल्यामुळे बँक खात्यातील 2 कोटी 81 लाख गोठविण्याचा न्यायालयाचा आदेश

पुणे महापालिकेच्या तिजोरीवर विधी खात्याचा दरोडा
न्यायालयाचा निकाल विरोधात लागल्यानंतर देखील अपील विहीत वेळेत न केल्यामुळे बँक खात्यातील 2 कोटी 81 लाख गोठविण्याचा न्यायालयाचा आदेश

शासन यंत्रणा
पुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे महापालिकेच्या विधी खात्यातील 5 हजार कोर्ट केसेस, 20 ते 25 हजार कोटींच्या मालमत्तेच्या वसुलीची प्रकरणे, (यात मोबाईल टॉवर 10 हजार कोटीची केस, पर्वती येथील 1 हजार कोटी रुपयांची केस, पुनावाला गार्डन या सारख्या अनेक कोर्ट केसेस), ॲडव्होकेट पॅनलची निवड, मनमानी वकीलांची निवड (ॲड.लिना कारंडे,ॲड. रोहन सराफ) काही विशिष्ठ वकीलांना 200/ 300 कोर्ट(उदा- ॲड. ज्ञानदेव चौधरी यांना 200/300 कोर्ट कसेसे) , काही वकीलांना 30/40 कोर्ट केसेस( काही ज्येष्ठ वकीलांकडून त्याही कोर्ट केसेस काढुन घेतल्या), बांधकाम, टॅक्स विभागातील कोर्ट प्रकरणे काही विशिष्ठ वकीलांना देणे(ॲड.ज्ञानदेव चौधरी,ॲड. संजय मुरकुटे), उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातील वकीलांची निवड व त्यांच्या फी बाबत धोरण निश्चित न करणे, बदली अधिनियमाला हरताळ फासत 10 ते 15 वर्षांपासून विशिष्ठ कर्मचाऱ्यांचा विधी खात्यात घरोबा(उदा-गोहर...
कलम 353 चा पोलीस व शासकीय कर्मचाऱ्यांकडून दुरूपयोग
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर कलम 353 चा सर्रास वापर

कलम 353 चा पोलीस व शासकीय कर्मचाऱ्यांकडून दुरूपयोग
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर कलम 353 चा सर्रास वापर

राजकीय
पुणे/दि/नॅशनल फोरम/शिवाजीनगर मार्गावरील एका पीएमपीएमएल बसने पुरम चौकात सिग्नल लागल्याने समोर असलेल्या कारला पाठीमागुन धडक दिली. कारमधील इसमांनी संबंधित बस चालकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. म्हणून कारचा चालक तसेच इतर तीन इसमांविरूद्ध भादवी 353 चा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी घटना कोंढवा येथील असून पुणे महापालिकेच्या टॅक्स विभागातील कर्मचारी मिळकतीच्या जप्तीचे वॉरंटची बजावणी करीत असतांना, मिळकतकर धारक संबंधित कर्मचाऱ्याच्या अंगावर धावुन येऊन अपशब्द वापरल्याने संबंधित नागरीकावर शासकीय कामात अडथळा केला म्हणून त्याच्या विरूद्ध भादवी 353 चा गुन्हा दाखल केला आहे. तिसरी घटना- पुणे महापालिकेवर दलित पँथरच्या मोर्चाव्दारे पारधी समाजाच्या न्याय मागण्यांचे निवेदन महापालिका आयुक्तांना देण्यासाठी जात असतांना, महापालिका आवारात असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, राष्ट्रपिता महात्मा फुलेंचा व...
पुणे महापालिकेत गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणाऱ्या शिवाजी दौंडकरांची एसीबी चौकशी कुणी थांबविली….

पुणे महापालिकेत गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणाऱ्या शिवाजी दौंडकरांची एसीबी चौकशी कुणी थांबविली….

सर्व साधारण
गृहमंत्रालयाच्या यादीनुसार पुणे मनपातील 31 भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या चौकशीबाबत आयुक्त गंभिर नसल्याचे टिपणपुणे/दि/ नॅशनल फोरम/पुणे महापालिकेचे आयुक्त श्री. विक्रम कुमार यांनी ॲन्टी करप्शन ब्युरो पुणे यांच्या रेकॉर्डवरील आरोपी इसम नामे शिवाजी भिकाजी दौंडकर, सोमनाथ हरिभाऊ बनकर व राकेश यल्लप्पा विटकर यांच्या विरूद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल नियम 79 च्या नियम 8 येथील तरतुदी विचारात घेवून महाराष्ट्र महापालिका अधिनियम 56 व सेवाविनियमन 56 अन्वये चौकशी करण्यात येत असून श्री. धनाजी भ. पाटील, उपसंचालक लेखा विभाग (सेवानिवृत्त) यांच्यामार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले होते. तसेच जगन्नाथ पवार प्रकल्प संचालक (सेवानिवृत्त) तथा चौकशी अधिकारी पुणे मनपा यांना कळविण्यात आले होते. तथापी शिवाजी दौंडकर यांच्या सेवानिवृत्तीस अवघे दोन महिने शिल्लक असतांना देखील त्यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्ट...