Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

विनायक गायकवाड यांची सुपर – डुपर कारवाई, कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई . दोन कोटी 20 लाखांचा कोकेन ड्रग्ज जप्त

पुणे/दि/ नॅशनल फोरम/
पुणे शहरासहित संपूर्ण जगाला अंमली पदार्थांचा विळखा पडला आहे. कालपर्यंत देशी- विदेशी मदय आणि गांजा-पन्नीपर्यंत नशेखोरी होती. परंतु आता नशेचे प्रकार बदलत गेले आहेत. आता गांजासहित मेफेड्रॉन, कोकेन, हेरॉईन, चर्रस यासारखी अंमली पदार्थांचे सेवन केले जात आहे. नशेचे इंजेक्शन घेतले जात आहे. यावर पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेने कंबर कसली असून, संपूर्ण पुणे शहरात धाडसत्र सुरू आहे. काल कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थ विभाग गुन्हे शाखा युनिट एक चे विनायक गायकवाड यांनी सुपर-डूपर कारवाई करून सुमारे दोन कोटी 20 लाख रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला आहे. तसेच अंमली पदार्थ विभाग युनिट क्र. दोन यांनी देखील हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत धडक कारवाई करून सुमारे 21 किलो गांजा जप्त करून 10 लाख 63 हजार रुपयांचा एैवज जप्त केला आहे. दोन्ही गुन्हे शाखा युनिटस्‌‍नी
दमदार कारवाई करून अंमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

रेकॉर्डवरील नायजेरीयन आरोपीस जेरबंद करून त्याचे कडुन 2,20,08,000/- रुपये किंमतीचे 01 किलो 081 ग्रॅम कोकेन हा अंमली पदार्थ व इतर ऐवज जप्त-
अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण डेंगळे, शैलजा जानकर व स्टाफ असे कोंढवा पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना स्टाफ मधील अंमलदार यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील नायजेरियन इसम नामे फॉलरिन अब्दुलअझीज अन्डोई, उंड्री मंतरवाडी परिसरात कोकेन या अंमली पदार्थ विक्री करीत आहे.
त्यानुसार प्राप्त झालेल्या बातमीचे अनुषंगाने मोबाईलचे तान्त्रिक विश्लेषण करुन त्यांनी बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना कळविला असता ते स्वतः सहा पोलीस निरीक्षक शैलजा जानकरव स्टाफ यांचेसह छापा कारवाई करणे करीता कायदेशीर सोपस्कर पार पाडुन रवाना झाले.
नमुद प्रमाणे मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने उंड्री येथील उंड्री चौकातुन मंतरवाडीकडे जाणारे रोडवरील आर पॉईन्ट सोसायटीचे समोर सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी रेकॉर्डवरील नायजेरीयन इसम नामे फॉलरिन अब्दुलअझीज अन्डोई हा त्याचेकडील कार घेवुन संशयितरीत्या उभा असलेला दिसला. त्याबाबत पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहा पोलीस निरीक्षक शैलजा जानकर व अंमली पदार्थ विरोधी पथकातील स्टाफने छापा कारवाई करुन नायजेरीयन इसम नामे फॉलरिन अब्दुलअझीज अन्डोई वय 50 वर्षे. सध्या रा. शकुंतला कानडे पार्क सर्व्हे नंबर 28/2 बी-1 विंग 11 मजला फ्लॅट नंबर 1104 उंड्री पुणे मुळ रा. नायजेरिया यांस ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता,
त्याचे ताब्यात एकुण 2,20,08000/- रु चा ऐवज त्यामध्ये 01 किलो 81 ग्रॅम कोकेन कि रु 2,16,20,000/- चा सहा मोबाईल फोन कि रु 16000/- चे एक कार कि रु 30,0000/- ची दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटे कि रु 2000/- रोख रुपये 70,000/- असा ऐवज व कोकेन हा अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या जवळ बाळगताना मिळुन आला आहे.
त्याबाबत कोंढवा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारी वरुन फॉलरिन अब्दुलअझीज अन्डोई याच्या विरुध्द एन. डी. पी. एस. ॲक्ट कलम 8 (क). 21 (क). प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपीवर यापुर्वी चतुश्रृंगी पोलीस ठाणे येथे कोकेन या अंमली पदार्थाचे तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल असुन नुकताच तो येरवडा कारागृहातुन जामीनावर मुक्त झाला होता तसेच कस्टम विभागाने सुध्दा त्याचेवर यापुर्वी कारवाई केली होती.
वरील नमुद कारवाई ही अंमली पदार्थ विरोधी पथक 1 गुन्हे शाखा पुणे शहर कडील श्री. विनायक गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा पोलीस निरीक्षक लक्ष्मण डेंगळे, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार प्रविण उत्तेकर, पांडुरंग पवार, मनोजकुमार साळुंके, विशाल दळवी, संदिप शिर्के, सुजित वाडेकर, राहुल जोशी, विशाल शिंदे, सचिन माळवे, संदेश काकडे, रेहाना शेख, योगेश मोहिते यांनी केली आहे.
हडपसर येथे छापा टाकुन गांजाची वाहतुक करणाऱ्या एक महिला व तीच्या साथिदारांकडून 21 किलो 688 ग्रॅम गांजा पकडला-
अंमली पदार्थ विरोधी पथक-2 कडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलीस उप-निरीक्षक एस डी नरके, पोलीस उप-निरीक्षक दिगंबर चव्हाण व स्टाफ असे परिमंडळ 4 व 5 मधील हडपसर पोलीस ठाणेच्या परीसरात पेट्रोलींग करीत असताना स्टाफ मधील पोलीस अंमलदार यांना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की काही इसम गांजा हा अंमली पदार्थ विक्रीकरीता येणार आहेत…
मिळालेल्या बातमी वरुन अंमली पदार्थ विरोधी पथक 2 कडील अधिकारी व स्टाफ यांनी वरील परीसरात सापळा लावला असता नोबल हॉस्पीटलचे मागील मोकळे पार्किंग समोरील सार्वजनिक रोडवर, हडपसर पुणे येथे एक महिला व एक इसम पांढऱ्या रंगाची एटींगा कार मध्ये संशयीतरित्या बसलेले दिसले. त्यांच्यावरील संशय बळावल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचा नाव पत्ता विचारता त्यांनी आपले नाव 1) एक महिला वय-27 वर्षे रा-रेणुका माता मंदिरा शेजारी केडगाव. अहमदनगर 2) अक्षय मिमा गाडे वय 25 वर्षे रा. शिवाजी नगर, नालेगाव, ता. जि. अहमदनगर असे सापडले.
त्यांची व एटींगा कारची झडती घेतली असता यांचे ताब्यात एकुण 10,63,760/- रु चा ऐवज त्यामध्ये 4,33,760/- रु चा 21 किलो 688 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ तसेच 30,000/- रू चे 3 मोबाईल संघ व 600000/- रु ची व एटींगा कार असा ऐवज संगनमताने, अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आले म्हणुन पोलीस अंमलदार रोकडे यांनी त्या तिघांचे विरुध्द हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. 1526 / 2022 एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम8 (क).20(ब)(क). 29 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस उप-निरीक्षक एस डी नरके यांनी गांजा हा अंमली पदार्थ जप्त केला असुन दाखल गुन्हयाचा तपास पोलीस उप-निरीक्षक, दिगंबर चव्हाण अंमली पदार्थ विरोधी पथक-2 गुन्हे शाखा हे करत आहेत.
वरील नमुद कारवाई ही अमंली पदार्थ विरोधी पथक 2 गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे, पोलीस उप-निरीक्षक एस डी नरके, पोलीस उप-निरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस अंमलदार संदिप शेळके, संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, रविद्र रोकडे, चेतन गायकवाड, साहिल शेख, आझीम शेख, मांढरे, नितीन जगदाळे. युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड महिला पोलीस अंमलदार दिशा खेवलकर यांनी केली आहे.