Friday, January 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

खडकी पोलीस स्टेशन हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडक कारवाई

अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या परकिय नागरीकाकडून 32 ग्रॅम 7 मिलीग्रॅम मेफेड्रॉन ( एम.डी ) व 16 ग्रॅम 4 मिलीग्रॅम मॅथेक्युलॉन हा अंमली पदार्थ अंमली पदार्थ विरोधी पथक 2. च्या स्टाफने पकडला

पुणे/दि/ प्रतिनिधी/
अंमली पदार्थ विरोधी पथक -2 कडील पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर पोलीस उप निरीक्षक एस डी नरके तसेच अंमली पदार्थ विरोधी पथक -2 कडील अंमलदार हे परिमंडळ 4 मधील खडकी पोलीस ठाणेच्या परीसरात पेट्रोलींग करीत असताना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की खडकी बाजार पुणे येथे एक परकिय नागरीक हा अंमली पदार्थ विक्री करीता येणार आहे. मिळालेल्या बातमी वरुन अंमली पदार्थ विरोधी पथक -2, कडील अधिकारी पोलीस निरीक्षक, प्रकाश खांडेकर, उप – निरीक्षक एस डी नरके व अंमलदार यांनी वरील परीसरात सापळा लावला असता, खडकी पुणे येथील खडकी बाजार ते साप्रस येरवडा कडे जाणाऱ्या रोडवर डाव्या बाजुला असलेल्या सार्वजनिक शैचालयाजवळ सार्वजनिक ठिकाणी परकिय नागरीक इसम नामे नसुबग इस्माइल वय 23 वर्षे , रा. औधं गाय वल्क बिल्डींग ए . फ्लॅट नं .11 औघं पुणे युगांडा देशाचा नागरीक हा त्याचे ताब्यात किं . रु . 7.30,200 / -रुकि.चा ऐवज त्यामध्ये 4,57,800/- रु किमतीचे 32 ग्रॅम 7 मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी. ) 2.62.400 रु किमतीचे 16 ग्रॅम 4 मिलीग्रॅम मॅथेक्युलॉन हा अंमली पदार्थ, 5.000 / -रु . किमतीचा मोबाईल संच व 5,000 / -रु रोख रक्कम असा ऐवज अनाधिकाराने बेकायदेशिररित्या विक्री करीता जवळ बाळगताना मिळुन आला आहे .
त्यांचे विरुध्द पो . अमंलदार चेतन गायकवाड यांनी खडकी पोलीस स्टेशन गु.र.नं .218/2022 . एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम 8 ( क ) . 22 ( ब ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे . पोलीस उप निरीक्षक एस डी नरके यांनी अंमली पदार्थ जप्त केला असुन दाखल गुन्हयाचा तपास दिगंबर चव्हाण पोलीस उप निरीक्षक अं.प.वि.प .2 , गुन्हे शाखा , पुणे शहर हे करत आहेत .
वरील नमुद कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक .2 गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर , पोलीस उप – निरीक्षक दिगंबर चव्हाण , पोलीस उप – निरीक्षक एस . डी . नरके , पोलीस अंमलदार संतोष देशपांडे , प्रशांत बोमादंडी . रोकडे , मयुर सुर्यवंशी , चेतन गायकवाड , साहिल शेख , दिशा खेवलकर . आझीम शेख योगेश मांढरे , नितीन जगदाळे , युवराज कांबळे व दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे .