Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेत कामगार कायदयांची एैशी की तैशी..

पुणे महापालिकेतील सुरक्षा रक्षकांना पगार नाही, सुट्टी नाही, नोकरीतून काढून टाकण्याची धमकी,

पुणे /दि/ प्रतिनिधी/
पुणे महापालिकेच्या वेगवेगळ्या आस्थांपना मध्ये कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांची आर्थिक सुरक्षाच हरवली आहे. सलगपणे वेतन मिळत नाही, कामावरून कधीही काढले जाते, वेतनात काहीही पूर्वकल्पना न देता कपात केली जाते, अशा अनेक गोष्टींनी हे सुरक्षा रक्षक हवालदिल झाले आहेत.

  • भारत सरकार व जिल्ह्याधिकाऱ्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण करण्याचे धाडस नितीन केंजळे मध्ये आले तरी कुठून…….
  • भारतीय संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर उपआयुक्त माधव जगताप यांचे नाव सांगुन- सुरक्षा रक्षकामार्फत दंडेली करण्यामागे नितीन केंजळेचा बोलविता धनी कोण आहे…
  • नितीन केंजळें- शिपाई ते क्लार्क… स्टेनो… आता कामगार कल्याण अधिकारी – सह सुरक्षा अधिकारी पद देखील आहे. लेखी परिक्षेत अर्धपास- तोंडी परिक्षेत तोंडभरून गुण घेवून, गुणांची लाखोंची भन्नाट भरारी कशी..
  • नियमबाह्य पत्रव्यवहार करण्याबाबत प्रचंड आग्रही….
  • सुरक्षा रक्षक अधिकारी म्हणून ईएसआय व ईपीएफ भरलेबाबत निवेदन मागविणे आणि स्वतःच कामगार कल्याण अधिकारी म्हणून … ईएसआय व ईपीएफची पुर्तता केली आहे खोटा स्वतःच शेरा मारणार… सुरक्षा रक्षकांची समस्या नेमकी कुठे आहे त्याचे रहस्य इथे दडले आहे….(पहा पुढील अंकात….)

राष्ट्रीय मजदुर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी सांगितले की, या संदर्भात प्रशासनाची अनेकदा भेट झाली. चर्चा झाली, परंतु त्यांच्याकडूुन काहीही दखल घेतली जात नाही. कामगार कायदयांतर्गत ज्या आस्थापनांमध्ये कंत्राटी नोकरदार आहेत, त्यांना ठेकेदारोंडून नीट वेतन मिळकत आहे काय, रजा, सुट्टी या सवलती मिळकतात हे पाहण्याची जबाबदारी त्या आस्थापनांच्या प्रशासनाची आहे. मात्र, त्यांच्याकडून काहीच केले जात नाही. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.
पुणे महापालिकेमध्ये क्रिस्टल कंपनीमार्फत कंत्राटी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे सुरक्षा रक्षक पुणे महापालिकेचा विविध आस्थापनांमध्ये दवाखाने, गार्डन, वेगवेगळ्या इमारती, कार्यालय यांची सुरक्षा ठेपण्याचे काम करीत आहेत. परंतु या सर्व सुरक्षा रक्षकांना कामगार कायदयांतर्गत कोणतेच लाभ मिळत नाहीत. त्याबबतची तक्रार अनेकदा पुणे महापालिकेकडे करण्यात आली आहे. परंतु अद्याप पर्यंत त्यावर कोणताही तोडगा निघत नाही. या सर्व कर्मचाऱ्यांना तीन चार महिने पगार उशिराने होत आहे. त्याच प्रमाणे त्यांच्या पगारात कोणतेही कारण न सांगता कपात केली जाते.
पगार स्लिप देण्यात येत नाही अशा अनेक तक्रारी सातत्याने येत आहेत. बऱ्याचदा कोणतेही कारण न सांगता कामावरून काढुन टाकले जाते. या तक्रारी संदर्भात अनेकदा महापलिकेचे आयुक्त संबधित अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. परंतु अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई होतांना दिसत नाही. त्यामुळे हे सर्व सुरक्षा रक्षक हवालदिल झाले असून त्यामध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे व लवकरच मोठे आंदोलन करण्याबाबतचा निर्णय घ्यावा लागेल असे राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी सांगितले.