Thursday, November 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

विमानतळ पोलीस स्टेशन श्रीमंताच्या एैयाशीची दुसरे बँकॉक अन्‌‍ दुबई, लाखो रूपयांचा अंमली पदार्थांचा साठा आजाद पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पकडला…

लाखो रूपयांचा अंमली पदार्थांचा साठा आजाद पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पकडला... पोलीस खऱ्या गुन्हेगारांवर कारवाई करणार की, अब्दुल सारखे अज्ञात इसमाच्या नावे गुन्हा नोंदवुन, खऱ्या गुन्हेगाराला संरक्षण देणार... काय ते सांगा...

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
महिलांचा वेश्याव्यवसायासाठी वापर करणे, अपव्यापार करणे, अंमली पदार्थांचे सेवक व विक्री याच्यावर भारतीय संविधान आणि भारतातील प्रचलित कायदयानुसार पुर्णतः बंदी असतांना देखील पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत मसाज पार्लर व स्पाच्या नावाखाली सुमारे 55 ते 60 ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच जागोजागा गांजा, मेफेड्रॉन, चर्रस सारखे अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे समोर आले आहे. तथापी स्थानिक पोलीस स्टेशन कोणतीही कारवाई करीत नसल्याचेही दिसून येत आहे. दरम्यान फुले, शाहू आंबेडकरी चळवळीतील आझाद समाज पार्टीने विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीतील अंमली पदार्थांचा भांडाफोड केला असून, काल मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर धाड टाकुन त्यांच्याकडून अंमली पदार्थ पोलीसांच्या हवाली केले आहे. जेंव्हा पोलीस त्यांचे कर्तव्य बजावित नाहीत त्यावेळी फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते स्वयंसेवक होवून, समाजाचे पहारेकरी होतात हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. दरम्यान परवाच दिवशी विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत सामाजिक सुरक्षा विभागाने हॉटेल इंटरनॅशनलवर छापेमारी करून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर कारवाई केली. त्यात एक राजस्थानी अभिनेत्रीसह दोन उझबेकिस्तान मधील महिलांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

शेकडो निवेदने तरी विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कारवाई करीत नाहीत-
दरम्यान विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीतील वाढलेला वेश्याव्यवसाय, अंमली पदार्थांची विक्री व जागोजाग वापर होत असल्याने त्या विरूद्ध अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी शेकडो निवेदने दिली आहेत. तथापी विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कारवाई करीत नसल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे या सर्व अवैध व बेकायदेशिर धंदयामध्ये पोलीसांचा सहभाग आहे किंवा कसे याबाबत देखील स्थानिक नागरीकांमध्ये चर्चा ऐकायला मिळत आहे.

अब्दुलच्या लाल-काळा जुगारालाही संरक्षण दिले –
दरम्यान मागिल महिन्यात नॅशनल फोरमने स्टींग ऑपरेशन करून पुणे नगर रोडवर मागील दोन तीन महिन्यांपासून अब्दुल नामक जुगाऱ्याने लाल-काळा जुगार अड्डा सुरू केला होता. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्यांना लुटालुट करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळेच त्याचे स्टींग ऑपरेशन केले. दरम्यान याच इसमाविरूद्ध विमानतळ पोलीस स्टेशन मध्ये तक्रार आल्यानंतर, पोलीसांनी केवळ अज्ञात इसमाविरूद्ध असे नमूद करून गुन्हा दाखल केला आहे. याचा अर्थ विमानतळ पोलीस गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्यांना पाठीशी घालत आहेत काय असाही सवाल आम्ही केला होता. परंतु आजपर्यंत पोलीसांना माहिती असलेल्या गुन्हेगारावर गुन्हा दाखल केला नाही. केवळ अज्ञात इसम नमूद करून गुन्हेगारांच्या गैरकृत्यांना पाठीशी घातले जात असल्याचेही समोर आले आहे.

आजाद समाज पार्टी कडून सिंम्बोयसेस कॉलेज समोर राजरोसपणे विक्री होत असलेल्या अमली पदार्थाचा पर्दाफाश
दरम्यान आझाद समाजा पार्टीने, पोलीसांना निवेदने देवून कारवाई होत नसल्याने स्वतः समाजाचे जागल्या होवून, कायदयाच्या राज्यासाठी अंमली पदार्थांच्या विक्री करणाऱ्यांचा शोध घेवून, त्यांच्याकडून अंमली पदार्थ काढुन ते विमानतळ पोलीस स्टेशन येथे दिले आहे. दरम्यान यातही विमानतळ पोलीस स्टेशन अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करून खऱ्या गुन्हेगारांना संरक्षण देणार आहेत की काय असाही सवाल कार्येकर्ते विचारत आहेत.
त्यांनीच पाठविलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे शहरामध्ये ससून – ललित पाटील प्रकरण ताजे असताना सर्रासपणे सिम्बॉयसिस कॉलेज समोर बेकायदेशीर रित्या कोणाचीही (पोलीसांची) भीती न बाळगता बिनधास्तपणे दिवसाढवळ्या करोडो रुपयांचा अंमली पदार्थाचा साठा करून सार्वजनिकरित्या नामांकित महाविद्यालय व शाळेतील विद्यार्थ्यांना सर्रासपणे व्यसनाच्या आहारी लावून युवा पिढीला देशोधडीला लावून, रक्कम रोख स्वरूपात व फोन पे, गुगल पे अश्या माध्यमातून रक्कम स्वीकारून सदरील धंदा हा सर्रासपणे चालू असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

तसेच ही बाब खूप गंभीर असून ललित पाटील प्रकरणात कोण कोणते मंत्री होते हा तपास अजून पूर्ण नसताना पुणे शहरातील एका नामांकित व उच्चभ्रू सोसायटीत, आयटी कंपनी व विमानतळ अशा सुरक्षित ठिकाणी कोणाच्या वरहस्ताने सर्रासपणे विक्री चालू आहे यासाठी आजाद समाज पार्टीने सदरील होत असलेला बेकायदेशीर अमली पदार्थ विक्रीचा पर्दाफाश करून संबंधितावर विमानतळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. तसेच 2024 मध्ये आझाद समाज पार्टी पुणे शहर नशा मुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 

तथापी पुण्याचे पोलीस आयुक्त श्री. विक्रम कुमार हे विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध व बेकायदेशिर कृत्यांना पायबंद घालण्यासाठी कोणती उपाययोजना करणार आहेत की नाहीत असाही सवाल व्यक्त केला जात आहे.