Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

तळजाई टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खुनाचे रहस्य उलगडले साडेतीन वर्षांनतर…पर्वती पोलीसांची कामगीरी

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
कानुन के हात बहोत लंबे होते असं आपण नेहमी ऐकतो. चित्रपटातही याचे डॉयलॉग असतात. दरम्यान पोलीस अधिकारी कणखर असतील तर कायदा आणखीन बळकट होतो. त्याचा प्रत्यय पर्वती पोलीस स्टेशन मध्ये आला आहे. पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जयराम पायगुडे यांच्यासह पो.नि. गुन्हे श्री.विजय खोमणे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामटे, पोलीस अंमलदार राजू जाधव, कुंदन शिंदे, नवनाथ भोसले, प्रशांत शिंदे, दयानंद तेलंगे, अंनिस तांबोळी, अमित सुर्वे, सद्याम शेख, ज्ञानेश्वर शिंदे, सुर्या जाधव यांनी साडेतीन वर्षापूर्वी झालेल्या खुनाचे रसह्य उलगडले आहे. अत्यंत किचकट व कोणताही पुरावा नसतांना, अतिशय पारंपारीक पद्धतीने पर्वती पोलीसांनी तपास करून गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे.

त्याबाबतची हकीकत अशी की,
दि. 17 ऑगस्ट 2020 रोजी पर्वती टेकडीच्या वरील बाजूस जंगलामध्ये पडक्या पाण्याच्या टाकीजवळ तळजाई टेकडीकडे जाण्या-या रस्त्याच्या खालच्या बाजूस एका महिलेचे प्रेत पडलेले दिसत आहे. ते प्रेत कुजलेले असून त्या ठिकाणी भयंकर दुर्गंधी येत असल्याची खबर निखील माने वय 19 वर्ष रा. जनता वसाहत गल्ली नंबर 88 पर्वती, पुणे यांनी समक्ष पोलीस ठाण्यात येवून कळविली. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची खबर मिळताच त्याठिकाणी तत्कालीन पोलीस पथक रवाना झाले. नमूद ठिकाणी अंदाजे 30 ते 35 वर्षे वयाच्या एका महिलेचा कुजलेला मृतदेह मिळून आला. पोलीसांनी तातडीने दखल घेवून अकस्मात मयत दाखल करून तपास सुरु केला. प्रेताचे पोस्टमार्टम केल्यावर मृत महिलेचा मृत्यू चेह-यावर व छातीवर गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्याने मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले होते.

मृत महिला वर्णन एक अनोळखी महिला वय अंदाजे 30 ते 35 अंगावर काळया रंगाचा . ब्लाउज व नारंगी रंगाचा परकर हातात काचेच्या बांगड्या व पायाच्या बोटांमध्ये जोडव्या तसेच या हातावर सुरेखा असे मराठीत गोंदलेले. याबाबत तात्कालीन पोलीसांनी अकस्मात मयत दाखल करुन तपास सुरु ठेवला होता.
परंतू नमूद महिलेची ओळख त्यांना पटू शकली नाही. दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी याबाबत पर्वती पोलीस ठाण्यात रितसर खुनाचा गुन्हा दाखल करुन त्याचा तपास वपोनि पायगुडे हे करीत होते. त्यानंतर वपोनि पायगुडे यांनी पर्वती पोलीसांची चार पथके तयार करुन संपूर्ण महाराष्ट्रातील मिसिंग महिलांचे रेकॉर्ड अत्यंत बारकाईने तसेच प्रत्यक्ष जावून शहर तसेच ग्रामीण हद्दीतील पोलीस स्टेशन्स येथे तपासले असता या वर्णनाची महिला ही दिनांक 12/08/2020 रोजी घरातून निघून गेली व परत आली नाही म्हणून रोहन संतोष चव्हाण यांनी राजगड पोलीस ठाणे अंकित खेड-शिवापूर पोलीस आऊटपोस्ट येथे मिसींग तक्रार दाखल केल्याचे निष्पन्न झाले...

याबाबत पोलीस निरीक्षक खोमणे व तपास पथकातील अंमलदार यांनी त्यानंतर रात्रंदिवस पाठपुरावा करुन रोहन चव्हाण यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे व बातमीदारांच्या सहाय्याने कोणत्याही प्रकारचा तांत्रिक पुरावा उपलब्ध  नसताना पारंपारिक पध्दतीने तपास करुन एका संशयीत इसमास ताव्यात घेतले. त्याच्याकडे अत्यंत हुशारीने चौकशी करता त्याने त्याचे नाव सागर दादाहरी साठे वय 26 वर्षे रा. सुतारदरा, कोथरुड, पुणे मुळ रा. पाटील इस्टेट, गल्ली नंबर 05, शिवाजीनगर, पुणे असे असल्याचे सांगून त्याने त्याच्या ओळखीची महिला नामे सुरेखा संतोष चव्हाण वय 36 वर्षे रा. वेताळनगर, शिवापूरवाडा ता. हवेली. जि. पुणे हिचा तत्कालीन वादातून व पैशासाठी खून केल्याचे कबूल केल्याने पर्वती पोलीस स्टेशन गु.र. नं 368/2023 भादंवि कलम 302 मध्ये अटक करण्यात आली आहे.

नमूद गुन्हयात सर्वप्रथम तिची ओळख पटणे हे महत्वाचे होते तसेच मयत महिला तसेच आरोपी यांचेबाबत काहीएक माहिती उपलब्ध नसताना पारंपारिक पध्दतीने पोलीस तपास करुन दोनच दिवसात पर्वती पोलीस ठाण्याच्या पथकाने वरील गुन्हा उघडकीस आणला आहे. पुढील तपास वपोनि पायगुडे हे करीत आहेत.

ही कामगीरी अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3, श्री सुहेल शर्मा, सहायक पोलीस आयुक्त सिंहगड विभाग आप्पासाहेब शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व.पो.नि जयराम पायगुडे, पो.नि. गुन्हे विजय खोमणे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामटे, पोलीस अंमलदार राजू जाधव, कुंदन शिंदे, नवनाथ भोसले, प्रशांत शिंदे, दयानंद तेलंगे, अंनिस तांबोळी, अमित सुर्वे, सद्याम शेख, ज्ञानेश्वर शिंदे, सुर्या जाधव यांनी केलेली आहे.