पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum
दरोडयाच्या गुन्हयातुन नुकताच जामीनावर सुटलेला व अंमली पदार्थाच्या तस्करीत सक्रिय असणाऱ्या गुन्हेगाराला 4 लाख 24 हजार रुपयाच्या 21 किलो 200 ग्रॅम गांजासह केले अंमली पदार्थ विभाग क्र. 2 ने जेरबंद करून त्याच्या विरूद्ध वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस आयुक्त, श्री रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री संदिप कर्णिक यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता तसेच अंमली पदार्थाच्या होणा-या तस्करीवर निर्बंध घालण्याकरीता आदेश दिले होते. त्याअनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथक दोन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुनिल थोपटे, सहा. पोलीस निरीक्षक, शैलजा जानकर व स्टाफ वानवडी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार, विशाल दळवी यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम पुणे वानवडी येथील हुतात्मा श्रीकांत लिंगायत रोडवरील हर्षवर्धन ग्राऊंडच्या फुटपाथ जवळ सार्वजनिक रोडवर गांजा विक्री करीता येणार असल्याची माहिती मिळाली.
सहा. पोलीस निरीक्षक, शैलजा जानकर व पोलीस अंमलदार यांनी सापळा रचुन थांबले असता इसम हर्षद हनुमंत थोरात, वय-20 वर्षे, रा. सिध्दार्थनगर गल्ली, एन. आय.बी.एम. कोंढवा, पुणे हा त्याच्या ताब्यात एकूण 4 लाख 29 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यामध्ये 5 हाजाराचा एक रेडमी- 9 कंपनीचा मोबाईल व 4 लाख 24 हजार रुपये किंमतीचा 21 किलो 200 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने, त्याचेविरुध्द वानवडी पोलीस स्टेशन येथे एन. डी. पि. एस. ॲक्ट कलम 8 (क), 20(ब) (क) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस निरीक्षक, सुनिल थोपटे अंमली पदार्थ विरोधी पथक - 2 गुन्हे शाखा पुणे शहर, सहा.पोलीस निरीक्षक, शैलजा जानकर, पोलीस अंमलदार, विशाल दळवी, ज्ञानेश्वर घोरपडे, मारुती पारधी, संदिप शिर्के, राहुल जोशी, संदेश काकडे व नितेश जाधव यांनी केली आहे...