Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेलचा चालक, मॅनेजरसह डिजेचा सामाजिक सुरक्षा गुन्हे शाखेने वाजविला बँड बाजा…

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पोलीसांनी एकदा कारवाई केल्यानंतर ते पुन्हा लगेच दुसरी कारवाई करणारच नाहीत अशा भ्रमात कुणी राहू नये असा संदेशच पुणे शहर पोलीसांनी दिला आहे. जेवढ्या वेळेस गुन्हा कराल तेवढ्या वेळेस थेटच कारवाई करू असा सज्जड दम शहर पोलीसांनी गुन्हे करणाऱ्यांना दिला असल्याची घटना समोर आली आहे. कोरेगाव पार्क येथील कोरा कॉकटेल बार ॲन्ड किचन या हॉटेलवर एकदा कारवाई झाली होती. त्यांना तंबी देवूनही पुनः त्यांनी गैरकृत्य केल्याने त्यांच्या विरूद्ध सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेने जब्बर कारवाई करण्यात आली आहे.


कोरेगाव पार्क येथील कोरा कॉकटेल बार ॲण्ड किचन हॉटेल, लेन नं 08, कोरगाव पार्क, पुणे येथे मोठयाने संगीत वाजवुन उपद्रव करताना मिळुन आले. अशाच प्रकारे दि. 18/11/2022 रोजी नमुद हॉटेलमध्ये मोठयाने संगीत वाजवुन उपद्रव चालु असताना मिळुन आल्याने त्याबाबत पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत ध्वनी प्रदुषण (विनियमन व नियंत्रण) अधिनियम 2000 नियमावलीचा भंग केल्याने आरोपी हॉटेल चालक, हॉटेल मॅनेजर, व डिजे चालवणारे हे पुन्हा अशाच प्रकारे त्यांचे मालकीचे कोरा कॉकटेल बार ॲण्ड किचन हॉटेल मध्ये मोठयाने संगीत वाजवुन उपद्रव करीत असताना मिळुन आले.
त्यांच्या विरूध्द सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार राणे यांनी भादवि कलम 268,290,291 प्रमाणे फिर्याद दिली आहे. तसेच 0240,000/- रू.चा. (दोन लाख चाळीस हजार रू.) मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व पुढील कारवाईसाठी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीतील ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय कुंभार तसेच सपोनि अश्विनी पाटील, सपोनि अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, आण्णा माने, प्रमोद मोहिते. हणमंत कांबळे. इरफान पठाण, पुष्पेंद्र चव्हाण, अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे.