Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेतील हजारो कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी,
महापालिका आयुक्त विक्रम कुमार, रविंद्र बिनवडे यांची
सीबीआय- ईडी मार्फत चौकशी करा

पुणे/दि/ प्रतिनिधी/national forum/
पुणे शहरातील 50 लाख लोकसंख्येसाठी सुमारे 35 हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांव्दारा पुणे महापालिकेचे प्रशासन चालविण्यात येत आहे. या 35 हजार कर्मचाऱ्यांची बदली, पदोन्नती तसेच काही विशिष्ठ अधिकाऱ्यांना पदांचा, अतिरिक्त पदभार व प्रभारी पदभार या पदांसाठी लाखोंची बोली आणि कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाला असून, याची रक्कम काही हजार कोटींच्या घरात पोहोचली असल्याचा अंदाज आहे. आज बहुतांश कर्मचारी पगाराला एका खात्यात आणि कामाला दुसऱ्या खात्यात आहेत. पदांचा बाजार मांडला गेला आहे. महाराष्ट्र शासनाचा बदलीचा अधिनियम निव्वळ कागदावर ठेवला गेला आहे. त्यामुळे या सर्व बदली, पदोन्नती, अतिरिक्त व प्रभारी पदभाराच्या गैरव्यवहारातील हजारो कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी पुणे महापालिकेचे आयुक्त
श्री. विक्रम कुमार आणि अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे यांची सीबीआय व ईडी मार्फत चौकशी करून, उपआयुक्त श्री. माधव जगताप, कामगार सल्लागार श्री. शिवाजी दौंडकर, विधी अधिकारी श्रीमती निशा चव्हाण यांच्यासह सामान्य प्रशासन विभागातील श्री. योगेश यादव, श्री. गोवंडे, श्री. दिनेश घुमे, श्री. राजेश उरडे, श्री.उदय बक्षी व विजय पवार यांची ईडी व एसआयटीमार्फत चौकशीची लेखी मागणी संबंधित कार्यालयांकडे केली असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या प्रवेशव्दारावर सुरू असलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून श्री. अनिरूद्ध चव्हाण यांनी दिली आहे.

महाराष्ट्र शासनाचा बदलीचा अधिनियम 2005 नुसार एका पदावर तीन वर्ष व एका विभागात सुमारे 5 वर्षांचा कालावधी संपुष्टात येण्याच्या अगोदर बदली करण्याचे निदेश राज्यपालांचे आदेशान्वये राज्य शासनाने जारी केलेले आहेत. तथापी पुणे महापालिकेत वर्ग 1 ते 4 कर्मचाऱ्यांच्या बदल्या केवळ कागदावर होत असून, प्रत्यक्षात एकही अधिकारी,कर्मचारी बदलीच्या जागी हजर होत नाही. बदली आणि पदोन्नतीत लाखो कोटी रुपयांचा  गैरव्यवहार झाला आहे. 

पुणे महापालिकेतील खाण्याची खाती आणि गाण्याची खाती, सर्वांना ज्ञात आहेत. पैकी, बांधकाम, पथ, टॅक्स अर्थात मिळकत कर विभाग, अतिक्रमण, आकाशचिन्ह विभाग, गब्बर खात्यांपैकी सामान्य प्रशासन विभाग, विधी विभाग, कामगार कल्याण विभागात पद व संवर्गनिहाय बदल्यांचे दर निश्चित केले आहेत. वर्ग 3 व 4 मधील बदल्यांची बोली 5 पाच लाखांपासुन सुरू होते. तर वर्ग 2 व 1 च्या बदलीसाठी सुमारे 20 लाखांपासून ते पुढे अधिकची बोली लावली जात आहे. 

एखाद्याला अधिकची पदे पदरात पाडून घ्यावयाची असतील तर, अतिरिक्त पदभार व प्रभारी पदभारांसाठी कोट्यवधी रुपयांची बोली आणि ज्या खात्यांकडे टेंडर, मंजुरी परवानगी देण्याची कामे असल्यास, पुढे टेंडरनिहाय 5 टक्क्यांच्या पुढील रक्कम निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याच्या आतच ती रक्कम मोठ्या साहेबांपर्यत पोहोचवावी लागत असल्याची माहिती समोर आली आहे.

अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र बिनवडेंचा बदली – पदोन्नतीबाबतचा आदेश-

पुणे महापालिकेच्या एक डालके दोन अतिरिक्त पंच्छी –
पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदांवर असलेले दोन आयएएस अधिकाऱ्यांमध्ये काही महिने वाक्‌‍युद्ध सुरू होते. त्यामुळे बदलीची प्रकरणे एकाकडे आणि टेंडर प्रकरणे दुसऱ्याकडे अशी काहीशी वाटणी झाल्यानंतर, दोन आयएएस अधिकाऱ्यांमध्ये बऱ्यापैकी समेट झाल्याचे ऐकिवात आहे. दरम्यान पुणे महापालिकेतील बदली आणि पदोन्नती बाबत अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे यांनी अतांत्रिक पदांना संरक्षण देवून तांत्रिक पदांबाबत एक आदेश जारी केला आहे. त्यात त्यांनी नमूद केलं आहे की, स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी संवर्गातील उपअभियंता, शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता या पदावरील कर्मचारी यांच्या प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी बदली, पदोन्नती व पदस्थापना करण्यात आलेल्या आहेत.
तथापी बदली व पदोन्नतीच्या खात्यांमध्ये अद्यापही अनेक सेवक हजर झाले नाहीत. तसेच त्यांना संबंधित खातेप्रमुख, विभाग प्रमुख यांनी कार्यमुक्त केले नसल्याची बाब निदर्शनास आली असल्याने संबंधित बदली व पदोन्नती झालेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवापुस्तकासह तत्काळ बदली खात्यात हजर व्हावे अन्यथा संबंधित सेवकांसह खातेप्रमुख/ विभाग प्रमुख यांच्याविरूद्ध प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असे दि. 16 डिसेंबर 2021 रोजीच्या कार्यालयीन आदेशात नमूद केले आहे.
2. अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे यांनी अतिरिक्त पदभाराबाबत दुसरे कार्यालयीन परिपत्रक डिसेंबर 2021 मध्ये काढले असून त्यात त्यांनी नमूद केले की, ज्या सेवकांकडे स्वतःचे मुळ पदाचे कामकाज सांभाळुन इतर खात्यांकडील कामकाजाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आलेला आहे, असे सेवक मुळ खत्याचे कामकाज करीत नाहीत किंवा मुळ खात्याचे प्रमुखांकडून त्यांनाकामकाज दिलने जात नाही आणि असे सेवक केवळ अतिरिक्त पदभार सोपविलेल्या खात्यात पूर्णवेळ कामकाज करीत आहेत असे आमच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे ज्या सेवकांकडे मूळ पदाचे कामकाज सांभाळुन अतिरिक्त पदाचे कामकाज दिलेले आहे, अशा सेवकांच्या मूळ खात्याने व अतिरिक्त पदभार दिलेल्या खात्याने दोन्हीकडे कामकाज करून घ्यावयाचे आहे. तसेच सेवक एकाच खात्यात कामकाज करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अथवा अशा स्वरूपाची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित दोन्ही खातेप्रमुख व सेवकांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असे नमूद केले आहे.
3. दरम्यान दि. 20 डिसेंबर 2022 रोजी पुन्हा अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे यांनी पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी कर्मचारी बदलीबाबत कार्यालयीन परिपत्रक जारी केले आहे. त्यात त्यांनी नमूद केले की, अतिरिक्त आयुक्त यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पारित केल्यानंतर काही खातेप्रमुख बदलीने नियुक्त सेवकांच्या खातेस्तरावर इतर विभागात/ खात्यात परस्पर पुन्हा बदल्यांचे आदेश प्रसृत करतात. दरम्यान वरिष्ठांनी दिलेल्या आदेशात परस्पर फेरबदल करणे/ वरिष्ठांचे आदेशांचे अंमलबजावणी न करणे ही बाब गंभिर व वरिष्ठांच्या आदेशांचे उल्लंघन करणारी असून, प्रशासकीयदृष्ट्या योग्य ठरत नाही. त्यामुळे ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे, त्यांना बदलीच्या खात्यात तत्काळ रूजु होण्यासाठी कार्यमुक्त करावे, वरिष्ठांचे आदेशात परस्पर फेरबदल करू नये अन्यथा संबंधित खातेप्रमुख, यांना जबाबदार धरून त्यांच्याविरूद्ध प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल असे नमूद आहे.
पुणे महानगरपालिकेची वरील तीनही कार्यालयीन आदेशांचे अवलोकन केले असता, थोडक्यात बदलीपात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना खातेप्रमुख, विभाग प्रमुख यांनी तत्काळ कार्यमुक्त करून, बदलीच्या खात्यात सेवकांनी रुजू व्हावे असाच या तीनही परिपत्रकांचा उद्देश असल्याचे दिसून येते. तथापी आजमितीस संपूर्ण पुणे महापालिकेतील काही प्रमुख खात्यांमध्ये मागील 10 ते 15 वर्षांपासून बदलीचे आदेश होवून देखील संबधित कर्मचारी बदलीच्या खात्यात रुजु झाले नाहीत. बदलीचे आदेश ज्या खात्यातून काढले जातात, त्याच आस्थापना, सामान्य प्रशासन विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रूजु झाले नाहीत. त्यामुळे प्रथम कारवाई आस्थापना विभागाच्या खातेप्रमुख, विभाग प्रमुख यांच्यावर करण्याची मागणी करण्यात येत आहे.
पुणे महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागाने, अतिरिक्त आयुक्त जनरल यांच्या आदेशाला लावल्या वाटाण्याच्या अक्षदा-
महाराष्ट्र शासनाचा बदल्यांचा अधिनियम 2005 नुसार पुणे महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियतकालिक बदल्या करण्याचे काम आस्थापना, सामान्य प्रशासन यांच्याकडे आहे. परंतु सामान्य प्रशासन विभागातच बदलीचा अधिनियमांची अंमलबजावणी केली जात नाही. मागील 10 ते 15 वर्षांपासून आस्थापना, सेवक वर्गातील अधिकाऱ्यांच्या कागदांवर बदल्या केल्या परंतु ते प्रत्यक्षात बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत. ती नावे पुढील प्रमाणे –

  1. श्री. योगेश यादव – लिपिक टंकलेखक
  2. श्री. गोवंडे – मिटर रिडर (तांत्रिक)
  3. श्री. दिनेश घुमे – लिपिक
  4. श्री. विजय पवार – लिपिक
  5. श्री. राजेश उरडे – वरीष्ट लिपिक
  6. श्री. उदय बक्षी -लिपिक
    (अनुक्रमे 1 ते 5 हे पुणे महापालिकेतील तांत्रिक व अतांत्रिक पदांच्या बदल्यांचे ठेकेदार म्हणून काम करीत आहेत. बदल्यांचे मास्टरमाईंड म्हणून योगेश यादव सह हे पाच पांडव ओळखले जातात.)
  7. श्री. स्वप्निल पिंगळे – लिपिक
  8. श्री. मनोहर सखराम डावखर – उपअधीक्षक
  9. श्री. राजेश चंद्रकांत गोंजारी – उपअधीक्षक
  10. श्री. संदीपक श्रीराम खेडेकर – उपअधीक्षक
  11. श्री. सोपान वांजळे – उपअधीक्षक
  12. श्री. सुनिल मोरे – उपअधीक्षक
  13. रजनी शिंदे – उपअधीक्षक
  14. श्री. विठ्ठल भरगुडे – वरीष्ठ लिपिक
  15. शुभांगी आल्हाट -वरीष्ठ लिपिक
  16. श्री. हर्षल सातपुढे – लिपिक
  17. श्री. प्रकाश घोडे – लिपिक
  18. मृणाल देशमुख – लिपिक
    18, पल्लवी सडेकर – लिपिक
  19. श्री. प्रकाश मोहिते – प्रशासन अधिकारी
  20. रोहीणी निगडे – स्टेनो
  21. श्री. निलेश बडंबे –
  22. श्री. श्री. महेश खर्चे – लिपिक
  23. दक्षा ढाणक – लिपिक
  24. पुजा गाडगीळ – लिपिक
  25. श्री. विकास बोरावके – लिपिक
  26. श्री. विनायक सुर्यवंशी – लिपिक
  27. श्री. जिजाभाऊ दातिर – लिपिक
  28. प्रत्येषा पोटफोडे – लिपिक
  29. रंजना शिंदे – लिपिक
  30. श्री. यतिन हेंद्रे – लिपिक
  31. आरती वाघेला – लिपिक
  32. श्वेता भणगे – लिपिक
  33. श्री. प्रथमेश मातेरे – लिपिक
  34. श्री. तुषार दारवटकर – लिपिक
    सामान्य प्रशासन विभागातील 1 ते 34 लेखनिक संवर्गातील कर्मचारी मागील 10 ते 15 वर्षांपासून एकाच कार्यालयात कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांसह खातेप्रमुख, विभाग प्रमुखांवर शिस्तभंगाची कारवाई अतिरिक्त आयुक्त श्री. बिनवडे यांनी का केली नाही. तसेच कारवाई न करण्यामागे कोणते रहस्य दडले आहे. अगदी विधी विभागातील देखील अशीच परिस्थिती आहे.
    विधी विभागात देखील मागील 10 ते 15 वर्षांत बदली अधिनियम आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. विधी विभागातील नावे खालील प्रमाणे –
  35. श्रीमती स्वाती साळवी- उच्चश्रेणी लघुलेखक – एकुण 11 वर्ष
  36. श्रीमती गोहर सय्यद – उच्चश्रेणी लघुलेखक – 11 वर्ष ( श्रीमती सय्यद ह्या लघुश्रेणी लघुलेखक म्हणून याच खात्यात काम करीत होत्या, व पदोन्नतीने पुनः याच खात्यात उच्चश्रेणी लघुलेखक म्हणून वर्ग 2 चे प्रमोशन घेतले आहे. बदलीच्या नियमानुसार पदोन्नतीपात्र कर्मचाऱ्यास आहे त्याच खात्यात पदोन्नती देता येत नाही असा नियम आहे. हाच नियम विधी विभागात मोडण्यात आलेला आहे.)
  37. श्रीमती रमा चव्हाण – उपअधीक्षक – 10 वर्ष
  38. श्रीमती विद्या बागल – उपअधीक्षक – 10 वर्ष ( श्रीमती विद्या बागल ह्या वरीष्ठ लिपिक म्हणून याच खात्यात काम करीत होत्या व पदोन्नतीने पुनः याच खात्यात उपअधीक्षक म्हणून वर्ग 2 चे प्रमोशन घेतले आहे. आता सेवानिवृत्त आहेत.)
  39. श्री. अमोल गोलांडे – लिपिक – 12 वर्ष
  40. श्रीमती वंदना पाटसकर – लिपिक – 12 वर्ष
  41. श्रीमती शारदा जाधव – शिपाई – 12 वर्ष
  42. श्री. गोवर्धन साळुंके – शिपाई – 12 वर्ष (यांची बदली झाली असली तरी दिवसातील 100 वेळा विधी विभागात येतात.
    थोडक्यात पुणे महापालिकेतील सामान्य प्रशासन, विधी विभाग यांच्या सारखेच कामगार कल्याण, सुरक्षा विभागात देखील बदल्यांचे आदेश कागदांवर काढले जातात. पंरतु प्रत्यक्षात एकही सेवक बदलीच्या खात्यात रुजु झालेला नाही.
    याच रितीने बांधकाम विभाग, टॅक्स विभाग, आकाशचिन्ह विभाग, अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या देखील कागदांवर केल्या जातात. परंतु प्रत्यक्षात बदलीच्या ठिकाणी कुणीही रुजू होत नाहीत. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे यांनीच काढलेल्या परित्रकानुसार संबधित सेवक व खातेप्रमुख, विभाग प्रमुखांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात कसुरी का करीत आहेत हा गहन प्रश्न आहे.
    पुणे महापालिकेतील बदली- पदोन्नती आणि टेंडर कामांचा गोरख धंदा –
    मटका अड्डा, जुगार अड्डा चालविणारे, अंमली पदार्थ विक्री करणारे अतिशय सरावलेले गुन्हेगार असतात. जुगार अड्डयांवर कारवाई होऊ नये म्हणून पोलीसांना हाताशी धरून अशा प्रकारचे धंदे राजरोसपणे पुणे शहरात सुरू आहेत. त्यांच्या या कृत्याला गोरख धंदा असे म्हणतात. परंतु पुणे महापालिकेत सुरू असलेला बदली आणि पदोन्नतीच्या काळ्या बाजाराला गोरख धंदा असेच म्हणावे लागेल. कायदयातील तरतुदींच्या अधिन राहून…. पांढऱ्या कागदांवर पेनाची शाई उठवुन… कागदी घोडा नाचवत… पुणे महापालिकेत व्हाईट क्राईम करणाऱ्यांची मोठी जमात कार्यरत आहे. दरवर्षी बदलीच्या पदांची लाखोंची बोली लावली जाते आणि कोट्यवधी रुपांचा गैरव्यवहार केला जात आहे. पुणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे हे कायदयाचे रक्षक असते, कायदयाची परिणामकारक अंमलबजावणी करणारे असते तर मागील दोन वर्षात बदलीचा एकही घोडा पुढे सरकला नाही. यावरून बदलीच्या घोडगंगेत आयुक्त श्री. विक्रम कुमार आणि अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे न्हाऊन निघाले आहेत असा त्याचा अर्थ घेण्यास काहीच हरकत नसावी. थोडक्यात पुणे महापालिकेत बदल्यांचा बाजार भरविला जातो आणि राज्य व केंद्र शासनाचे आयएएस व आयआरएस अधिकारी त्याच बदलीच्या घोडगंगेत न्हाऊन निघत आहेत हेच खरे सत्य आहे.
    पुणे महापालिकेतील बदली – पदोन्नतीचा सट्टा बाजार –
    थोडक्यात वरील प्रमाणे आयुक्त कार्यालयाचे कार्यालयीन आदेश आणि वस्तुस्थिती दर्शविली आहे. पुणे महापालिकेत बदली आणि पदोन्नतीमध्ये मोठा घोडाबाजार भरतो आणि त्याच घोडाबाजाराच्या घोडगंगेत अनेक अधिकारी न्हाऊन निघत आहेत. तांत्रिक पदांच्या अर्थात अभियांत्रिकी संवर्गातील स्थापत्य, विद्युत व तांत्रिक पदांसाठी 5 लाखांपासून ते 25 लाख रुपयांपर्यंत बोली लावली जाते. त्यात कनिष्ठ अभियंत्यांपासून ते मुख्य अभियंत्यांपर्यंत बदलीसाठी पैसे मोजावे लागतात. तर अतांत्रिक पदांसाठी देखील दोन लाखांपासून ते 20 लाख रुपयांपर्यंत बोली लावली जाते.
    पुणे महापालिकेत 18 हजार कायम सेवक आहेत. त्यामुळे या 18 हजार सेवकांनी प्रत्येकी एक लाख रुपये बदलीसाठी दिले तरी 18 कोटी रुपये रक्कम होते. 20 लाख रुपयांनी तीन हजार कर्मचाऱ्यांचे बदली रक्कम हजारो कोटी रुपयांमध्ये होत आहे. त्यामुळेच अनेकांचे लक्ष पुणे महापालिकेतील बदली आणि पदोन्नतीवर वळले आहे. यावर आता निर्बंध आणणे आवश्यक आहे. सामान्य प्रशासन मधील श्री. योगेश यादव, श्री. गोवंडे या मास्टरमाईंडसह 3. श्री. दिनेश घुमे, 4. श्री. विजय पवार व 4. श्री. उदय बक्षी यांची नार्को टेस्ट केल्यास, हजारो कोटी रुपयांची प्रकरणे बाहेर येण्यास मदत होईल. सर्व खात्यांच्या मनपसंद बदली खात्यांचे लाखो रुपये घेवून श्री योगेश यादव नेमकं कोणत्या अधिकाऱ्याकडे देतात… श्री. यादव यांच्या मागे कोणत्या राजकीय नेत्याचे बळ आहे… कुणी आमदार, खासदार, मंत्री आहेत काय… त्याचाही तपास होणे आवश्यक आहे. त्यामुळे या सहा जणांची नार्कोटेस्ट करण्याची मागणी होत आहे. तसेच यांच्या मालमत्तेची तपासणी होणे आवश्यक आहे. पुणे महापालिकेचे सध्या कार्यरत असलेले आयुक्त श्री. विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे यांच्या अपसंपदेची, मालमत्तेची केंद्रीय तपास यंत्रणेतील सी.बी.आय. (आर्थिक गुन्हे शाखा), ईडी मार्फत चौकशी करून…
    मुख्य कामगार अधिकारी 1. श्री. शिवाजी दौंडकर, उपआयुक्त 2. श्री. माधव जगताप व मुख्य विधी अधिकारी 3.श्रीमती निशा चव्हाण तसेच 4. श्री. योगेश यादव 5. श्री. गोवंडे 6. श्री. दिनेश घुमे 7. श्री. विजय पवार 8. श्री. राजेश उरडे 9. श्री. उदय बक्षी 10. श्री. राकेश विटकर 11.श्री. नितीन केंजळे यांची सी.आय.डी., ईडी व इतर गुन्हे तपास यंत्रणेमार्फत चौकशी करून त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. याच बरोबरीने मुख्य कामगार अधिकारी श्री. शिवाजी भिकाजी दौंडकर, उपआयुक्त श्री. माधव जगताप, मुख्य विधी अधिकारी श्रीमती निशा चव्हाण यांची देखील नार्कोटेस्ट केल्यास, खात्यांतर्गत केलेले हजारो कोटी रुपयांचे गैरव्यवहार समोर येण्यास मदत होईल.
    वरील सर्व बाबींचे अवलोकन करता, पुणे महापालिकेचे सध्या कार्यरत असलेले आयुक्त श्री. विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे यांच्या अपसंपदेची,मालमत्तेची केंद्रीय तपास यंत्रणेतील सी.बी.आय. (आर्थिक गुन्हे शाखा), ईडी मार्फत चौकशी केल्यास सत्य समोर येण्यास मदत होणार आहे.
  43. मुख्य कामगार अधिकारी श्री. शिवाजी भिकाजी दौंडकर, 2. उपआयुक्त श्री. माधव जगताप, 3. मुख्य विधी अधिकारी श्रीमती निशा चव्हाण यांच्यासह आस्थापना शाखेतील 4. श्री. योगेश यादव 5. श्री. गोवंडे 6. श्री. दिनेश घुमे 7. श्री. विजय पवार 8. श्री. राजेश उरडे 9. श्री. उदय बक्षी कामगार व सुरक्षा विभागातील 10. श्री. नितीन केंजळे व 11 श्री. राकेश विटकर इ.इ. या अनुक्रमे 1 ते 11 लोकसेवकांची सी.आय.डी. ईडी, एस.आय.टी मार्फत चौकशी केल्यास यांचे खरे गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन समोर येण्यास मदत होणार आहे.
    पुणेकरांना जाहीर आवाहन
    आज पुणे महापालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक 8 हजार कोटींचे आहे. दरम्यान विधी विभागाकडील मालमत्तेच्या थकित वसुलीच्या कायदेशिर बाबींचे मूल्य अंदाजे 50 हजार कोटी पर्यंत आहे. एकट्या मोबाईल टॉवरची वसुली 10 हजार कोटी रुपयांची आहे. मिळकत कर विभागाने देखील मागील 10 ते 15 वर्षांपासून ज्या मिळकतींचे सर्व्हेक्षण करून देखील मिळकतींची वसुली केली नाही त्याची एकुण रक्कमही अंदाजे 20 हजार कोटींपेक्षा कमी होणार नाही इतकी मोठी रक्कम असु शकते असा या विभागात काम करणाऱ्या सेवकांचा अंदाज आहे.
    बांधकाम, आकाशचिन्ह, अतिक्रमण यातूनही मोठी रक्कम येणे अपेक्षित आहे. एवढी सर्व रक्कम वसुल केल्यास, जगातील सर्वात श्रींमत महापालिका म्हणून पुणे महापालिकेला नावलौकिक मिळू शकते. एवढी मोठी रक्कम वसुल केल्यास, पुणे शहर हाँगकाँग, किंवा आखाती किंवा युरोपिय देशातील शहरासारखे पुणे शहर होऊ शकते. त्यामुळे पुणे शहराच्या विकासाठी प्रत्येक पुणेकरांनी पुढे येऊन ह्या अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी करणे आवश्यक आहे.
    मागील तीन चार वर्षांपासून आम्ही माहिती अधिकार, तक्रार अर्ज करीत आहोत. शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत.
    तसेच दि. 1 नोव्हेंबर 2022 पासून पुणे महापालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारावर हलगी बजाव धरणे आंदोलन सुरू करून पुणेकरांना जागृत करण्याचे तसेच प्रशासनाला जागे करण्याचे काम सुरू केले आहे. या आंदोलनात सहभागी होवून पुणेकरांनी, पुणे शहराच्या विकासासाठी पुढे येणे आवश्यक आहे असे आंदोलनाचे सहभागी निमंत्रक म्हणून श्री. अनिरूद्ध शालन चव्हाण यांनी पुणेकरांना भावनिक आवाहन केले आहे.