Tuesday, December 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत 25 जुगार अड्डे,

Gambling dens within Swargate police station

सामाजिक सुरक्षा गुन्हे शाखा कारवाई करते, मग स्वारगेट पोलीसांना जुगार अड्ड्याविषयी काहीच माहिती नाहीये काय….
स्वारगेट पो. स्टे. हद्दीतील कुप्रसिध्द शब्बीर मोहम्मद शेख उर्फ शाहू याच्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा,
दीड लाखाच्या मुद्देमालासह, एकुण 12 आरोपींविरुद्ध कारवाई.

पुणे/दि/ प्रतिनिधी/
स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत 25 पेक्षा अधिक जुगार अड्डे कार्यरत असल्याची माहिती समोर आली असून, 25 पैकी 12 धंदे रिक्षा, टू व्हिलर, रस्त्यावर थांबुन जुगार घेतला जात आहे तर, 13/14 ठिकाणी दुकाने, घरातून जुगार अड्डे व रमीचे क्लब चालविले जात असल्याचे गुन्हे शाखेच्या निदर्शनास आले आहे. तसेच याच ठिकाणाहून अंमली पदार्थांची देखील तस्करी होत असल्याचे आढळुन आल्याने, आज स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील 25 पैकी एका जुगार अड्डयावर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली असून, सुमारे दीड लाखाच्या मुद्देमालासह सुमारे 12 आरोपींविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान एकाच पोलीस स्टेशन हद्दीत 25 पेक्षा अधिक संख्येने जुगार अड्डे चालत असतांना ही बाब पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखांना माहिती होते परंतु पोलीस स्टेशन यांना माहिती नाहीये काय असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांनीच केलेल्या घोषणेनुसार कारवाईची मागणी होत आहे.

  • स्वारगेट पो. स्टे. हद्दीतील कुप्रसिध्द शब्बीर मोहम्मद शेख उर्फ शाहू याच्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा,
    दीड लाखाच्या मुद्देमालासह, एकुण 12 आरोपींविरुद्ध कारवाई.
  • मोबाईल जुगारासाठी आता भाडोत्री रीक्षाचा वापर.
  • स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत जुगार अड्डा चालवणारा मालक नामे साबीर ऊर्फ शब्बीर ऊर्फ शाहू मोहम्मद शेख हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार अवैध मटक्याच्या धंद्याबाबत मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार, स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, मार्केट यार्ड पेट्रोल पंपाच्या समोर, नवनाथ हॉटेल शेजारी सार्वजनिक शौचालयाचे बाजूला पिंपळाचे झाडाखाली सार्वजनिक जागेत इसम नामे संतोष साठे यांच्या मालकीच्या रिक्षा नंबर एम एच 12 आर पी 5274 या पॅसेंजर रिक्षामध्ये बसून, गैर कायदेशीररीत्या पैशावर कल्याण मटका जुगार खेळत व खेळवत असलेचे समजलेने, पंचासमक्ष छापा टाकून कल्याण मटका जुगार वगैरे खेळणारे 3, खेळवणारे 2 व पाहीजे आरोपी 2 असे व 5 अनोळखी इसम ( पळून गेलेले ) असे एकुण 12 इसमांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

मोबाईल जुगारासाठी आता भाडोत्री रीक्षाचा वापर-
गेल्या काही दिवसांपासून सामाजिक सुरक्षा विभागाकडून सुरू असलेल्या छापा कारवायांमुळे आता मटका बहाद्दरांनी भाडोत्री रीक्षाचा वापर जुगारासाठी सुरु केला असल्याचे निदर्शनास आले आहे. भाडोत्री रीक्षा दर दिवसाला रु. 800 ते 1000 ने भाड्याने घेऊन त्यातच मटक्याचा जुगार सुरू होतो. त्यामुळे आसपासचे लोकांना समजतही नाही. परंतू सदर रीक्षाचे आसपास पडलेल्या मटक्याचे चिठ्ठ्यावरुन पोलीसांनी सदर कारवाई केली आणि त्यात रीक्षाही हस्तगत केली आहे.
जुगार अड्ड्याचा मालक कुप्रसिद्ध गुन्हेगार –
स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत जुगार अड्डा चालवणारा मालक नामे साबीर ऊर्फ शब्बीर ऊर्फ शाहू मोहम्मद शेख हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून त्यावर यापुर्वीचे अनेक गुन्हे दाखल असूनही तो अद्यापही स्वारगेट हद्दीत अवैध धंदे चालवीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

या ठिकाणी अटक/कारवाई केलेल्या आरोपीत इसमांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. –
अ) जुगार खेळवणारे आरोपींची नावे (जुगार रायटर)
1) तुषार रवींद्र विश्वमित्र, वय 23 वर्षे, रा.ठी. महर्षीनगर, अरुण वसपल्ली गार्डनसमोर, नंबर 1, गुलटेकडी औद्योगिक वसाहत, पुणे.
2) सलीम अलाउद्दीन शेख, वय 30 वर्षे, रा.ठी. फुलोरा हॉटेल, मार्केट यार्ड, पुणे.
ब) जुगार खेळणारे आरोपींची नावे
3) श्रीकांत सिताराम म्हेत्रे, वय 34 वर्षे, रा.ठी. अरुण वसपदी गार्डनजवळ, महर्षीनगर, पुणे.
4) विजू नामदेव चांदणे, वय 33 वर्षे, रा.ठी. 425/26, मीनाताई ठाकरे वसाहत, लेन नंबर 14, गुलटेकडी, 5) इरफान सलीम बांगी, वय 23 वर्षे, रा.ठी. गिरीधर भवनसमोर, इंदिरानगर, गुलटेकडी, पुणे.
क) पाहिजे आरोपींची नांवे-
6) शब्बीर उर्फ साबीर ऊर्फ शाहू मोहम्मद शेख, जुगार अड्डा मालक, रा.ठी. 427, इंदिरानगर, गुलटेकडी, मार्केट यार्ड, पुणे 411037. दुसरा पत्ता – कोंढवा, पुणे. (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) 7) रिक्षा चालक संतोष साठे रा. ठी. इंदिरानगर, गुलटेकडी, पुणे (पुर्ण पत्ता माहीत नाही)8 ते 12) पळून गेलेले अनोळखी पाच इसम, नांव पत्ता माहीत नाही.
स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील जुगार अड्ड्यावरील अटक/कारवाई करण्यात आलेल्या आरोपीत इसमांकडून व घटनास्थळावरुन एकुण रु. 1,41,040/- चा मुद्देमाल (त्यामध्ये रोख रु. 6040/-, तसेच रु. 25,000/- किंमतीचे 3 मोबाईल सेट्स व रु. 1,10,000/- किमतीची एक रिक्षा (क्र. एम. एच. 12 आर पी 5274) हस्तगत करण्यात आली आहे.
या अटक/कारवाई केलेल्या आरोपींविरुद्ध स्वारगेट पोलिस स्टेशन येथे गु. र. क्र. 159/22, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील सामाजिक सुरक्षा विभागाची ही कारवाई श्री. अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदीप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, श्री. रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे व श्री. श्रीनिवास घाटगे, पोलीस उपायुक्त, गुन्हे यांचे आदेश व मार्गदर्शनखाली,
सामाजिक सुरक्षा विभागाकडील वपोनि राजेश पुराणिक, मपोउनि पंढरकर, पोह मोहिते, पोह राणे, पोना माने, पोना जमदाडे, पोना पठाण, पोशि कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.