पुणे/दि/ प्रतिनिधी/
सध्या कोरोना संसर्ग महामारीने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. प्रत्येजण पोटासाठी नाही पण आरोग्य थोडक्यात जीवंत राहण्यासाठी सतत धडपडत आहे. त्यामुळे हॉस्पीटल चालक, मेडीकल दुकाने भलतीच मालामाल झाली असल्याचे दिसून येत आहे. नाशिक मधील एका डॉक्टरने तर चक्क १२०० रुपयांचे रेमडेसिव्हीर २५ हजार रुपयांना विकल्याचे समोर आले आहे. पुण्यातही अनेक औषधांचा पूर्वापार काळाबाजार सुरू असून, ज्या ज्या हॉस्पीटलवर वर्षानुवर्ष मोठ मोठाली कर्जे, देणी होती, ती सगळी कर्ज, कामगारांची देणी हे सगळेच्या सगळे कर्ज देणी एकट्या कोरोना महामारीने फेडून टाकले असल्याचे सध्या दिसून येत आहे. त्यामुळे ही नेमकी कोणत्या प्रकारची आरोग्य सेवा आहे याकडे आता लक्ष देणे आवश्यक ठरले आहे.
संपूर्ण जगात कोरोना महामारीचा संसर्ग वाढत आहे. मागील दीड वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. सोशलमिडीयातून याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. प्रत्येज जण घाबरलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपआपली आणि आपल्या नातेवाईकांची काळजी घेत आहे. तरीही कोरोनाची एवढी धडकी भरली आहे की, स्वतःच्या घरात आल्यानंतर देखील, बाहेर आणि घरातही सोशल डिस्टनिंग अर्थात सामाजिक अंतर ठेवले जात आहे. हे आरोग्यासाठी नसून भितीपोटी केले जात असल्याचे दिसून येत आहे. जो तो जीव वाचविण्यासाठी पळत सुटला आहे. एवढी धडकी कोरोनाने भरली आहे.
याच (गैर) फायदा आरोग्य सेवा करणार्यांनी उचलल्याचे दिसून येत आहे. मागच्या १५ दिवसापूर्वी, पुणे महानगरपालिकेत नव्याने कोरोना हॉस्पीटल सुरू करण्यासाठी नवीन प्रस्ताव सादर झाले आहेत. कोरोना हॉस्पीटलचे दर नेमके काय आहेत, याची विचारणा, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधितांकडे केली आहे. नव्याने कोरोना हॉस्पीटल सुरू करू इच्छिणार्यांनी आरोग्य सेवेचे इतके भले मोठे दर आकारणीचे पत्र व प्रस्ताव सादर केला आहे की, पुणे महानगरपालिकेतील आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचार्यांचे डोळे पांढरे झाले. आवाक्क् होवून त्या दर पत्रकाकडे पाहतच राहिले होते. एवढे भयंकर दर आरोग्य सेवा कारणारांनी पुणे महापालिकेला दिले आहेत. यावरून ही नेमकी कोणत्या प्रकारची सेवा आहे, हे एव्हाना आता संबंध पुणेकरांना आणि पुणे महापालिकेतील आरोग्य विभागाला पुरते उमगले आहे.
सगळीकडे लुटालुट सुरू आहे. खरं तर ज्याचं दुखत त्यालाच हे कळतं. इतर मात्र आजही आरोग्य सेवेसाठी पळत सुटले आहेत. त्यामुळे स्वतःचे आणि आपल्या आप्त स्वकीयांचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आपली रक्कम खर्च करा. हॉस्पीटलवर वारेमाप खर्च करून, हॉस्पीटलची कर्ज, कामगारांची देणी, उधार्या चुकविण्यासाठी स्वतःची रक्कम खर्च करू नका. सोशल डिस्टनिंग पाळणे हे सर्वांचे कर्तव्यच आहे. परंतु इतकाही दुरावा नको की, जेणेकरून सगळेच आपल्यापासून दूर होतील.