
नॅशनल फोरम /पुणे/ दि/ प्रतिनिधी
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतून सुमारे चार मोटरसायकल वाहनांची जबरी चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. 4 वाहन चोरीचे गुन्हे दाखल झाले होते दरम्यान फरासखाना पोलिसांनी फरासखाना स्टाईलने चोरीचा छडा लावण्यात यश आले असून वाहन चोरास मोठ्या सिताफिने अटक करण्यात आली आहे.
गुन्हे उघडकीस आणण्यात प्रत्येक गुन्हे शाखेची व प्रत्येक पोलीस स्टेशनची वेगवेगळी स्टाईल किंवा पॅटर्न असतो तसाच पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील फरासखाना पोलीस स्टेशनचा वेगळाच फरासखाना पॅटर्न आहे फरासखाना स्टाईलने अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत त्यामुळे या हद्दीत सहसा जबरी चोऱ्या किंवा शरीर किंवा मालमत्ते विरुद्ध गुन्हे करण्यास गुन्हेगार व आरोपी तयार होत नसतात.
फरासखाना पॅटर्न माहिती असताना देखील फरसखाना हद्दीत सुमारे चार मोटरसायकल चोरीच्या घटना घडल्याने खळबळ उडाली होती.
दरम्यान फरसखाना पोलीस स्टेशनचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी तपास पथकातील अधिकारी व पोलिस अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन केल्यानंतर तपास पथकातील पोलीस हवालदार गजानन सोनवणे व पोलीस अंमलदार चेतन होळकर यांनी अतिशय शिताफीने तपास करून गोपनीय माहिती काढून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे.
तपास पथकातील पोलीस हवा. गजानन सोनुने व पो.अं. चेतन होळकर यांनी आरोपी नामे रामेश्वर दशरथ बोडखे( वय ३२ वर्षे, सध्या रा. नविन बिल्डींग, ग्रीन पॅलेस हॉटेल, बुधवार पेठ, पुणे) यास पोलीस स्टाफचे मदतीने , शिताफिने ताब्यात घेवुन त्याकडे वाहन चोरीबाबत विश्वासात घेवुन तपास केला.
त्यात फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीतुन एकूण ०४ मोटार सायकल चोरी केल्याचे कबूल केले. त्यानंतर त्यास फरासखाना पोलीस स्टेशन गु.र.नं.१८९/२०२६ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३०३ (२) या गुन्हयात अटक करुन, पोलीस कोठडी दरम्याने त्याने निर्जनस्थळी लपवून ठेवलेल्या अंदाजे ९० हजार रुपये किमंतीच्या ०४ मोटार सायकल काढून दिल्याने त्या पंचासमक्ष जप्त करुन, फरासखाना पोलीस स्टेशन कडील ०४ गुन्हे उघडकीस आणण्यात फरासखाना पोलीस स्टेशन येथील तपास पथकाला यश आलेले आहे. गुन्हयाचा पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री संदिप देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गजानन सोनुने हे करीत आहे.
सदरची कामगिरी श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त, श्री. प्रविण दराडे, पोलीस सह आयुक्त श्री. राजेश बनसोडे अपर पोलीस आयुक्त, श्री. कृषिकेश रावले पोलीस उप-आयुक्त, परि १ पुणे, श्रीमती अनुजा देशमाने सहा. पो. आयुक्त फरासखाना विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली
वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदिप देशमाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. राजेश महाला, पोलीस उप-निरीक्षक राजेंद्र पाटोळे, पोलीस उप-निरीक्षक प्रणिल चौगले, पोलीस अंमलदार कृष्णा निवाळकर, नितीन तेलंगे, गजानन सोनुने, चेतन होळकर, महेश पवार, नितीन जाधव, प्रविण पासलकर, महेश राठोड, सुमित खुट्टे, प्रशांत पालांडे, यांनी केलेली आहे.
