Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरची सततची भाववाढ नेमकं काय घडवणार आहे ?

पेट्रोलची गरज दुचाकी वापरायला, खाजगी वाहनांना सगळ्यात जास्त लागते. भारतातली ९० टक्के मालवाहतूक डिझेल मालवाहू वाहने, डिझेल रेल्वे इंजिन, डिझेलवर चालणार्‍या जलवाहतूक बोटी याद्वारे होते. डिझेलच्या किमतीत होणारी वाढ थेट सगळ्याच वस्तूंच्या किमती वाढवायला कारणीभूत ठरते. अजूनही मालवाहतूक करणार्‍या टेम्पो, तीन चाकी वाहने, ट्रक यांना डिझेलचे भाव जेवढे वाढलेत त्या प्रमाणात भाडे वाढवून मिळालेले नाहीत. डिझेलच्या भाववाढीच्या नावाखाली सगळा मलिदा आणि मलाई फक्त व्यापारी खात आहेत. या वाहतूक व्यवसायिकांना कमी भाड्यात धंदा करणे अपरिहार्य आहे, नफा अतिशय कमी असला तरीही कर्जाचे हप्ते, वाहनाचे टायर्स, विमा, सरकारी कर या सगळ्यांना पर्याय नाही म्हणून वाहतूकदार अतिशय कमी मार्जिनवर काम करत आहेत, मात्र या कोंडीचा स्फोट कधीही होऊ शकतो आणि वस्तूंच्या किमतीत अजून जास्त आणि मोठी भाववाढ होऊ शकते. ही महागाई अभूतपूर्व असेल, ज्यामुळे कोट्यावधी मध्यमवर्गीय कुटुंब गरिबी रेषेच्याखाली जातील.


डिझेल फक्त वाहतुकीला वापरल जात नाही. डिझेल मोठ्या प्रमाणावर मासेमारी करणार्‍या बोटी, शेतात चालणारे ट्रॅक्टर,गहू मळणी यंत्र आणि वेगवेगळी शेतीची यंत्रे यासाठीही वापरल जात. वाढलेले डिझेलचे भाव या व्यवसायाचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढवत आहेत. परिणामत: छोटे शेतकरी, मासेमारी करणारे छोटे व्यवसायिक यांना व्यवसाय करण कठीण झालेलं आहे. मासेमारी किंवा शेतीची मशागत हि प्रातिनिधिक उदाहरण झाली, असे अनेक व्यवसाय आहेत जिथे रोज कामासाठी इंधनाचा वापर अनिवार्य आहे तिथे उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे.
एकीकडे व्यवसायाचा खर्च वाढलेला आहे, शेती, मासेमारी किंवा अन्य कुठल्याही व्यवसायात वाढलेल्या डिझेलच्या किमती मार्जिन कमी करत आहेत आणि दुसरीकडे भाववाढ झाल्याने महिन्याच सगळच बजेट कोलमडून जाऊन सामान्य माणूस अजूनच पिळून निघत आहे. पेट्रोल, डीझेल, एलपीजी सिलिंडर यांची भाववाढ म्हणूनच भयावह आहे. अमक्या देशात दीडशे रुपये पेट्रोल आहे असं म्हणणार्‍या बिनडोक लोकांना बैलगाडीला बैल काढून मानेवर जू देऊन जुपायला पाहिजे.
इंधनाच्या किमतीची तुलना करताना देशातल्या जनतेच दरडोई उत्पन्न काय आहे हे बघणार कि नाही? महिन्याला लाखभर रुपये उत्पन्न असलेल्या माणसाला दीडशे रुपये पेट्रोल कदाचित सोसेल मात्र महिन्याला पंधरा हजार मिळणार्‍या माणसाला दीडशे रुपये पेट्रोल टाकून कामावर जायला तरी परवडणार आहे का ? हि उत्पन्न आणि किमतीच्या गुणोत्तराची बाब या दळभद्री भक्तांच्या डोक्यात कशी घुसणार? तिथ आधीच शेण भरलेलं आहे ना? खूप पूर्वी कधीतरी पेपरात वाचलेलं होत, एका आफ्रिकन देशात चलनमूल्य एवढ घटलं कि तिथल्या देशाने लाखभर स्थानिक डॉलर की नोट छापली पण ती नोट बाजारात देऊनही दोन लादी पाव मुश्किलीने मिळत होते. आपली वाटचाल नेमकी त्याच दिशेने चाललेली आहे.
Aओरिजनल मिस्टर धरकेे पाकिस्तानला घाबरवण्याच्या नादात, मुस्लिमांची खोलून मारण्याच्या नादात, अब्दुल, रशीद, बशीर, सलमान, शाहरुख यांची ठासायला जायच्या नादात आपण आपलीच हातभार फाडून ठेवलेली आहे हे आपल्याला कळायला अजून किती वाताहत व्हायला हवीय ? बाकी दिवाळीत कुणाकडून टिळे, टिकल्या लावून खरेदी करायची हा प्रश्न सामान्य माणसाला पडणार नाही याची खात्री आहे, कारण सण असला तरी ऋण काढून सण करण्याची सुद्धा ऐपत सामान्य माणसाची उरलेली नाही. सणाची खरेदी करण्याचे चोचले फक्त श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्ग यांनाच परवडणारे आहेत हे कटू सत्य आहे. सीधीबात कामाचे बोला सबका नंबर आयेगा इंधन दरवाढ महागाईचा_ आगडोंब – साभार – आनंद शितोळे मॅक्स महाराष्ट्र