Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे स्टेशन परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणारा, २ लाख २८ हजार रुपयांच्या मुद्देमालासह पोलीसी कैदेत,

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहरात कोरोना संसर्ग वाढलेला आहे. मागील दोन वर्षांपासून पुणे शहर लॉकडाऊन आहे. पोलीसांचा दिवस-रात्र कडक पहारा आहे. तरी देखील पुणे शहरात वेगवेगळ्या प्रकारचा गुटखा, तसेच गांजा, मेफेड्रॉन सारखे अंमली पदार्थ सहज आणि सर्रासपणे मिळत आहेत. यावरून शहरात नेमकं लॉकडाऊन कोणत्या बाबीतीत आहे हा सहज प्रश्‍न पडत असेल. परंतु पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी यांनी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन पंधरवड्यानिमित्त, पुणे शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहिम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. १ गुन्हे शाखा यांनी धडक कारवाई करून, एका इसमाला २ लाख २८ हजार रुपयांच्या मुद्देमालासह जेरबंद करण्यात आले आहे.


दि. २२ जुन पासून अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. १ कडील अधिकारी व कर्मचारी हे बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात अंमली पदार्थ गैरव्यवहाराचे अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असतांना मध्यरात्रौ सुमारे १ वाजण्याच्या सुमारास पुणे स्टेशन कडून साधु वासवानी चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावरील परमार चेंबर्स मधील हॉटेल स्टेटस फॅमिली रेस्टोरंट आणि बारच्या समोरील रस्त्यावरील बसस्टॉप जवळ इरशाद इकबाल सय्यद वय ४२ रा. गवळीवाडा येरवडा हा संशयास्पदरित्या थांबलेला दिसला.
त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ २ लाख २८ हजार ८८० रुपये किमतीचा व २५ ग्रॅम ११० मिलिगॅ्रम मेफेड्रोन (एम.डी.),
दोन हजार रुपये रोख, ५००० हजार रुपये किमतीचा मोबाईल, २० हजार रुपये किमतीची ऍक्टीव्हा दुचाकी, अंमली पदार्थासह अनाधिकाराने बेकायदेशिररित्या विक्री करीत असल्याचे दिसून आल्याने, त्याच्या विरूद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाख करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस अंमलदार प्रविण शिर्के, मारूती पारधी, पांडूरंग पवार, संदिप जाधव, विशाल दळवी, विशाल शिंदे, राहुल जोशी, मनोज सांळुंके, संदेश काकडे, योगेश मोहिते, नितेश जाधव, रूबी आब्राहम यांनी केली आहे.