Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेच्या बांधकाम झोन ७ मधील सोमवार- रास्तापेठेतील अभियंत्यांची खणा-नारळाने ओटी भरावी …?

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महापालिकेचा डेव्हलपमेंट चार्जेस बुडवून, मिळकत कराची कोट्यवधी रुपयांची थकबाकी ठेवून, सोमवार पेठ व रास्ता पेठेत वेगवान पद्धतीने अनाधिकृत बांधकामे सुरू आहेत. नॅशनल फोरमच्या सोमवारच्या अंकात याबाबतची बातमीही प्रसिद्ध करण्यात आली होती. तथापी काल व आज जोरदार पाऊस आणि धुके असतांना देखील वेगवान पद्धतीने बांधकामे सुरू असल्याने, सोमवार रास्तापेठेतील अभियंत्यांची खणा नारळाने ओटी भरावी किंवा कसे याची पंचायत आता निर्माण झाली आहे.

नुकसान शेवटी पुणे महापालिकेचे आणि पुणेकरांचेच आहे –
अनाधिकृत बांधकामे केल्याने पुढील ५० वर्ष ही इमारत पडणार नाही किंवा पाडलीही जाणार नाही त्यामुळे …. १) अनाधिकृत बांधकामे केल्याने रस्तारूंदी पुढील ५० वर्षात होणार नाही. २) बांधकामांना परवानी घेतली नसल्याने, मिळकत कराची आकार
णी जुन्या क्षेत्रफळानुसारच पुढील ५० वर्ष होत राहणार, नवीन मंजुरी खेरीज नव्याने मिळकतकर आकारणी केलीच जात नाही त्यामुळे पुढील ५० वर्ष पुणे महापालिकेला विकास कामांसाठी निधी मिळणारच नाही. ३) उलट शहरातील लोकसंख्या वाढणार ४) वाढलेल्या घरटी लोकसंख्येला – पाणी, रस्ते, ड्रेनेज व्यवस्था मोठ्या व्यासाची करावी लागणार ५) पार्कींगची समस्या वाढत राहणार- त्यातुन आज जशी भांडणे होतात, तशी पुढील ५० वर्षात भांडणांची संख्या वाढत राहणार. हमरी – तुमरी हे नित्याचेच झाले आहे. हातघाईची भांडणे आता लाठी काठी आणि पुढे बंदूकांवर येवून ठेपणार यात शंकाच नाही. ६) पुढील ५० वर्ष शहराचा विकास थांबणार.. विस्फोट होत राहणार.. यामुळे अशा प्रकारच्या बेकायदेशिर बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.