Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिका महसुली खात्यातील लोकसेवक गव्हाणे यांच्याकडुन असहकाराचं अग्निशस्त्र

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महापालिकेच्या सीई कार्यालयासहित, पुणे महापालिकेतील संपूर्ण सेवेच्या कालावधीत शंभर टक्के काळ हा टेबलवर्क कामांसाठी ज्यांनी खर्ची पाडला, ते कार्यकारी अभियंता श्री. रोहितदास गव्हाणे यांच्याकडे बांधकाम विकास विभागातील महत्वाचे विभाग देण्यात आले आहेत. बांधकाम विभागातील क्र. १ व ४ ची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. टेबल वर्क आणि फिल्ड वर्क मधील ज्यांना फरक कळत नाही, त्यातील श्री. गव्हाणे यांचा क्रमांक अगदी वरचा लागत असल्याचा अंदाज आहे. त्यांच्या विभागातील बहुतांश लोकसेवक कर्मचार्‍यांविरूद्ध त्यांचा राग असल्याचा अविर्भाव त्यांच्यात दिसून येत आहे. त्यांच्या अख्त्यारितील अभियंते कामच करीत नाहीत. ते एकटेच काम करतात असा त्यांना आभास निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांचे वर्तन एखाद्या सरावलेल्या गुन्हेगारासारखे असून, पुणे महापालिकेतील लोकसेवक कर्मचार्‍यांना गोडीत ढोस देण्यात त्यांचा संपूर्ण वेळ टेबलवर बसूनच जातो. आपल्याच कर्मचार्‍यांविरूद्ध असहकाराचं अग्निशस्त्र उगारण्यात आले असल्याचे दिसून आले आहे.


पुणे महापालिकेला विकास कामे, भविष्यातील तरतुदींसह वेतनसाठी महसुल मिळविण्याकडे अधिक लक्ष केंद्रीत केलेले असते. अधिकचा महसुल मिळवुन देण्यात टॅक्स आणि बांधकाम विभाग यांचा वरचा क्रमांक लागतो. त्यापैकी बांधकाम विभागातील कामकाजाची माहिती घेत असतांना, बांधकाम विभागातील बहुतांश विभाग व काही कार्यक्षेत्रातील अभियंते हे कामच करीत नसल्याचे दिसून आले आहे. अनाधिकृत बांधकामांवर कारवाई नाही, केवळ नोटीसा देवून, बांधकाम व्यावसायिकांना कोर्टात जाण्याचा सल्ला देणे, वकील देण्याचे कामही काही अभियंता मंडळी करीत आहेत.
अशा प्रकारची कृत्य काही विभागात असतांना, बांधकाम विकास विभाग झोन क्र. १ मधील कनिष्ठ अभियंते, उपअभियंते हे बर्‍यापैकी कामगिरी करीत असतांना, त्यांच्या कामात असहकाराचे अग्निशस्त्र- अडथळे निर्माण केले जात असतील, तर अशा वर्ग एक संवर्गातील लोकसेवकांबद्दल महापालिकेचे व जनतेचे काय मत असेल याचा विचारही करायला नको. संबंधित अभियंता हे सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत आणि सुट्टीच्या दिवशीही कार्यालयात हजर असतात, परंतु कामे नक्की कोणती करतात हा देखील प्रश्‍नच आहे. मागील लेखात याचा आढावा घेतला आहे, त्यामुळे त्याची पुनरावृत्ती इथे नकोच.
बांधकाम विकास विभगाातील अभियंत्यांनी अनाधिकृत बांधकामांवर कारवाईचा अहवाल प्राप्त झाला आहे, त्याची माहिती अशी आहे-


केशव नगर मुंढव्यात दत्तात्रय चव्हाण यांची कामगिरी –


बांधकाम विकास विभाग झोन क्र. १ यांचेकडील कनिष्ठ अभियंता श्री. दत्तात्रय चव्हाण यांनी मुंढवा केशव नगरात नियोजनबद्ध कारवाई करण्यात आली आहे. मागील दिड दोन वर्षाच्या कालावधीत श्री. चव्हाण यांनी पाडापाडी विभाग व पोलीस बंदोबस्त मिळणेसाठी एकुण ३० ते ३५ कारवाईचे नियोजन केले होते. यातील मुंढवा केशव नगर येथील स.नं. २०, २१, २२, २५, २९, ३७ तसेच २०, २१ व २२, ३६ ब स.नं. ३३ व ३७ कोद्रे हॉस्पीटल स.नं. ५, ४० व ३७ या ठिकाणी देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे.
अतिक्रमण व पाडापाडी विभागाला आज पत्र देणे आणि उद्या सकाळीच मशिनरी यंत्रसामुग्री, मनुष्यबळ आणि पोलीस फौजफाटा घेवून कारवाई करण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. बांधकामांना नोटीसा देणे आणि अवैध कृत्य करणार्‍यांना वेळ देणे असल्या प्रकाराला श्री. दत्तात्रय चव्हाण यांनी फाटा दिला असल्याचेही दिसून आले आहे. राजकीय मंडळींना, बांधकाम व्यावसायिक यांना काही कळण्याच्या आतच जॉ कटर आणि इतर यंत्रसामुग्रीचा वापर करून, तीन मजली, चार मजली, सात मजली इमारती पूर्णपणे पाडून टाकण्यात आलेल्या आहेत. बांधकाम विकास विभाग झोन क्र. १ मधील सर्वाधिक कारवाया ह्या कनिष्ठ अभियंता दत्तात्रय चव्हाण यांनी केल्या असल्याचे दिसून आले आहे.


किरण कलशेट्टी यांची तुफानी बॅटींग –


मुंढवा केशवनगर येथे प्रभारी उपअभियंता पदावर कार्यरत असतांना, त्याच्याकडील वडगाव शेरी कार्यक्षेत्रात देखील किरण कलशेट्टी यांनी तुफानी बॅटींग केली असल्याचे कारवाई अहवालावरून दिसून येत आहे. वडगाव शेरी येथील स.नं. ३६, ४२, ४७, ५१, स.नं. १७, ११, स.नं. ४३, ४०, ५३, ५६, ५८ (साईनाथ नगर) अशा एकुण २८ ते ३४ ठिकाणी कारवाय करून, संपूर्ण इमारती पाडून टाकण्यात आलेल्या असल्याचे दिसून येत आहे. दत्तात्रय चव्हाण यांच्या नंतर किरण कलशेट्टी यांनी कारवाई कामात आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे.


लोहगाव – खराडीत फारूख पटेल- निलकंठ शिलवंत यांची कामगिरी –


बांधकाम विकास विभाग झोन क्र. २ येथील प्रशासकीय हातोटी असलेले कार्यकारी अभियंता श्री. एन.डी. गंभिरे आणि उपअभियंता श्री. कैसास कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले, व कोंढव्या सारख्या ठिकाणी कारवाई करण्यात आघाडीवर असलेले कनिष्ठ अभियंता श्री. फारूख पटेल यांनी त्यांच्याकडील खराडी व लोहगाव (११ गावांपैकी) या कार्यक्षेत्रात अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करून, महापालिकेतील सेवा कर्तव्यपारायणता राखली आहे.


श्री. फारूख पटेल यांच्या आधी कनिष्ठ अभियंता श्री. किरण कलशेट्टी यांनी खराडीतील स .नं. १२, १३, १४, १६, ३३, ३४, ४०, ४८, ४९ या ठिकाणी जोरदार कारवाई केली होती. कलशेट्टी यांच्यानंतर श्री. पटेल यांच्याकडे खराडीचा पदभार आल्यानंतर त्यांनी देखील स.नं. १३, १४, ५६, ५८, २८, २९ आदि ठिकाणी मोठ्या संख्येने कारवाई केली असल्याचे दिसून येत आहे. लोहगावात देखील स.नं. ३१, ३२, ४२, ४३, ४३, ४६, ५३, ८६, ८७, ८८, ९७, ९८, ३०० व ३०१ आदि कार्यक्षेत्रावर कारवाई केल्याचे दिसून येत आहे. यामध्ये कलशेट्टी यांचाही सिंहाचा वाटा आहे.
कळस, धानोरीत निलकंठ शिलवंत –
अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करीत असतांना, बांधकाम करणार्‍या इसमांनी अधिकृतरित्या पुणे महापालिकेची परवानगी घेवून बांधकामे करा, असा संदेशच श्री निलकंठ शिलवंत यांनी दिला आहे. अनाधिकृत बांधकाम केलं तर ते आज नाहीतर उदया पाडले जाणार आहे. त्याऐवजी स्वतःहून पुणे महापालिकेकडून अधिकृत परवानगी घेवून बांधकामे केल्यास, स्वतःची पैशाची बचत होईल आणि महापालिकेस महसुल प्राप्त होईल, बांधकामे करणारे देखील निर्धास्त राहु शकतील अशा धोरणामुळं कळस धानोरीत बांधकाम मंजुरी घेणार्‍यांची संख्या वाढत आहे. शिवाय यामुळे पुणे महापालिकेच्या महसुलात वाढत होत असल्याचे काढण्यात आलेल्या चलनावरून दिसून येत आहे.
निखिल गुलेच्छांवर गव्हाणेंची मेहेरबानी – गुलेच्छाऽऽऽ वा… अरेच्छाऽऽ
पुणे महापालिकेने नेमून दिलेले कर्तव्य पार न पाडता अधिकार्‍यांची हांजी हांजी करूनही चांगले टेलब प्राप्त करता येवू शकते हे काही अभियंत्यांनी संपूर्ण पुणे महापालिकेला दाखवुन दिले आहे. श्री. गव्हाणे हे सीई कार्यालयात कार्यकारी अभियंता पदावरील लोकसेवक कर्तव्यावर असतांना, निखिल गुलेच्छा ह्या पट्टशिष्याला मर्यादेपेक्षा अधिक मार्गदर्शन केले असल्याचे बोलले जाते.
आज श्री. गव्हाणे हे बांधकाम विकास विभागाच्या झोन १ व झोन क्र. ४ चे विभागप्रमुख आहेत. त्यामुळेच त्यांना मिळालेल्या पदाचा अधिकचा लाभ गुलेच्छा यांना करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न श्री. गव्हाणे यांनी केला असल्याचे काहींनी मत व्यक्त केलेे आहे. कनिष्ठ अभियंता श्री. निखिल गुलेच्छा यांना १) टिडीआर २) संपूर्ण ११ गावांचा ऑटो डीसीआर ३) संपूर्ण खराडीचा ताबा आदि पदभार देण्यात आलेला आहे. टीडीआर आणि ऑटो डीसीआर मधुन मान वर करता येत नाही असा अनुभव आहे. त्यातच खराडीची जहॉगिरी गुलेच्छांना देवून महापालिकेच्या कामात कसुरी करण्यास गुलेच्छांना संधी का देण्यात आली आहे हा प्रश्‍नच आहे. एखादयावर किती मेहेरबानी करावी ह्याला काही बंधने आहेत की नाही हा देखील कळीचा मुद्दा आहे.
याच विभागातील तीन चार अभियंता मंडळी नक्की असतात तरी कुठे… कुठे बसतात.. कुठे कर्तव्यपारायणा दाखवितात हाही प्रश्‍नच आहे. महापालिकेकडे अभियंत्यांचा तुटवडा आहे म्हणून ओरड केली जाते. आता ह्यांना नियुक्ती दिली आहे, पण ही मंडळी आहेत तरी कुठे… का… ह्यांनाही सवलतीच्या दरात कामे दिली आहेत हा प्रश्‍नच आहे.
वारंवार तक्रारी व असहकाराच्या अग्निशस्त्राने पुणे महापालिकेस अधिकचा तोटा संभवत आहेत. कोरोनातून आपण आजही बाहेर आलेलो नाही. कोरोना डयुटीतून आजही महापालिका मोकळी झाली नाही. त्यामुळे कनिष्ठ कर्मचार्‍यांकडून जास्तीत जास्त कामे करून घेणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. असहकाराचे अग्निशस्त्र शरसंधान होणेच आवश्यक आहे.