Friday, November 15 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे बार्टीमार्फत ऑनलाईन एमपीएससी मुख्य परीक्षा मार्गदर्शन आयोजन

पुणे/दि/
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी माहे जुलै ते सप्टेंबर २०२० या दरम्यान यू ट्युब चॅनलवर इरीींळ जपश्रळपश द्वारे एम. पी. एस. सी. पूर्व परीक्षेचे ऑनलाइन प्रशिक्षण सुरु करण्यात आलेले होते. या प्रशिक्षणादरम्यान एमपीएससी पूर्व परिक्षेतील विषयांचे मार्गदर्शन देण्यात आले होते.


१८ मार्च २०२१ पासून एमपीएससी मुख्य (चरळपी) परिक्षेसाठी ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहे. या मार्गदर्शन वर्गामध्ये एमपीएससी मुख्य परिक्षेस आवश्यक उर्वरित अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन दिले जाईल. तरी इच्छूक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया बार्टी, पुणे च्या ुुु.लरीींळ.ळप या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड तसेच ई- बार्टी मधील च-र्सेींशीपरपलश अर्ंतगत ऑनलाईन एमपीएससी मुख्य (चरळपी) परीक्षा ऑनलाईन कोचिंगसाठी प्रवेश अर्ज या लिंकवर उपलब्ध आहे.
या प्रशिक्षणाचा कालावधी एकूण ४ महिन्यांचा (जुलै २०२१ पर्यंत) असेल व आवश्यकतेप्रमाणे हा कालावधी कमी किंवा अधिक करण्यात येईल. मार्गदर्शन वर्ग सोमवार ते शुक्रवार दुपारी २ ते ४ या वेळेत आयोजित केले जातील. तसेच शनिवार, रविवार व शासकीय सुट्टयांच्या दिवशी बंद राहतील. सदर ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाचे फेसबुक पेज व बार्टीच्या इरीींळ जपश्रळपश या यू ट्युब चॅनेलवरुन लाईव्ह-स्ट्रिमिंग करण्यात येत आहे, असे बार्टीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.