Friday, January 24 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

दी ग्रेट महार

महार हे भारताचे मूळ व पुरातन रहिवाशी आहेत. महारांचा प्राचीन इतिहास मोठा गौरवशाली, शूरवीरांचा आहे. महार हे मूळ राज्यकर्ती जमात होती. महारांच्या उज्वल इतिहासाला उच्चवर्णियांनी दडपून टाकले. यूरोपीय संशोधक जॉन विल्स सन यांनी महाराष्ट्र हे महाराचे राज्य असलेला देश होता असे म्हटले आहे. जे. टी मोलवर्थ यांचे सुद्धा हेच मत आहे. राजाराम शात्री भागवत यांनी शास्त्रीय पद्धतीने संशोधन करून प्राचीन नाग म्हणजे महार होय असे म्हटले आहे. जागतिक कीर्तीचे ड्रा. केतकर यांनी महाराष्ट्र हे महाराचे प्राचीन राज्य आहे असे म्हटले आहे. महात्मा जोतिबा फुले आपल्या ’गुलामगिरी ’ ह्या पुस्तकात लिहितात महार हे पूर्वीचे राजे होते. मांग स्वदेशासाठी भट लोकांशी लढले म्हणून भटानी त्यांची अशी दुर्देशा केली की, त्यांना अन्न अन्न करावयास लावले. विठ्ठल रामजी शिंदे म्हणतात, की, महार हे मंध्य युगात जमिनीचे मालक होते. वतन दार म्हणून वावरत आलेले आहेत. समाज शास्त्रज्ञ दत्तात्रय पुरुषोत्तम खानापूरकर आपले मत मांडताना म्हणतात की, सर्व अस्पृश्यात हिंदू उच्च वर्ण्यिांनी फक्त महार जातीचाच जास्त अपमान व छळ केला.


महार लोक आपल्या नावापुढे नाक हे उपपद लावीत असत. नाक हे नाग शब्दाचा अपभ्रंश आहे. जानेवारी १८१८ रोजी दुसरा बाजीराव पेशंवे व इंग्रज फलटणी सोबत भीमा कोरेगाव (पुणे ) येथे युद्ध झाले होते. स्वतः बाजीराव पेशवे सैन्यासोबत त्या युद्धात होते. ते अरबी पठाण लोकांच्या सैन्यात फलटणीसह २८००० सैनिक तोफ गोळयासह होते. इंग्रज फलटण प्रमुख कॅप्टन स्टाटन (कलकत्ता )सोबत दोन तोफा व ८०० सैनिक होते. त्यात जास्तीत जास्त महार सैनिक होते. रात्रभर इंग्रज व पेशवे यांच्यात घनघोर युद्ध झाले व बाजीराव पेशंव्याचा पराभव झाला. त्या विजयाप्रीत्यर्थ इंग्रजानी भीमा कोरेगावं येथे दगडाचा विजयी स्तंभ उभारला तो आजही अस्तित्वात आहे. त्यावर युद्धात ठार झालेल्यांची नावे आहेत. त्यात महार सैनिकांचे नाव नाक हे उपपद लावून कोरलेली आहेत. नावे पुढीलप्रमाणे –
१) मेतर नाईक २)सोननाक ३)कमलानाक ४) रायनाक पेसनाक शिपाई ५)गोरनाक कोठेनाक शिपाई ६)रामनाक येसनाक शिपाई ७)भागनाक हरनाक शिपाई ८)अंबनाक काननाक शिपाई ९) गणनाक बाळनाक शिपाई १०)बालनाक बोडनाक शिपाई ११)रुपनाक नखनाक शिपाई १२)बदनाक रामनाक शिपाई १३)विटानांक धामनाक शिपाई १४)राजनाक मननाक शिपाई १५)बपनाक हरनाक शिपाई
१६)रैनाक जाननाक शिपाई
१७) सजनाक यसनाक शिपाई
१८)गोपाळनाक बाळनाक शिपाई
१९)हरनाक इरनाक शिपाई
२०) जाननाक इरनाक परगावं वाला
२१)हिकनाक रतननाक शिपाई
२२) रतननाक भाननाक शिपाई
याप्रमाणे फार पूर्वीपासून नाक ही उपाधी फक्त महाराची होती. बिदरच्या मुस्लिम बादशहाने महाराना जी ५२ हक्काची सनद दिली होती, ती सनद अंबरनाक महाराचे नावाने आहे. छत्रपती शाहू राजांच्या काळात सातारा जिल्ह्यातील कळबी गावचा जहागीरदार सिद्धनाक महार फार लढवय्या होता. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथील दीक्षांत संभारंभात महार हे पूर्वीचे नागवंशिय राजे होते असे म्हटले आहे. आंध्र आणि त्याचे जवळचा प्रदेश नाग लोकांच्या कारभाराखाली होता. सातवाहन राज्यकाळात बेल्लोरी जिल्ह्यात स्कंदनाक नावाचा राजा राज्य करीत होता.
पुरातन काळाच्या बौद्ध धर्माच्या खाणाखुणा आजही लेण्या, गुंफा, पुरातन मंदिराच्या रूपाने अस्तित्वात आहेत. फक्त त्या शोधण्याची दृष्टी आपले जवळ असण्याची गरज आहे. नुकतेच जॉन प्रिन्सेप या पाश्चात्त्य इंग्रज अधिकार्‍याने लेणी, गुहा, शिलालेख वरील ब्राह्मी लिपी बाराखडी चा शोध लावून वाचन केले आहे. व माहिती प्रकाशित केली आहे. त्यांच्या वाचनातून खालील पुरातन लिहिलेल्या लेण्यात दानधर्म केल्याचा महार लोक महार नागांचे लोकांचा उल्लेख आढळतो.
१) कान्हेरी येथील लेण्यात शिलालेखावर नकनाक, अपरनाक, धमनाक, मोलनाक, मित्तनाक यांच्या नावाचा उल्लेख आहे.
२)भाजा लेणी शिलालेखात -अंपीनाक किंवा अदिकीनाक
३)कुडा येथील लेणी -वसुलनाक, पुसनाक
४)बेडसा येथील शिलालेखात नाशिक चा शेठ आनंद चा मुलगा पुसनाक, अपरदेवनाक याची बायको महाभोजाची मुलगी महार्थिनी महादेवी समादीनिका यांचे नावाने आहे.
५)कार्ला लेणीत -महारथी अगीमीतनाक, मितदेवनाक व उसभनाक
६)शिवनेरी लेणी – विरसेननाक
७)नाशिक येथील बुद्ध लेणीत -राज्यमंत्री अरहलय चाळीसनाक राज्यमंत्री आगीयतनाक, कफकनाक, रामानाक इत्यादी नावाचा उल्लेख आढळतो.
८)नानाघाट लेणीत महारथी त्र्यंनाक राणी नायनिका यांची नावे आहेत.
९)अजिंठा लेणीत – नागराजा व राणीच्या मुर्त्या आहेत.
यावरून हेच सिद्ध होते की, आजचे महार हे पूर्वीचे नाग असून राजे, शेठ, विद्वान व श्रीमंत होते. कट्टर बौद्ध धर्मीय होते ते दरिद्री कधीच नव्हते.
एकसंघ नाग बौद्धाचे अनेक गट पाडले व त्यांच्यात जबरदस्त फार मोठी फूट पाडली कारण एकच की,त्यांनी एकत्र येऊन बौद्ध धर्म पुन्हा मजबूत करू नये. त्यासाठी खालील पोटजाती महाराच्या पाडल्या. अवणे, अंधोण, अनंत, कुल्थ, ओढकांबळे, वलयी, बालकांबळे, बार्के, बावना, नाविशे, बेले, होन, बंकर, बोले, चेंलकर, डोले, धेड, धार्मिक, डोंब, गरदी, गवसई धडशी, घाटकांबळे, गोंडवाना, गोपाळ, हेडशी, डोलार, झाडें, जोगती, जुनरे, कबुर्ले, लाडवन, कांबळे, मढकांबळे, मुरली, प्राण, प्रधान, पुलार, रती, सलादी, शिलावात, शिरसाळकर, सोमवंशी, सोनकांबळे, सोमयबल, सुताड, तिलवन, पानमहार, विणकर, गसेवार, देस्कर, हटकर, गोडालिमा, रायपुरे, धरशीक, डोंगरवार, झाडेंवान, सुरती, पाजींनी व म्हली
या प्रकारच्या पोटजाती पाडून त्या सर्वांना तुमचीच पोटजात सर्व पोटजातीत श्रेष्ठ आहे असा कानमंत्र दिला. अशा भिकार कानमंत्राने आपणास आज पर्यंत एकत्र येऊ दिले नाही हा महान हेतू त्यांनी साधलेला आहे. त्यांनी एकत्र येऊन बौद्ध धम्मात जाऊन पुन्हा धम्म बळकट करू नये हाच तो मूळ उद्देश बौद्धधम्म विरोधकाचा होता. तरीही सत्याचा विजय होत असतो. आज त्याच अस्ताव्यथ व देशोधडीला लागलेल्या महार नागाने ग्रेट महार बाबासाहेब आंबेडकरांचे पुण्य स्पर्शाने आम्ही पुन्हा बौद्ध एकसंघ झालो आहोत. म्हणून पोटजातीचे भेदाभेदी चे राजकारण सोडून सर्वांनी बौद्ध धम्मा करिता आणि राजकिय मांड पक्की करण्यासाठी मनाने एकत्र आलंच पाहिजे व धम्म कार्य करायला लागलं पाहिजे. (साभार – फेसबुक)