Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

अबबऽऽ कचराच कचरा… गणेश पेठ दुधभट्टी, सदा सर्वदा कचराच कचरा

पुण्यातील मध्यवर्ती पुणे शहरातील गणेश पेठ येथील दुध भट्टी जवळील नाल्यावर कचरा, नाल्यात कचरा, पुलावर कचरा, सगळीकडे कचर्‍याचे ढिग दिसून येतात. पुणे महापालिकेने व्यापार्‍यांना विनंती करून कचरा टाकण्यास मनाई करणारा फलक लावला असून त्याकडे कुणाचेही लक्षच नसते. आता कचरा टाकणार्‍यांवर आणि कचरा होऊ देणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारल्या शिवाय कचर्‍याची समस्या सुटणार नाही.