Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

सुप्रिम कोर्टात स्टे ऑर्डरने मराठा समाजाने घाबरून जाऊ नये- ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांचे आवाहन

पुणे/दि/ प्रतिनिधी/
मराठा समाजाच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाचा विषय गुंतागुंतीचा करू नये, मराठा नेत्यांनी संयम बाळण्याची गरज आहे. कागदोपत्री दिखाऊपणाने अधिक गोंधळ झाल्यास राज्यातील मराठा समाजाचे आरक्षणही गमवायची वेळ येऊ शकते असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले आहे.

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे –
राष्ट्रवादी कॉग्रेसच खासदार अमोल कोल्हे यांनी ओबीसी समाजाने मोठे मन करून मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करून घ्यावे असे आवाहन केले आहे.
ओबीसी काय म्हणतात –
महाराष्ट्रातील कुणबी मराठा, तेली, तोंबाळी, अशा एकुण ३५० पेक्षा अधिक जातींनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आमची धारणा आहे. परंतु आमच्या (ओबीसींच्या) ताटातील ओढून घेवू नका असे आवाहन ओबीसी संघटनांनी केले आहे.
याबाबत ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांना विचारले असता, ते म्हणाले की, मी देखील काही सोशल मिडीयावरून वाचतोय, त्यावरून हेच दिसते की, राज्यातील ३५० पेक्षा अधिक जाती असलेल्या ओबीसी प्रवर्ग मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ठ करून घ्यायला तयार नाहीये. तसेच सोशल मिडीयावरून दिसून येते की, ओबीसींच्या मते, मराठा समाजाने ओबीसी मध्ये हिस्सा मागण्याच्या भानगडीत पडू नये. महाराष्ट्रात मराठा समाज १६ टक्के असला तरी देशात तो केवळ २ टक्के आहे. त्यामुळे देशभरातील ओबीसी एकत्र आले तर महाराष्ट्रापुरते मिळणारे आरक्षणही मिळणार नाही असे ओबीसी संघटनांचे मत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणांवर स्टे असला तरी मराठा समाजाने घाबरून जाऊ नये असे आवाहन ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले आहे.