पुणे/दि/ कोरोनाचा बाऊ करत कुठलाही विचार न करता लावण्यात आलेला लॉकडाऊन गरीबाच्या जीवावर आला असून त्याचा भीषण परिणाम समोर आला आहे. लॉकडाऊनमुळे शहरांमध्ये बेरोजगारी २१ टक्क्यांनी वाढली असा प्रकारची आकडेवारी सरकारनेच दिली आहे.
लॉकडाऊनचा सर्वात मोठा परिणाम १५ ते २९ वर्षे वयोगटातील तरुण कामगारांच्या कमाईवर झाला. यातून महिलांच्या रोजगारावरही गंभीर संकट निर्माण झाले. सरकारी आकडेवारीनुसार शहरी भागातील बेरोजगारीचे प्रमाण एप्रिल-जून (आर्थिक वर्ष २०१९-२०) दरम्यान २०.९ टक्क्यांनी वाढले आहे. तर जानेवारी-मार्च दरम्यान (आर्थिक वर्ष २०१८-१९) ते फक्त ९.१ टक्के होते. या सर्वेक्षणानुसार शहरांमध्ये ट्रान्सजेंडरसह पुरुषांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण २०.८ टक्के तर महिलांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण २१.२ टक्के आहे. याचा परिणाम तरुण कामगारांवर झाला. शहरांमध्ये १५ ते २९ वर्षांच्या दरम्यान बेरोजगारीचे प्रमाण ३४.७ टक्के होते. कामगारांची संख्या ३५.९ टक्क्यांनी कमी झाली.
मॅन्युफॅक्चरिंगबरोबरच सर्व्हिस सेक्टरवरही त्याचा परिणाम झाला. उत्पादन क्षेत्राला मोठी किंमत चुकवावी लागल आहे. बसला. हॉटेल, प्रवास, पर्यटन उद्योगांवर त्याचा मोठा परिणाम झाला. सेवा क्षेत्राचा देशाच्या जीडीपीमध्ये सर्वाधिक वाटा आहे. त्यामुळे त्याचा रोजगारावर व्यापक परिणाम झाला. दुसरीकडे, कारखाने बंद पडल्यामुळे उत्पादन क्षेत्रातील कामेही ठप्प झाली. स्थलांतरित मजूर घरी परत गेल्यामुळे उत्पादन जवळपास ठप्प झाले.