Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

महसुलात घट आणि कारवाईच्या नावाने शिमगा तरीही हर्षदा शिंदे म्हणतात आम्हीच अव्वल, झोन क्र. ५ म्हणजे आधीच उल्हास, त्यात आता हा फाल्गुन मास…

पुणे/दि/ प्रतिनिधी/
खासदार, आमदार, नगरसेवक आणि राजकीय पक्षांचे बडे प्रस्थ हे पुणे महापालिकेतील कामकाजात माननिय म्हणून गणले जातात. माननियांचा आदेश आला आहे असं म्हटलं तर लोकसेवकांची पळापळ सुरू होते. पुणे महापालिकेतील महत्वाच्या पदांवर माननियांना फायदेशिर असलेल्या लोकसेवकांची वर्णी लावण्यात सन्माननियांचा मोलाचा वाटा असतो. बांधकाम विकास विभागातील झोन क्र. ५ मधील काही कार्यक्षेत्रावर मागील अनेक वर्षांपासून एकाच व्यक्तीला कायम ठेवण्यात आले असून, शासनाच्या बदली आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. रेशनिंग आणण्याच्या दोन पिशव्या गच्च भरून अनाधिकृत बांधकामांच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत, परंतु कारवाई मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच नामधारी करण्यात आलेल्या आहेत. बांधकामाच्या कार्यकारी प्रमुख हर्षदा शिंदे यांनी मात्र त्या अभियंता लोकसेवकाचे समर्थन केले असून, अनाधिकृत बांधकामांवर आमच्याच कार्यालयाने जास्त कारवाया केल्या असल्याचा फाल्गुनी उल्हास आणला आहे. सध्या फाल्गुन मास आहे, त्यात हर्षदा शिंदेंचा उल्हास पाहून, भोंब्याचा शेवटच्या मासातील आज सोमवार आहे, येत्या रविवारी होळी आहे, मग फल्गुन मासात शिंदेंचा उल्हास पाहुन आजपासून बोंबाबोंब करायची काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.


राजकीय दहशतवादाच्या बळावर मिळालेल्या पदांकरवी महापालिकेला चुना –
पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्र. ५ मधील हडपसर जुनी हद्द आणि वानवडी सारख्या महत्वाच्या कार्यक्षेत्रावर आरए मुटकुळे नामक कनिष्ठ अभियंता लोकसेवकाची अनेक वर्षांपासून पदसथापना करण्यात आली आहे. या कार्यालयात अनेक अभियंते आले आणि इतर बदलीवर गेले. परंतु आरए मुटकुळे मात्र आहे त्याच पदावर व आहे त्याच खुर्चीवर बसलेले असल्याचे समजले आहे.
मागच्या काही दिवसात, पुणे महापालिकेत काही गांधीटोपीवाली मंडळी जोरदार आरडा ओरड करीत असल्याचे दिसून आले. त्यातील एका इसमाला, याच कार्यालयात काय झाले, का एवढं ओरडताय असे विचारले असता, त्याने सांगितले की, माझ्या जिमिनीच्या बाजूलाच असलेल्या जिमिनीवर पाच मजली बिल्डींग बांधली, त्यानं कुठलीच परवानगी घैतली न्हाय, मी मात्र नियमानं बांधकाम करायच म्हटलंय तर ही आणा, ति आणा… ही परवानगी न्हाय, ती परवानही न्हाय… आता आमी कुठं… कुठं… जायचं. ज्यांना परवानी न्हाय त्यांच्यावर काहीबी कारवाई न्हाय… आमी बांधकाम सुरू केलं, परवानगीसाठी फाईल दिली… तर आमच्याच मालकीच्या जागेत ह्या *** ने खोडा घातला आहे.
अतिशय तळमळीने तो नागरीक बोलत होता. खरं तर अनाधिकृत बांधकामे करून अनेक बांधकाम व्यावसायिक सोन्याहून पिवळे झाले आहेत. परंतु जे नागरीक पुणे महापालिकेच्या नियमात राहुन, बांधकाम मंजुरी घेवून बांधकाम करण्यासाठी लेआऊट सादर करतात, त्यावेळी त्याच सर्वसामान्य नागरीकांना मात्र लोकसेवक अमुक एक परवानगी नाही म्हणून त्याची जबरीने पिळवणूक करतात. परंतु दुसर्‍या बाजूला, जे बांधकाम व्यावसायिक कोणतीही मंजुरी न घेता बांधकामे करीत आहेत, विक्री करीत आहेत, त्यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई केली जात नाहीत असे दिसून आले आहे.
अनाधिकृत बांधकामाच्या दोन पिशव्या भरून नोटीसा दिल्या असल्या तरीही शेकडोंना अद्याप पर्यंत नोटीसा दिल्या नसल्याचे समजले आहे. परंतु एवढ्या नोटीसा देवून, कारवाई मात्र शून्यावर आहे. झोन क्र. ५ मधील कार्यक्षेत्रावर मागील व चालु वर्षात एकुण किती लेआऊट मंजुर झाले, एकुण किती चलन मंजुर होवून, पुणे महापालिकेच्या तिजोरीत महसुल आला याची माहिती घेतली तर, झोन क्र. ५ मध्ये सगळीकडे बोंबाबोंब हा नव्याने चित्रपट काढावा लागेल, इतकं अन्उल्हासी कामकाज असल्याचे दिसून येत आहे.
झोन क्र. ५ मधील बहुतांश कार्यक्षेत्रांवर अनाधिकृत बांधकामे, बेकादेशिर कृत्य कारवाई शून्यावर आहेत. पुणे महापालिकेच्या महसुलात एक दमडी मिळत नाहीये. त्यात नोटीसा देवून काही नागरीक पुणे महापालिका कोर्ट,
जिल्हा कोर्ट व काही उच्च न्यायालयात गेले आहेत. त्यांच्या कोर्ट कामकाजासाठी पुणे महापालिकेस अनेक वकीलांना पगारावर नियुक्त करावे लागले आहे. अशा प्रकारचे कामकाज पुणे महापालिकेत होत राहिले, तर पुणे महापालिकेतील कर्मचार्‍यांसाठी दुसरी महापालिका बांधावी लागेल, आणि आहे त्या महापालिकेच्या इमारतीत वकीलांची बसण्याची आणि कोर्ट कज्जांची सोय करावी लागेल एवढे मात्र नक्की.
बांधकाम विकास विभाग झोन क्र. ५ ची अशा प्रकारची अवस्था असता, या कार्यकारी प्रमुख हर्षदा शिंदे यांना मात्र त्याचे काहीच सोयर सुतक नसल्याचे काल शुक्रवारी दिसून आले आहे. कामकाजाबाबत विचारले असता, त्यांनी न केलेल्या कारवाईचे एवढे समर्थन केले आहे की, हसावे की रडावे … आवाक्क् होवून, बाहेरील रस्ता धरावा लागला आहे.
बांधकाम विकास विभाग झोन क्र. ५ मधील हडपसर जुनी हद्द, धनकवडी जुनी हद्द, कात्रज जुनी हद्द, त्यातही बिबवेवाडी, मंजुरी कोंढवा खुर्द या ठिकाणी अगदी आनंदी आनंद आहे. कुणाला झाकावं आणि कुणाला उघडावं हा गहन प्रश्‍न आहे.
त्यातच सध्या फाल्गुन मास आहे. अर्थात होळी… बोंबाबोंब करण्याचा महिना आहे. त्यामुळे बांधकाम झोन क्र. ५ चा पुढील अध्याय चैत्र मास सोडून वैशाख मासात आरंभ करणे उचित ठरेल यात शंकाच नाही.