Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

भारतात डॉक्टरांना ओळखता येत नाही क्षयरोगाची लक्षणे

नवी दिल्ली/दि/ भारतातील खाजगी क्षेत्रातील अनेक डॉक्टर हे क्षयरोग या गंभीर आजाराची लक्षणेच ओळखू शकत नाही आणि या कारणाने रुग्णांवर योग्य ते उपचार होऊ शकत नाही, असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे.

                या अभ्यासात त्या लोकांना सहभागी करुन घेण्यात आले होते जे या आजाराची लक्षणे दाखवण्याचा अभिनय करु शकतील. क्षयरोग हा हवेतून पसरणारा आजार असून भारत, चीन आणि इंडोनेशियासहीत इतरही काही देशांमध्ये चिंतेचा विषय ठरत आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या नुसार, २०१७ मध्ये या आजाराने १७ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. या आजाराला मुळातून नष्ट करण्यासाठी बुधवारी संयुक्त राष्ट्रमध्ये एक वैश्‍विक आरोग्य संमेलन आयोजित केले होते, परंतु हा गंभीर आजार दूर कऱण्यात प्राथमिक उपचार करणारे डॉक्टर कमी पडत आहेत. जे रुग्णांना सुरुवातीला त्यांना खोकला यायला सुरुवात होते तेव्हा तपासतात.

                या अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की, मुंबई आणि पूर्व पाटणामध्ये ही स्थिती निश्‍चित आहे. हा अभ्यास २०१४ ते २०१५ दरम्यान साधारण १० महिन्यांपर्यंत मॅकगिल यूनिव्हर्सिटी, विश्‍व बँक आणि जॉन हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांच्या टीमने केला. रुग्ण म्हणून सादर करण्यात आलेले २४ लोक १,२८८ खाजगी डॉक्टरांकडे गेले. त्यांनी साधारण कफ असल्याचे सांगितले आणि त्यावर उपचार केले.

                जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल ट्यूबरक्लोसिस रिपोर्ट २०१८ नुसार, जगभरात गेल्या वर्षभरात एक कोटी लोक क्षयरोगाने ग्रस्त झाले आहेत. त्यातील २७ टक्के लोक हे भारतात आहेत. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, २०१७ मध्ये जगभरातील १ कोटी लोकांना क्षयरोग झाला. त्यात ५८ लाख पुरुष, ३२ लाख महिला आणि दहा लाख लहान मुले आहेत.

                रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, क्षयरोगामुळे रोज जगभरात साधारण ४ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागतो आहे. यात हेही सांगण्यात आले आहे की, जगात आजाराने मृत्यूमुखी पडण्याचे दहावे सर्वात मोठे कारण क्षयरोग आहे.

                क्षयरोगाचा उल्लेख झाला की, कमजोरी, खोकला, ताप यांसारखी लक्षणे लोकांच्या डोक्यात येतात. असे समजले जाते की, रुग्णाच्या फुफ्फुसामध्ये इन्फेक्शन झाले आहे. परंतु क्षयरोग केवळ फुफ्फुसाचा आजार नाही तर क्षयरोगाचे इन्फेक्शन शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकते. त्याची काही लक्षणे खालीलप्रमाणे पाहता येतील.

                श्‍वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, खोकला आला की उलटी होणे, तीन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त सतत खोकला असणे, ताप येणे, शरीरात कमजोरी, वजन कमी होणे, थकवा येणे कफ होणे, थंडी वाजून ताप येणे रात्री घाम येणे यासाखी लक्षणे क्षयरोग्यांमध्ये आढळून येतात.