Wednesday, December 25 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितले देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या आरोपांचे कारण

पुणे/दि/राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांवर दहशतवादी आणि अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी १९९३ च्या बॉम्बस्फोटातील आरोपींकडून एलबीएस रोडवरील ३ एकर जागा खरेदी केली असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
ऍड. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री असताना मलिकांनी जमीन घेतल्याची माहिती होती. त्यावेळी त्यांनी हे प्रकरण समोर का आणले नाही? त्यांनीच कारवाई का केली नाही? आता स्वतःचं प्रकरण दाबण्यासाठीच मलिकांचे प्रकरण काढले. आपल्यावर शेकले जाते त्यावेळी त्या प्रकरणावरून लक्ष हटविण्यासाठी दुसरी माहिती द्यायची. आपल्यावर झालेले आरोप दाबण्यासाठी फडणवीसांनी हे सर्व केले आहे. आता न्यायालयाची भूमिका महत्वाची आहे. न्यायालयाने फडणवीसांवर दाखल असलेले सर्व प्रकरणे निकाली काढावी, असेही आंबेडकर म्हणाले.