पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/
पुणे महानगरपालिकेतील काही काळापासून सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती प्रकरणे प्रलंबित होती. तथापी पुणे महापालिकेने उद्यान व आरोग्य (घनकचरा) विभागातील वर्ग दोन व वर्ग तीनमधील कर्मचार्यांना सेवाज्येष्ठतेने पदोन्नती देण्यात आली आहे.
उद्यान विभागातील स्नेहल हरपळे यांना पदोन्नती-
पुणे महापालिकेच्या उद्यान सेवा संवर्गातील उद्यान निरीक्षक वर्ग तीन या पदावरून वर्ग दोन मधील सहायक उद्यान अधिक्षक या पदावर तदर्थ पदोन्नती देण्यात आली आहे. धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय व सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील बेकायदा वृक्ष तोडप्रकरणी कारवाई करण्यात कसुरी झाल्याची मोठी प्रकरणे त्यांच्या कार्यकाळ ात घडली आहेत.
आरोग्य निरीक्षक पदावर २० कर्मचार्यांना पदोन्नती –
पुणे मनपातील कार्यरत कर्मचर्यांमधून किमान तीन वर्षांचा अनुभव व शैक्षणिक अर्हता धारण करणार्या सेवकांची आरोग्य निरीक्षक वर्ग तीन या पदावर तदर्थ पदोन्नतीने नियुक्ती देण्यात आली आहे.
पुणे महापालिकेतील सुरक्षा रक्षक, झाडूवाला, बिगारी, टंकलेखक,लिपिक व फायरमन या वेगवेगळ्या पदांवर काम करणार्या २० कर्मचार्यांना आरोग्य निरीक्षक वर्ग ३ या पदांवर पदोन्नती देण्यात आली आहे. यातील खुल्या व मागास संवर्गातील कर्मचार्यांना सेवाज्येष्ठतेने पदोन्नती देण्यात आली असल्याचे दिसून येत आहे.
या पदोन्नती मध्ये १. उमेश तोडकर २. मनोहर चंदवदन ३. दत्तात्रय सुतार ४. विनायक चोपडे ५. अतिक सय्यद ६. राजु बागुल ७. नितीन ढावरे ८. दत्तात्रय दळवी ९. विनोद सरोदे १०. उदय सणस ११. गणेश चोंधे १२. सुरेंद्र जावळे १३. ज्योती भालेराव १४. ज्योती माने १५. निनायक भोरडे १६. नितीन साळुंके १७. हनुमंत चाकणकर १८. प्रशांत दामले १९. करण कुंभार व २०. विशाल पाटसकर
यांना सेवाज्येष्ठतेने घनकचरा व्यवस्थापन विभागात आरोग्य निरीक्षक या पदावर तदर्थ पदोन्नती देण्यात आली आहे.