Thursday, December 26 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

देखभालीसाठी ५८ कोटी – सर्वच राजकीय पक्ष व नगरसेवकांचे मिले सुर मेरा तुम्हारा

पुणे/दि/ प्रतिनिधी/
देखभालीसाठी ५८ कोटी रुपये देणे म्हणजे पुणेकरांच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या टाकलेला हा दरोडा आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणेकरांची अशी ही लुट कधीही होऊ देणार नाही त्यााठी वाट्टेल तो त्रास सहन करण्याची आमची तयारी असल्याची असल्याची राणाभिमादेवी थाटात वल्गना करणार्‍या राष्ट्रवादी कॉंग्रेस सहित कॉंग्रेसने आजच्या सर्वसाधारण सभेत यु टर्न घेतला. कोणत्याही अडथळ्याविना ५८ कोटी ९४ लाख रुपयांची निविदा मंजुर करण्यात आली. शिवेसेनेच नगरसेवक तटस्थ राहिले तर आरडा ओरडा बहाद्दर नगरसेवक ऐनवेळी सभागृहातून गायब झाल्याने ५८ कोटी निविदेसाठी सर्वच राजकीय पक्षांचे मिले सुर मेरा तुम्हारा असल्याचे दिसून आले आहे.


५८ कोटी रुपयांच्या केवळ देखभाल निविदेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे त्याची तक्रार ईडीकडे करण्यात येणार असल्याची भाषा कालपर्यंत बोलली जात होती. मिडीया समोर देखील अशा प्रकारच्या आणाभाका घेण्यात आल्या होत्या. आज मात्र या आणाभाका विसरुन सगळेच नगरसेवक भाजपाच्या सुरात सुर मिसळून निविदेला मंजुरी देण्यात आली आहे. यात कुणी किती टक्केवारी घेतली याबाबत उलट सुलट चर्चा महापालिकेत सुरू आहेत.
महिनाभर गाजत असलेल्या या विषयावर मतदान घेण्यात आले. ४५ विरूद्ध ३ अशा मतांनी हा विषय मंजुर झाला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या हितासाठी लढत असल्याचे दाखवुन स्वतःची टक्केवारी वाढविण्यात येत असल्याचे पुनः एकदा दिसून आले आहे. कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपा, सेनामनसे यांची कामकाजाची पद्धत काय आहे हे दिसून आले आहे.