Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

काही लोकांचा मताधिकार काढुन घेण्यासाठीच एनआरसीचा घाट घातला जातोय – आंबेडकर

मुंबई/दि/
राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांच्या परस्पर विरोधी विधानांवरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी भाजपाचा समाचार घेतला आहे. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी देशभरात लागु करणार नाही असं पंतप्रधान जनसभेला संबोधित करतांना म्हणतात, मग त्यांचेच गृहमंत्री लोकसभेत एनसीआर लागु करणार असल्याची घोषणा कशी काय करतात, असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.

भाजपा आणि संघाचं राजकारण खोटारेडपणावर चालत असल्याचा आरोप त्यांनी केला. सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) देशावरील संकट असल्याचा आंबेडकर यांनी म्हटल आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा एनआरसी वरून खोटं बोलत असल्याचा अरोप त्यांनी केला. एनआसी बद्दल मंत्रिमंडळात,संसदेत कधीच चर्चाही झाली नसल्याचं मोदी भरसभेत सांगतात. मग अमित शहा लोकसभेत एनआरसी लागु करणार असल्याची घोषणा कशी काय करतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आसाममध्ये राबविण्यात आलेल्या एनआरसीचं उदाहरण दिलं. आसाममध्ये करण्यात आलेल्या एनआरसीमध्ये १९ लाख लोक घुसघोर ठरले. त्यातले १४ ते १५ लाख हिंदू आहेत. त्यामुळे एनआरसीचा फटका हिंदूना देखील बसणार हे उघड असल्याचे आंबेडकरांनी म्हटंल आहे.
मोदी सरकारला काही लोकांना बाद करायचं असल्यानेच एनआसीचा घाट घालण्यात येत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. काही लोकांना डिटेन्शन सेंटरमधुन पाठवुन त्यांचा मताधिकार काढुन घ्यायचा आहे. हाच सरकारचा एनआरसी मागचा हेतू आहे. संघाची, भाजपाची विचारसरणी रूजविण्यासाठी हा सगळा खटाटोप केला जात आहे असं आंबेडकर यांनी सांगितलं आहे.
सावरकारांना मध्ये ओढु नका –
लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी काही लोक सावरकरांना मध्ये ओढत आहेत. माझं त्यांना हे म्हणणं आहे की, सावरकरांना मध्ये ओढु नका. जे लोक सावरकरांना मध्ये आणत आहेत ते शकुनीमामा साखे आहेत असं आंबेडकर म्हणाले. एनआरसी कायदयाविरोधात आयोजित धरणे आंदोलनात ते बोलत होते.