
कुंभमेळ्यात 1000 पेक्षा अधिक लोक चेंगराचेंगरीत मेले, शासनाने फक्त 38 लोक मयत झाल्याचे जाहीर केलं; बाळासाहेब आंबेडकरांचा गंभीर आरोप
नॅशनल फोरम/ सांगली/दि/ प्रतिनिधी/पंतप्रधान अमेरिकेला जाऊन आल्यापासून शेअर मार्केट पूर्णपणे कोसळत गेलं. धर्माच्या राजकारणाने देशाला आता धोक्याच्या घटकेपर्यत पोहोचवलं आहे. आज विरोधी पक्ष लकवा मारलेल्या परिस्थितीत असून त्यातून त्यांनी स्वतःला सावरत दुरुस्त करावे आणि हिटलरशाहीच्या सरकारचा विरोध करावा, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केली. आंबेडकर यांनी आज सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत केंद्र सरकारसह महाराष्ट्रातील सरकार आणि विरोधी पक्षावर जोरदार टीका केली. उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळावरूनही आंबेडकर यांनी मृत्यूच्या आकड्यावरून गंभीर आरोप सरकारवर केला.
कुंभमेळाव्यात 1 हजारांवर लोक चेंगराचेंगरीत मयत-ॲड. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, कुंभमेळा हा लोकांचा भावनिक, वैयक्तिक प्रश्न आहे. या कुंभमेळाव्याची उत्तर प्रदेश सरकारने सोय केली, पण ज्या पद्धत...