Saturday, December 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: #Sahakarnagar Police Station

पोलीसांकडून पुण्यात गैरकायदयाचा कारभार… गुन्हेगारीला जात-धर्म नसतो, परंतु पकडलेले सर्व गुन्हेगार हे एस.सी,एस.टी ओबीसीचे कसे

पोलीसांकडून पुण्यात गैरकायदयाचा कारभार… गुन्हेगारीला जात-धर्म नसतो, परंतु पकडलेले सर्व गुन्हेगार हे एस.सी,एस.टी ओबीसीचे कसे

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीसांकडून गुन्हेगारीचे उदात्तिकरण सुरू आहे काय, पुणे शहर पोलीस हे गुन्हेगार तयार करण्याचा कारखाना आहे काय, गुन्हेगारीला जात किंवा धर्म नसतो, परंतु पकडण्यात आलेले, तडीपार केलेले, मोक्का व एमपीडीए सर्वाधिक संख्येने लावलेले आरोपी गुन्हेगार हे दलित, आदिवासींसह ओबीसी समाजाचेच कसे… त्यातल्या त्यात अनु.जातीतील बौद्ध, मातंग व पारधी समाजाची संख्या अधिक कशी होत आहे, असे प्रश्न घेवून 2 ऑक्टोंबर ( म. गांधी जयंतीपासून) अभियान सुरू केले आहे. तसेच इजी अर्थात सहज पैसे मिळणारे अवैध व बेकायदेशिर धंदयाबाबत उघडपणे आवाज उठविल्यानंतर, त्यात स्वारगेट, पर्वती व सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गैरकायदयाच्या कृत्यांची बाजू मांडण्यात आली आहे. तथापी मागील 10 दिवसात दोन्ही पोलीस स्टेशन मधील एकाही मटका जुगार अड्डे, रमीचे क्लब, खाजगी सावकारी, देहव्यापार, बिल्डर लॉबीसह गोल्ड माफिया...
सहकारनगर पोलीस स्टेशन, कारभारी बदलला तरी कारभार सुधारण्याचे नावही नाही

सहकारनगर पोलीस स्टेशन, कारभारी बदलला तरी कारभार सुधारण्याचे नावही नाही

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/सर्वाधिक शांत असलेले पोलीस स्टेशन म्हणून सहकारनगर पोलीस स्टेशनची ओळख होती. मोठ्या झोपडपट्टया असल्यातरी गुन्हेगारी किरकोळ स्वरूपाची होती. परंतु काळाच्या ओघात शांत असणारे पोलीस स्टेशन गुन्हेगारी कारवायांनी पुरते बदलुन गेले आहे. चार आत आणि 40 बाहेर अशी ख्याती सध्या सहकारनगर पोलीस स्टेशनची झाली आहे. तळजाई वसाहत, अरण्येश्वर, शंकर महाराज मठ, पद्मावती वसाहत सह सिद्धार्थ नगर दातेस्टॉप सारख्या मोठ्या झोपडपट्टया सहकारनगरकडे आहेत. परंतु लोकसंख्येची अधिक घनता असलेले धनकवडी, आंबेगाव सारख्या गावांसह पूर्वीच्या मिळकतींवर आता मोठी लोकसंख्या वाढली आहे. त्यात लगतच्या पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांसाठी लपण्यासाठी जागा असल्याने देखील हद्दीत गुन्हेगारी वाढली. गुन्हेगारांची आर्थिक ठिकाण देखील सहकारनगर भागात वाढली आहेत, मटका जुगार अड्डे, हातभट्टी ही मोठी ओळख निर्माण झाली आहे.वाहन...
कात्रज, भारती विद्यापीठ अवैध धंदे, गुन्हेगारी आणि बरेच काही… कळसकरांपेक्षा तीन पट अवैध धंदे आणि बेसूमार गुन्हेगारी… तरीही कुंभारांचा विजयी थाट…

कात्रज, भारती विद्यापीठ अवैध धंदे, गुन्हेगारी आणि बरेच काही… कळसकरांपेक्षा तीन पट अवैध धंदे आणि बेसूमार गुन्हेगारी… तरीही कुंभारांचा विजयी थाट…

पोलीस क्राइम
भारती विद्यापीठ मध्ये- आरटीओ-उत्पादन शुल्क-पोलीस- वाहतुक पोलीसांचे… हम साथ, साथ है… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/कात्रजसह भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे बोकाळल्याचे कारण सांगुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तत्कालिन वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जगन्नाथ कळसकर यांच्यावर मानहानीकारक कारवाई करण्यात आली होती. सात दिवसांसाठी शहर नियंत्रण कक्षाशी संलग्न करून त्यांचा पदभार पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. दरम्यान आज सव्वा वर्षानंतर, त्याच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत श्री. कळसकरांपेक्षा तीन पट गुन्हेगारी आणि अवैध धंदे वाढले असतांना, त्यांच्यावर कारवाई करण्यात पोलीस आयुक्त पुढे का येत नाहीत असा सवाल सामाजिक कार्यकर्ते विचारत आहेत. 19 फेबु्रवारी 2022 रोजी काय घडले -कात्रजसह भारती विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असल्याचे कारण सांगु...