Sunday, October 19 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Tag: punepmc

सिंहगड क्षेत्रिय कार्यालयात कंत्राटी कामगारांची मेगा भरती, झाडणकामांसाठी 18 वर्षाखालील मुलांचा वापर…

सिंहगड क्षेत्रिय कार्यालयात कंत्राटी कामगारांची मेगा भरती, झाडणकामांसाठी 18 वर्षाखालील मुलांचा वापर…

शासन यंत्रणा, सर्व साधारण
सिंहगड कार्यालयात पती-पत्नी, मुलगा, मुलाची पत्नी, मुलगी, मुलीचे पती, मावशी, चुलती, आत्या, सुनेचा भाऊ, मुलाचा मामा, मुलाचा साडू, विहिनबाई, विहीनबाईचा मुलगा, इत्यादी इत्यादी… अख्या कुटूंबासह यादीला नाव पण एकही कामाला नाही… आता बोला… आहे की नाही, ठेकेदार यु.आर.फॅसिलिटीची कमाल… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/कंत्राटी कामगारांचा ईपीएफ व ईएसआय भरला जात नाही, किमान वेतनही दिले जात नाही म्हणून 15 क्षेत्रिय कार्यालयातील कंत्राटी कामगारांसह सुरक्षा रक्षकांची ओरड सुरू आहे. दर सहा महिन्यांनी ही नेहमीची ओरड ठरलेली आहेच. ठेकेदार नियम पाळत नाहीत, त्यामुळे कंत्राटी कामगार, सुरक्षा रक्षकांचा रोष वाढत आहे. तर पुणे महापालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयात नवीन बाब समोर आली आहे. यात आत्ता तर 18 वर्षाखालील मुलांचा वापर झाडणकामांसाठी केला गेला आहे. तसेच आत्ता दर दिवशी कंत्राटी कामगारांची भरती सुरू आहे. न...
पुणे महापालिका आयुक्तांनी वारजेत केली स्वच्छतेची पाहणी, सगळीकडे कचऱ्याचे ढिगच ढिग…घनकचरा आणि मुख्य कामगार अधिकाऱ्यासह ठेकेदारांना जाब विचारण्याची हिंम्मत आयुक्त ठेवणार काय?

पुणे महापालिका आयुक्तांनी वारजेत केली स्वच्छतेची पाहणी, सगळीकडे कचऱ्याचे ढिगच ढिग…घनकचरा आणि मुख्य कामगार अधिकाऱ्यासह ठेकेदारांना जाब विचारण्याची हिंम्मत आयुक्त ठेवणार काय?

शासन यंत्रणा, सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/पुणे महापालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुड़ी यांच्या समवेत पुण्यातील स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ केला होता. त्यानंतर नवल किशोर राम यांनी अधिकाऱ्यांसमवेत अनेक ठिकाणी भेटी देवून पुणेकरांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर ते स्वतः मंगळवारी अचानक सकाळी वारजे भागात पाहणी केली असता, रस्ते न झाडल्यामुळे आणि सगळीकडे कचऱ्याचे ढिगच ढिग दिसत असल्याने त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. आयुक्तांनी अधिकाऱ्यांना फोनवरच जाब विचारताच सर्वांची एकच धावपळ उडाली. परंतु हे केवळ वारज्यात होत नसून संपूर्ण पुणे शहराची हीच स्थिती आहे. दरम्यान सफाई कामगारांना धारेवर धरून समस्या कधीच सुटणार नाही. याला सर्वस्वी पुणे महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संदीक कदमांसह मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे हेच जबाबदार आहेत. प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयात कंत्राटी काम...
अखेर त्या 8 उपकामगार अधिकाऱ्यांची पदोन्नती झालीच… आयुक्तांचा ठराव विखंडीत करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार

अखेर त्या 8 उपकामगार अधिकाऱ्यांची पदोन्नती झालीच… आयुक्तांचा ठराव विखंडीत करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार

शासन यंत्रणा, सर्व साधारण
पुणे महापालिकेवर 200 पेक्षा जास्त आंदोलने- मोर्चे झाले, 300 पेक्षा अधिक फाईल्स तपासल्या, सार आणि सायबरटेक मध्ये दोषी तरीही दोषमुक्त, साडेतीन वर्षानंतर पुन्हा आगमन… पूर्वी प्रभारी होते आणि आत्ता अधिकृत झाले… पगारी सेवक तरीही एका फाईलवर सहीसाठी लाखाच्या पुढेच बोली… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिअखेर उपकामगार अधिकाऱ्यांची डीपीसी झाली. 19 वेळा प्रयत्न करुनही कोणत्याही आयुक्तांनी सही केली नव्हती. परंतु नवीन आयुक्तांना काही माहिती पडण्याच्या आधीच, त्या 8 सेवकांना उपकामगार अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडतांना, कोणतीही प्रारूप यादी जाहीर करण्यात आली नाही, तसेच संबंधित यादीविरूद्ध हरकती देखील मागविण्यात आल्या नाहीत, असे असतांना देखील पुणे महापालिकेचे अति. आयुक्त प्रदीप चंद्रन यांनी पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडली आहे. मागील चार वर्षापूर्वी एकुण 8 सेवकांना पद...
पुणे महानगरपालिकेतील आस्थापना विभाग म्हणजे 35 हजार सेवकांची छळछावणी…

पुणे महानगरपालिकेतील आस्थापना विभाग म्हणजे 35 हजार सेवकांची छळछावणी…

शासन यंत्रणा, सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महापालिका सेवा प्रवेश नियम-2014 यात कामगार कल्याण विभागाकडील उपकामगार अधिकारी (प्रशासकीय सेवा श्रेणी-3) मधील नेमणूका ह्या 100 टक्के नामनिर्देशनाने अर्थात सरळसेवेने प्रवेश परिक्षा घेवून नेमणूका करण्याची तरतुद होती. तथापी कामगार कल्याण विभागाने पदांच्या संख्येत वाढ करून 50 टक्के नामनिर्देशनाने व 50 टक्के पदोन्नतीने भरण्याबाबत आरआरमध्ये दुरूस्ती करण्यात आली. अर्थात ज्या सेवकांकडे प्रभारी पदभार होता, त्यांच्या सोईच्या दृष्टीने आरआरमध्ये बदल करण्यात येवून त्यांनाच उपकामगार अधिकारी या पदावर बसविण्याचा घाट घालण्यात आला. सामान्य प्रशासन विभागाने याबाबत कोणतीही त्रुटी काढली नाही. खातेप्रमुखांनी नमूद केल्यानुसार जसेच्या तसे प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठवुन त्याला मंजुरी घेण्यात आली. मागील 5 वर्षांपासून 50 टक्के पदोन्नतीने पदस्थापनेचे 19 वेळा प्रयत्न के...
सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या विद्युत विभागातील भ्रष्टाचाराचा मोरे महामार्ग

सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या विद्युत विभागातील भ्रष्टाचाराचा मोरे महामार्ग

शासन यंत्रणा, सर्व साधारण
सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय म्हणजे धर्मशाळा वाटली काय… कुणीही या आणि लुटाविद्युत विभागाच्या मोरे यांनी उपआयुक्तांच्या आदेशाला डस्बीन दाखविले, मनमानीपणे ठेकेदारांना निधीचे वाटप12 टक्के जीएसटी दिली असतांना पुन्हा 18 टक्के जीएसटी कशासाठी दिली… कुणाला विचारून निधी दिला… नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिका नगरसेवकांविना पोरकी झाली आहे. कुणीही जाब विचारणारा नाही. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे. ठेकेदारांना मनमानीपणे निधीचे वाटप केले जात आहे. एक कनिष्ठ अभियंता उपाआयुक्तांना देखील जुमाननेसा झाला आहे. मागील वर्षी केलेल्या कामांना आत्ताच्या निधीतून पैसे देतांना, वरिष्ठांच्या पूर्वपरवानगी खेरीज रकमा देता येत नाही हा नियम आहे. या पूर्वी देखील तत्कालिन उपआयुक्त जयंत भोसेकर यांनी एका निविदा कामांबाबत पूर्वपरवानगी खेरीज रकमा देण्यात येऊ नये असे आदेश जारी केले होते....
PMC आयुक्त,अति. आयुक्तांना अंधारात ठेवून भ्रष्ट उपकामगार अधिकाऱ्यांची डीपीसी झाली

PMC आयुक्त,अति. आयुक्तांना अंधारात ठेवून भ्रष्ट उपकामगार अधिकाऱ्यांची डीपीसी झाली

शासन यंत्रणा, सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे महापालिकेतील कायम, कंत्राटी, मानधन, एकवट व इतर स्वरूपाचे एकुण 30 ते 35 हजार कर्मचाऱ्यांचे नियंत्रण नियोजन व मध्यस्थीची भूमिका हे कामगार कल्याण विभागाकडून केले जाते. विशेषतः कंत्राटी कामगारांचे किमान वेतन, ईपीएफ, ईएसआय यासह त्यांना देय असलेले सुरक्षा प्रावरणे कंत्राटदारांकडून दिली जात आहेत किंवा कसे यावर नियंत्रण ठेवण्याचे काम केले जाते. तसेच बांधकाम मजुरांची नोंदणी करणे यासह एकुण पुणे महापालिकेसह पुणे शहरातील असंघटीत मजुरांचे नियंत्रणाचे महत्वाचे खाते आहे. तथापी कामगार कल्याण विभागावर मुळातच भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्यामुळे पुणे महापालिकेवर आजपर्यंत 300 पेक्षा अधिक मोर्चे व आंदोलने झाली आहेत. नियमानुसार एकाही कामगार अधिकारी किंवा उपकामगार अधिकाऱ्यांनी नियम व तरतुदीनुसार कामे केली नसल्याने पुणे महापालिकेची नाहक बदनामी झाली आहे. सुमारे 8...