
PMC- पुणे महापालिकेतील ठेकेदारकृत वेठबिगारी, घाणीत हात घालून करावे लागतेय काम
नॅशनल फोरम/पुणे/दि/अनिरूद्ध शालन चव्हाणडोक्यावरून मैला वाहून नेण्याची विखारी पद्धत भारतात अनेक वर्षांपासून सुरू होती. आर्थिकदृष्ट्या गरीब आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या (अनु. जातीचे) लोकांकडून ही कामे करवुन घेतली जात होती. मुघल, ब्रिटीश भारतासह स्वातंत्र्यानंतरही ही पद्धत सुरू होती. दरम्यान 1976 साली वेठबिगारी अधिनियम पारीत करण्यात आला असला तरी ब्रिटीश भारतात 1942 साली व स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानात ही पद्धत बंद करण्यात आली. डोक्यावरून मैला वाहून नेण्याविरूद्ध प्रतिबंध करण्यात आला. आज पुणे महापालिकेत ठेकेदारांकडून बालकामगारांकडून झाडणकामे करवून घेतली जात आहेत, तसेच आर्थिक व सामाजिकदृष्टया मागासलेल्या समाजातील कंत्राटी कामगारांनाकडून स्वच्छता विषयक कामे करवुन घेत असतांना त्यांना कायदयातील व टेंडरमधील तरतुदीनुसार हॅन्डग्लोज, गमबुट व मास्क दिले जात नाहीत. त्यामुळे या कंत्राटी कामगारांना...