सिंहगड रोड वॉर्ड ऑफिसः बीडब्ल्युजी प्रकल्पांतील ओला कचरा उलण्यास मनाई केल्यामुळेच डीएसआय माने यांच्याकडील पदभार काढून घेतला
नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/पुणे महानगरपालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय हद्दीत ज्या सोसायट्यांमध्ये बीडब्ल्युजी प्रकल्प सुरू आहेत, तसेच ज्या सोसायट्यांनी कंपोस्ट खत व ओला कचरा जिरवित असल्याबाबत, शिफासर घेवून, पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाकडून, त्यांच्या मिळकत करामध्ये 5 टक्के सवलत मिळविली आहे, त्यांचा ओला कचरा मोकादम व आरोग्य निरीक्षक यांना उचलण्यास प्रतिबंध केल्यामुळे सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या सहायक महापालिका आयुक्त श्रीमती प्रज्ञा पोतदार यांनी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक (सिनिअर सॅनिटरी इन्सपेक्टर) श्री. मंगलदास माने यांच्याकडून कचरा वाहतुक व्यवस्थापन व कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा पदभार काढून घेण्यात आल्याचे कार्यालयीन आदेश जारी केले आहेत.
या आदेशात नमूद केले आहे की, सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय हद्दीतील घनकचरा व्यवस्थापन कामकाजाशी संबंधित सर्व कचरा व...









