पुण्यात एखादयाला जीवानिशी ठार मारणे इतके सोपे झाले आहे काय…? वारजे, लोणीकंद व कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत ताजीराते हिंद तिनसौ दो… आत्ताचा 103 च्या घडल्या घटना
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुण्यात एखादयाला जीवानिशी ठार मारणे इतके सोप्पे झाले आहे काय… पुणे शहरात पोलीसांचा धाक राहिला आहे की नाही असाच प्रश्न वारंवार उभा राहत आहे. मारणे, कापणे, दगडाने ठेचणे, चाकुने, ब्लेने वार करणे, लोखंडी हत्यारांचा बेमालूम वापर… इतक्या पराकोटीला लोक उतरले आहेत. पुण्यातील वारजे पोलीस स्टेशन, लोणीकंद पोलीस स्टेश व कोढवा पोलीस स्टेशन हद्दीतही जुना ताजीराते हिंद तिनसौ दोन म्हणजे आत्ताचा 103 खुनाच्या घटना घडल्या आहेत.
लोणीकंद पोलीस स्टेशन - पत्नीच्या दागिन्यांची मागणी केल्याने, पतीने पत्नीला ठार मारलेलोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील एक 23 वर्षीय व्यक्तीने फिर्यादी दिली आहे. त्यात आरोपी शैलेंद्र प्रकाश व्हटकर वय 30 वर्ष रा. बकोरी, पुणे हे 22 जानेवारी रोजी सात्रौ साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जोगेश्वरी हायस्कुलच्या पाठीमागे वाडेबोल्हाई यांनी त्यांची पत्नी नम्रता शैलेंद्र व्...






