Thursday, November 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

Tag: Pune City Police

पुण्यात मोक्काने शंभरी गाठली, एमपीडीएने देखील अर्धशतक पार केले तरीही पुण्यात गुन्हेगारी सुसाट,थ्री-नाईन-फाईव्ह (395)च्या विशेष ट्रेनमुळे खास पोलीस सुखावुन गेले

पुण्यात मोक्काने शंभरी गाठली, एमपीडीएने देखील अर्धशतक पार केले तरीही पुण्यात गुन्हेगारी सुसाट,थ्री-नाईन-फाईव्ह (395)च्या विशेष ट्रेनमुळे खास पोलीस सुखावुन गेले

सर्व साधारण
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/आज बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजे 16 डिसेंबर 2022 रोजी पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार तत्कालिन मावळते पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून स्वीकारला. अमिताभ गुप्ता यांच्या कार्यकाळापासूनच पुणे शहरात मकोका आणि एमपीडीए कायदयाखालील दाखल गुन्ह्यांचे काऊंटींग सुरू झाले. श्री. गुप्ता यांच्या दोन वर्षाच्या काळात त्यांनी मोक्का व एमपीडीएचे प्रत्येकी शतक काढले होते. मात्र एक वर्षापूर्वी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलेले श्री. रितेश कुमार यांनी एका वर्षाच्या आत मोक्काची शंभरी गाठली आहे तर एमपीडीए चे तर अर्धशतक पूर्ण करून आता शंभरीकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. गुन्हेगार व गुन्हेगारी टोळ्यांविरूद्ध एवढ्या जबरी कारवाया सुरू असतांना देखील पुण्यात गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता भादवीच्या...
फरासखाना 81 तर सहकारनगर 82 …. शांतताप्रिय पुणे शहराने गाठली मोक्काची शंभरी… भाईगिरीचा नाद, पोलीसांनी घातली पेकाटात लाथ, आता बसा जर्मनच्या थाळ्या वाजवत जेलच्या आत

फरासखाना 81 तर सहकारनगर 82 …. शांतताप्रिय पुणे शहराने गाठली मोक्काची शंभरी… भाईगिरीचा नाद, पोलीसांनी घातली पेकाटात लाथ, आता बसा जर्मनच्या थाळ्या वाजवत जेलच्या आत

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/आम्ही इथले भाई आहोत, आता एक एकेला मारून टाकु म्हणत हवेत तलवारी आणि लोखंडी हत्यार फिरविणाऱ्या भाई आणि भाईच्या नम्रकारींना पुणे पोलीसांची चांगलीच पेकाटात लाथ घातली आहे. कालपर्यंत शांतताप्रिय समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात मोक्का कायदयाने शंभरी गाठत आणली आहे. काल फराखान्यात ऐक्क्यांशी तर सहकारनगरात 82 वी मोक्काची कारवाई झाली आहे. आता तरी भाईगिरीचा नाद करून पुणे पोलीसांना आव्हान देणाऱ्या व कायदया व सुव्यस्थेचे तीन तेरा करणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडविली असल्याचे आजच्या कारवाईवरून दिसून येत आहे. भाईगिरीचा छंद बाळगणाऱ्यांनी लक्षात ठेवल पाहिजे - गुन्हेगारीचा एकदा शिक्का लागला की पुढील 30 वर्ष पोलीस रेकॉर्डला नाव राहते असे सांगितले जाते. कुठेही सरकारी तर सोडाच परंतु खाजगी नोकरीही मिळणार नाही. चारित्र्य पडताळणीत गुन्हेगार म्हणूनच उल्लेख होणार कुणीही काम...
खडक पोलीस स्टेशन हद्दीतील अत्यंत कुर, खुनशी व भांडखोर गुन्हेगारास अमरावती कारागृहात केले स्थानबद्ध

खडक पोलीस स्टेशन हद्दीतील अत्यंत कुर, खुनशी व भांडखोर गुन्हेगारास अमरावती कारागृहात केले स्थानबद्ध

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र. 1 व खडक पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार नजीर सलीम शेख वय 29 रा. काशेवाडी याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या वागणूकीत काहीएक फरक पडत नव्हता. तसेच तो अत्यंत कु्रर, खुनशी व भांडखोर असल्याने तो लोकांमध्ये काहीना काही कुरापती काढुन मारहाण करून गुन्हे करीत होता. व्यापाऱ्यांना व बिल्डरांना खंडणी मागणे, नागरीकांना त्रास देवून त्याचे गुन्हेगारी कृत्य करीत असल्याने अखेर खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल माने याबाबत अहवाल पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांचेपुढे सादर करून सराईत गुन्हेगाला अमरावती मध्यवर्ती कारागृहात एमपीडीए कायदयानुसार स्थानबद्ध करण्यात आले आहे. खडक पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे कृत्य -खडक पोलीस स्टेशन पुणे या गुन्हे अभिलेखावरील सराईत व अट्टल गुन्हेगार नजीर सलीम शेख, व...
पुणे शहर पोलिसांकडून गुन्हेगारीचे उदत्तीकरण

पुणे शहर पोलिसांकडून गुन्हेगारीचे उदत्तीकरण

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहर पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी मकोका या कायद्याअंतर्गत आतापर्यंत 65 गुन्हेगारांवर व त्यांच्या टोळक्यांवर कारवाई करण्यात आलेल आहे. तसेच एमपीडीए अंतर्गत 50 पेक्षा अधिक गुन्हेगारांवर कारवाया करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान तत्कालीन पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांनी गुन्ह्यांची आकडेवारी प्रथमच सुरू केली. त्यात मोक्का व एमपीडीएच्या किती कारवाया केल्या याचे जाहीर प्रगटन करणे सुरू केले. त्यांनी त्यांच्या दोन वर्षाच्या कालावधीत मोक्का व एमपीडीएचे प्रत्येकी शतक पूर्ण केले आहे. सध्या कार्यरत असलेले पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीत शतक गाठले आहे. पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता व श्री. रितेश कुमार यांच्यापूर्वी मागील 50 वर्षाचा रेकॉर्ड पाहिला असता कोणत्याही पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने अशा प्रकारे किती, कु...
राज्य उत्पादन शुल्क आणि भारती विद्यापीठ पोलीसांनी राज्य शासनाला दाखविला कात्रजचा घाट, देशी विदेशी दारूचे वाहतात पाट, शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाची लावली वाट

राज्य उत्पादन शुल्क आणि भारती विद्यापीठ पोलीसांनी राज्य शासनाला दाखविला कात्रजचा घाट, देशी विदेशी दारूचे वाहतात पाट, शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या महसुलाची लावली वाट

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/कात्रजचा घाट म्हटलं की राजकारणातील सापशिडीचा खेळ समोर येतो. कात्रजचा घाट म्हटलं की, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये झालेल्या दगा फटक्याची तीव्र आठवण होते. कात्रजचा घाट म्हटलं की भंबेरी कशी उडते याचे अनुभव व आठवणी डोळ्यासमोर तर्रर्रपणे उभे राहतात. परंतु त्याच कात्रजच्या घाटाचा हिस्का जर शासनातील सरकारीबाबु लावत असतील तर जाब विचारायचा तरी कुणाला. सर्पउद्यानापासून ते भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि तिथून पुढे कात्रजच्या बोगद्यापर्यंत आणि व्हाया मांगडेवाडी,जांभूळवाडी, नऱ्हे यासारख्या एकूण 40 ते 45 हॉटेल कम ढाबा मध्ये दिवस रात्र बेकायदेशीरपणे देशी विदेशी दारूची विक्री केले जात असल्याची बाब समोर आलेली आहे. यातून राज्य शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडविला जात असताना, राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे तसेच पुणे शहर पोलीसातील ...
गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पुणे शहर पोलीस रस्त्यावर उतरले…. वाड्या-वस्त्या, गल्ली-बोळातून पोलीसांचे लेफ्ट- राईट…

गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पुणे शहर पोलीस रस्त्यावर उतरले…. वाड्या-वस्त्या, गल्ली-बोळातून पोलीसांचे लेफ्ट- राईट…

पोलीस क्राइम
पोलीस उपआयुक्त संदीपसिंह गिल यांच्याकडील सर्व पोलीस ठाण्यांची धडक कारवाई…. पुणे/दि/ प्रतिनिधी/natioanl forumदुसऱ्या पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगार तिसऱ्या पोलीस स्टेशन हद्दीत येऊन राडा करतात, वाहनांची जाळपोळ, तोडफोड करतात, चौथ्या पोलीस स्टेशन हद्दीत कोयते, तलवारी हवेत फिरवून मस्तवाल गुन्हेगार पोलीसांना आव्हान देत लुटालूट करतात, पुनः हॉटेल फोडले, पेट्रोलपंप लुटला असे गुन्हे देखील कमी नाहीत, तोच अंमली पदार्थांची विक्री, देशी विदेशी दारूची तस्करी, रोजच्या रोज शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या गुन्ह्यांच्या घटना घडत असल्याने, पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार यांनी पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्या त्या पोलीस स्टेशन हद्दीत कोंम्बिग ऑपरेशन आणि पेट्रोलिंग वाढविण्याच्या सुचना दिल्यानंतर, आज संपूर्ण पुणे शहरातील पोलीस अक्षरशः रस्त्यावर उतरले आहेत. मध्यवर्ती ...
सामाजिक सुरक्षा विभागाची विमानतळ, हडपसरसह कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत धडक कारवाई,

सामाजिक सुरक्षा विभागाची विमानतळ, हडपसरसह कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीत धडक कारवाई,

पोलीस क्राइम
sscellpune शिवाजीनगरात कारवाईसाठी जाणिवपूर्वक दिरंगाई कोण करीत आहे…. पुणे/दि/ प्रतिनिधी/national forumपुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखा यांनी विमानतळ, हडपसर पोलीस स्टेशनसह कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध व बेकायदेशिर मटका जुगार अड्डयांवर कारवाई केली आहे. तीन पोलीस स्टेशन हद्दीतील कारवाईत एकुण 1 लाख 88 हजार 10 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच एकुण 36 इसमांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत दळवी हॉस्पीटलसह इंडिया बुल्स कंपनीजवळील झोपडपट्टीत सुरू असलेल्या मटका जुगार अड्डा, पत्ता क्लबवर कारवाई करण्यास दिरंगाई होत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच शिवाजीनगरातील कारवाई करण्यास पोलीस विभागातील काही कर्मचारी जाणिपूर्वक दिरंगाई करीत असल्याचा आरोप होत आहे. जुगार अड्डयावर छापा टाकुन 24 जणांवर...