तळजाई पठरावर सिमेंट मिक्सर व ड्रायव्हींग स्कुलचा सुळसुटाळ, पोलीसांचे अक्षम्य दुर्लक्ष,शाळेतील विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरीकांच्या जीविताला धोका
नॅशनल फोरम/पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तळजाई पठारावर ड्रायव्हींग स्कुलच्या ट्रेनिंग मुळे विद्यार्थी व ज्येष्ठ नागरीकांच्या जीविताला अक्षरशः धोका निर्माण झालेला आहे. नागरीकांनी पोलीसांना वारंवार कळवुन देखील पोलीस त्याकडे साफ दुर्लक्ष करीत असल्यामुळे दाद मागायची तरी कुठे असा प्रश्न नागरीकांच्या मनांत निर्माण होवून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस नियंत्रण कक्षाला कळवुन देखील पोलीसही दाद देत नसल्याची तक्रार नागरीकांनी केली आहे.
तळजाई पठारावर चाटे पब्लिक स्कुल असुन तेथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आलेले असतात. शाळेची वाहने, पालकांची वाहनांची संख्याही मोठी असते. त्यातच तळजाई पठरावर सकाळी आणि संध्याकाळी व्यायामासाठी, शुद्ध हवेत फिरायला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे, त्यातच ज्येष्ठ नागरीक देखील पायी चालण्यासाठी तळजाई पठारावर येत असतात. दरम्यान तळजाई पठ...







