Friday, August 1 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

Tag: Nanded City Police Station

मोबाईल न विचारता घेतल्याने 25 वर्षिय तरुणाची हत्या

मोबाईल न विचारता घेतल्याने 25 वर्षिय तरुणाची हत्या

पोलीस क्राइम
नॅशनल फोरम/पुणे/दि/देवा उर्फ देविदास पालते वय 25 वर्ष मूळ राहणार नांदेड जिल्हा सध्या रा. धायरी याने दुसऱ्याचा मोबाईल फोन त्याला न विचारता घेतल्याने, या तरुणास जबरी मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीतील धायरी येथे घडली आहे. गुन्ह्याची हकीकत अशी की, पोलीस अंमलदार शिवा क्षिरसागर हे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, स.नं. 30/13, साई धाम, त्रिनेश इंजिनिअरींग कंपनीचे वर पहीला मजला प्रभात प्रेस रोड, धायरी पुणे येथे एक इसम हा जखमी अवस्थेत पडलेला आहे. पोलीस अंमलदार शिवा क्षिरसागर यांनी लागलीच घटनास्थळी जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी इसम नामे देवा उर्फ देविदास पालते (वय 25 वर्षे ) रा.मु.पो.तागयाल पो. कलबर देवाची ता. मुखेड जि. नांदेड (सध्या स.नं. 30/13, साई धाम, जिनेश इंजिनिअरींग कं...