Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

राहुल गांधींचे आश्वासन हा जुमलाचः मायावती

Mayavati-rahul-Gandhi

लखनौ/दि/       

           लोकसभा निवडणुकीनंतर केद्रात कॉंग्रेसचे सरकार आल्यास देशातील सर्व गरिबांना किमान उत्पन्नाची हमी देणारी योजना राबवली जाईल, अशी घोषणा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी छत्तीसगडमध्ये केली होती. या घोषणेवर बसपाच्या प्रमुख मायावती यांनी सडकून टीका केली. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींच्या १५ लाख रुपयाच्या घोषणेप्रमाणे राहुल गांधीची गरीबी हटाओ योजना ही जुमलाच आहे.

          कॉंग्रेस आणि भाजपा दोघेही अपयशी ठरले आहेत. हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असाही आरोप मायावती यांनी केला. सोमवारी राहुल गांधी म्हणाले होते नव्या भारताची उभारणी करणे अशक्य आहे. त्यामुळे केंद्रात सत्तेत आल्यास कॉंग्रेस देशाला गरिबी व भुकेपासून मुक्त करण्याचा कार्यक्रम हाती घेईल, हे आमचे ध्येय व आश्वासन आहे, असे ते म्हणाले होते.

          मायावतींच्या या टिकेमुळे लोकसभा निवडणुकांपूर्वीच विरोधक एकमेकांवर हल्ले करु लागल्याचे दिसून येत आहेत. इतर राजकीय पक्षांमधून यावर काय प्रतिक्रीया उमटतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.